agriculture story in marathi, Jalke village of Jalgaon Dist has done development & growth through water conservation works & improved farming. | Agrowon

केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके गावाची ओळख

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021

जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम करून शिवार फुलविले आहे. केळी व कापूस पिकांसाठी गावाने ओळख तयार केली आहे. दुग्ध व्यवसाय, कृषी योजनांची अंमलबजावणी व स्वच्छता मोहीम यामध्येही गावाने उल्लेखनीय कार्य केले आहे

जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम करून शिवार फुलविले आहे. केळी व कापूस पिकांसाठी गावाने ओळख तयार केली आहे. दुग्ध व्यवसाय, कृषी योजनांची अंमलबजावणी व स्वच्छता मोहीम यामध्येही गावाने उल्लेखनीय कार्य केले आहे.
 
जळके (ता. जि. जळगाव) हे जळगाव शहरापासून सुमारे २० किलोमीटरवरील गाव आहे. शिवार सुमारे ४५० हेक्टर असून मध्यम, काळी कसदार जमीन आहे. गावाला बारमाही वाहणारी नदी नाही. गावात २०१४ पूर्वी पाणीसंकट होते. शिवार उजाड होण्याची स्थिती तयार झाली. पाऊस- पाणी अडविण्याची, जिरविण्याची कुठलीही कार्यवाही नव्हती. अशावेळी गाव जलसंधारणाच्या कामांसाठी एकत्र आले. गावातील बोढरे नाल्यातून वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवून नाला खोलीकरण करण्यास सुरुवात झाली.

मदतीचे हात पुढे आले
लोकसहभागातून जलसंधारणासाठी पाच लाख रुपये ग्रामस्थांनी संकलित केले. ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनी अंतर्गत ‘गांधी रिसर्च फाउंडेशन’ने पोकलेन, गुलाबराव देवकर फाउंडेशनने एक लाख, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने एक लाख रुपये दिले. त्यातून तीन किलोमीटर अंतरात नाला खोलीकरण झाले. नाल्यावरील बंधाऱ्यानजीक मातीचा भराव करण्यात आला. यामुळे पाणी वाहून जाण्याचा प्रकार बंद होऊन ते अधिकाधिक जिरू लागले. सन २०१४ पासून २०१७ पर्यंत कामे सुरू राहिली. ग्रामस्थांसह रमेश पाटील, नेमीचंद जैन आदींचा कामांसाठी पुढाकार घेतला.

कामांची फलश्रुती
कामांची फलश्रुती दिसू लागली. नाल्याचे पाणी जिरून शिवाराला लाभ झाला. सुमारे २०० हेक्टर क्षेत्रातील कूपनलिका, विहिरींची जलपातळी वाढली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले आदींनी गावातील कामांची व शेतीची पाहणी केली.

केळी पिकात आघाडी
गावात केळीची ५० हेक्टरपर्यंत लागवड असते. उतीसंवर्धित रोप लागवड प्रामुख्याने असते. ‘फ्रूटकेअर’ तंत्राचा अवलंब होतो. मृग व कांदेबाग बहरांचे नियोजन करून निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. केळीचे अवशेष शेतात गाडून जमीन सुपीकतेबाबत शेतकरी जागरूक झाले आहेत. चंद्रकांत पाटील, प्रशांत पाटील, पी. के. पाटील आदी शेतकरी २५ ते ३० किलोची रास मिळविण्यापर्यंत सातत्याने यशस्वी झाले आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे माजी संचालक डॉ. एच. पी. सिंह, जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील आदींनी केळी विषयी परिसंवाद, पीक पाहणी कार्यक्रम घेतले आहेत.
केळी पंजाब, दिल्ली, काश्मीर आदी ठिकाणी पाठवली जातात. गेली तीन वर्षे किमान ७०० रुपये, तर कमाल १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कपाशीतही आघाडी
शिवारात सुमारे २५० हेक्टरवर कापूस आहे. यातील निम्म्या क्षेत्राला सिंचन सुविधा आहे. ठिबकचा वापर होतोच. डिसेंबरच्या दरम्यान गुलाबी बोंड अळीचा प्रार्दुभाव जाणवतो. ही बाब लक्षात घेता लागवड जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात केली जाते. एकात्मिक कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्काची फवारणी, कामगंध सापळ्यांचा वापर होतो. डिसेंबरमध्ये कापूस पीक काढून क्षेत्र रिकामे केले जाते. प्रादुर्भावग्रस्त पऱ्हाटी किंवा पीकअवशेषांची योग्य विल्हेवाट लावली
जाते. संरक्षित पाणी असलेले शेतकरी कापूस पीक काढून डिसेंबरमध्ये गहू, मका यांची लागवड करून फेरपालट करतात. एकरी आठ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादकता शेतकऱ्यांनी साध्य केली आहे.
तीन वर्षे सरासरी ४८०० रुपये प्रति क्विंटल दर जागेवर मिळाला आहे. थेट विक्रीवर अनेकांचा भर आहे. काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कापूस महामंडळाच्या खरेदी केंद्रात हमीभावात विक्री केली.

विविध योजनांत सहभाग
कृषी योजना राबविण्यात जळके ग्रामस्थ सक्रिय असतात. पोकरा योजनेत गावाचा समावेश असून ५७ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळाला आहे. दोन वर्षे ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात असून हरभरा व सोयाबीनची प्रात्यक्षिके घेतली आहेत. शेतीशाळांचेही आयोजन होते. कृषी सहायक संगीता सोनवणे व पोकरा योजनेचे समूह सहायक जितेंद्र सोनवणे आदींचा प्रबोधनात पुढाकार
असतो. चंद्रकांत पाटील, प्रशांत पाटील, रवींद्र पाटील व संजय पाटील यांनी सामूहिक शेततळे योजनेत सहभाग घेतला आहे. मका पिकात अमेरिकन लष्करी अळी रोखण्यासाठी शेतकरी दोन वर्षे सतत एकात्मिक कीड व्यवस्थापनाची कार्यवाही करीत आहेत.

संत गाडगेबाबा यांचा आदर्श
संत गाडगेबाबा यांनी भेट दिलेले गाव म्हणून जळकेचे नाव आहे. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी स्वच्छता मोहीम व जनजागृतीही केली होते. याच प्रेरणेतून गावाने पाच वर्षे सतत स्वच्छतेच्या स्पर्धेत जळगाव तालुक्यात पहिला, जिल्ह्यात एकदा दुसरा व एकदा तिसरा क्रमांक मिळवून पारितोषिक मिळविले. गावातील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल झाली आहे. सरपंच सुमनबाई वामन मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व गावकरी कार्यरत आहेत.

दूध उत्पादनात सातत्य
अनेक शेतकरी पशुपालन करतात. सत्तर वर्षांपासून सहकारी दूध संस्था कार्यरत आहे. सुभाष पाटील त्याचे अध्यक्ष आहेत. दररोज म्हशीचे ७० लिटर, तर गाईचे ५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. संस्था सतत ‘अ’ वर्गात असून, जिल्हा सहकारी दूध संघाला पुरवठा केला जातो. पंचायत समिती, जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था, बाजार समिती, जिल्हा परिषदेत गावातील मंडळीनी प्रतिनिधित्व केले आहे.

संपर्क- पी. के. पाटील, ९४२१६४११४५, ८६००८८३२४५
जितेंद्र सोनवणे, ८८३०९१६८४७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...