‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौड

मलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी उत्पादक कंपनी हरभरा, तूर, मका आदी शेतीमाल खरेदी, प्रक्रिया, बीजोत्पादन आदींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. चार वर्षांच्या काळात तीन कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल नेण्यात कंपनी यशस्वी झाली आहे.
आधारभूत किमतीने कंपनीद्वारे शेतमाल खरेदी करताना.
आधारभूत किमतीने कंपनीद्वारे शेतमाल खरेदी करताना.

मलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी उत्पादक कंपनी हरभरा, तूर, मका आदी शेतीमाल खरेदी, प्रक्रिया, बीजोत्पादन आदींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. चार वर्षांच्या काळात तीन कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल नेण्यात कंपनी यशस्वी झाली आहे. मलकापूर (जि. बुलडाणा) येथील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या पुढाकाराने २५ जानेवारी २०१६ मध्ये ‘जय सरदार’ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. लघू कृषक कृषी व्यापार संघाचे व कृषी विभागाचे सहकार्य त्यांना मिळत आहे. दिलीपराव नाफडे कंपनीचे अध्यक्ष तर अमित नाफडे संचालक आहेत. कंपनीचे उपक्रम

  • शेतीमाल खरेदी, सुकवणी, प्रक्रिया, साठवणूक व ‘मार्केट लिंकेज’साठी प्रकल्प
  • पशुखाद्य, स्प्रे पंप, ताडपत्री आदी बाबींचा पुरवठा.
  • शेतीमाल खरेदीचा पहिला प्रयोग नाफेडसोबत महाराष्ट्रातील पहिला ‘शेतीमाल खरेदी’चा प्रकल्प कंपनीने पाच वर्षांपूर्वी राबवला. त्यानंतर पुढील वर्षी ‘महाएफपीसी’ मार्फत महाराष्ट्रातील अनेक कंपन्या प्रकल्पाशी जोडल्या. राज्यातील शेतकऱ्यांना आज सरकारी खरेदीचा जो लाभ मिळत आहे त्याचा पहिला प्रयोग यशस्वी करण्याचे काम ‘जय सरदार’ने केले. परिसरातील हजारो शेतकऱ्यांना आजपर्यंत आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीचा फायदा मिळवून देण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. मका उत्पादकांना बोनस कंपनीने एप्रिल ते जुलै २०२० दरम्यान अनेक शेतकऱ्यांकडील मका खरेदी केला. विक्री विविध राज्यांत केली. त्यातून १०७ शेतकऱ्यांना ३१६६ क्विंटल मका विक्रीसाठी नफ्यातील ३१ हजार ६६० रुपये बोनस देण्यात आला. या कामाबद्दल अनेक मान्यवरांनी प्रशंसा व्यक्त केली. अन्य शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही प्रेरणा मिळाली. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आदींचे मार्गदर्शन कंपनीला मिळाले आहे. थेट पंतप्रधानांसोबत चर्चेची संधी फेब्रुवारी २०२० मध्ये ‘दहा हजार एफपीओ’ योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्था अध्यक्ष व संचालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. सन २०१८ मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमातही पंतप्रधानांनी संचालक मंडळाशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. दसरा सणावेळी ‘मन की बात’ कार्यक्रमातही कंपनीच्या बोनस वितरण कार्यक्रमाची प्रशंसा केली. शेतकऱ्यांना प्रेरणा

  • कंपनीने उभारलेल्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यांतील शेतकरी, अधिकाऱ्यांच्या भेटी
  • भेटीगाठी मोठ्या प्रमाणात वाढल्याने कंपनीकडून अभ्यास सहलीसाठी शुल्क निश्‍चित.
  • अन्य शेतकऱ्यांना कंपनी निर्मितीसाठी तसेच बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या कंपन्याही पुन्हा उभ्या करण्यासाठी जय सरदार मार्गदर्शक.
  • तारण सुविधा

  • ‘वेअरहाउस डेव्हलपमेंट ॲण्ड रेग्युलॅरिटी ॲथॉरिटी (WDRA) सोबत गोदामाची नोंदणी.
  • गोदामात माल ठेवून शेतकऱ्यांना तारण कर्जाची सुविधा व ई –पावती.
  • अशा प्रकारे गोदाम नोंदणी होणारी भारतातील ही दुसरी कंपनी.
  • पावतीच्या आधारावरच शेतकऱ्याला माल विकता यावा म्हणून एनईएमएल, ई-नाम नोंदणी. सन २०२० मध्ये ‘एनसीडीईएक्स’वर प्रायोगिक तत्त्वावर व्यवहार सुरू
  • बीजोत्पादनात पाऊल

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत (अकोला) मागील वर्षी ३० एकरांत हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम
  • बाजारभावापेक्षा ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल जास्त दराने शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी
  • मागील वर्षी सोयाबीन बियाणांचा तुटवडा झाला असताना शेतकऱ्यांशी ‘लिंक’ करून समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका
  • कंपनीच्या युनिटमध्येही बियाणे प्रक्रिया करण्याचे काम केले.
  • यंदा ५० एकरांत फुले विक्रम वाण हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम
  • ५ ते १० शेतकऱ्यांमार्फत खपली गव्हाचे बीजोत्पादन
  • अर्थकारण व आश्‍वासक उलाढाल

  • चार वर्षांत सुमारे पाच हजार टन चणा व तूर विक्री
  • पहिल्या वर्षी ४५ लाख रुपये वार्षिक उलाढाल आता तीन कोटींपर्यंत पोचली आहे. यंदा चार कोटींचे उद्दिष्ट.
  • तीन कोटींपेक्षा जास्त रकमेच्या शेतमालाची सरकारसाठी खरेदी
  • संचालक व सभासदांकडून सुरुवातीच्या काळात ठेवी देऊन उभारणीस हातभार
  • हळूहळू कंपनीची पत तयार झाली. मग आर्थिक संस्था व बॅंकांमार्फत निधी उभारला.
  • एसएफएसीच्या (नवी दिल्ली) माध्यमातून इक्विटी ग्रांट मिळवली.
  • तीन कर्जांची पूर्ण परतफेड. त्याच संस्थांकडून नवी मोठी कर्जे मिळवली. (काही विनातारणही)
  • ‘संतुष्ट’ ब्रॅंडची निर्मिती कंपनीने ‘संतुष्ट’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. त्या माध्यमातून अलीकडेच तूर, हरभरा, मूग आदी डाळींची विक्री सुरू केली आहे. रिटेल व्यावसायिकांसह ऑनलाइन पद्धतीचाही वापर होत आहे. मोबाईल ॲपची निर्मिती

  • ‘ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘दृष्टी’ ॲपची निर्मिती. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कंपनीकडील उपलब्ध उत्पादने खरेदी करणे शक्य.
  • आपल्याकडील विक्रीयोग्य मालाची माहितीही कंपनीला देता येणार
  • -हवामान व कृषी सल्ला मिळणार
  • -आत्मा व कृषी विभाग (बुलडाणा) यांनी तयार केलेल्या शेतीमाल विक्रीच्या ॲपचे समन्वयक म्हणून कंपनीकडे जबाबदारी. शेतकऱ्यांचे ‘लिंकेज’ त्यातून शक्य.
  • सन्मान

  • ‘एनसीडीईक्स’कडून आपल्या जून २०२० च्या मासिक पत्रिकेमध्ये कंपनीच्या कामाचे कौतुक
  • यूएस कौन्सिलेट, टाटा सामाजिक विज्ञान संस्था (मुंबई) व बाला विकासद्वारा आयोजित ‘सोशल कनेक्ट’ स्पर्धेमध्ये पहिल्या १० इनोव्हेटिव्ह स्टार्टअप कंपनीला स्थान. स्पर्धेत २०० पेक्षा जास्त उद्योगांचा होता सहभाग.
  • कंपनी प्रकल्पाचे फायदे

  • गटशेतीद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक व तंत्रज्ञान स्वरूपात फायदे
  • शेतीमालाचे तत्काळ वजन होत असल्याने वेळेची बचत
  • मार्केट स्तरावरील काढणीपश्‍चात नुकसान कमी झाले
  • शास्त्रीय पद्धतीचा वापर केल्याने शेतीमालाला योग्य दर
  • शेतकऱ्यांची विविध विषयांवर क्षमता बांधणी
  • सुविधा
  •  ८० टन क्षमतेचा लॉरी वजनकाटा
  • शेतीमाल खरेदी व सुकवणी प्लॅटफॉर्म
  • - चार हजार चौरस फुटांचे गोदाम, तर चार टन प्रति तास क्षमतेचे क्लीनिंग, ग्रेडिंग व पॅकिंग युनिट
  • शेतीमाल वाहतुकीसाठी वाहन
  • संपर्क-  अमित नाफडे, ८५५१९१९२९३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com