agriculture story in marathi, Jamnadi farmer producer company of Nasik is helping the farmers to raise their income & livelyhood. | Agrowon

जामनदी’ कंपनीद्वारे होतोय जिरायती शेतकऱ्यांचा उत्कर्ष

मुकूंद पिंगळे
शनिवार, 11 एप्रिल 2020

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या अवर्षणग्रस्त तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचे संघटन करून
२०१६ मध्ये वावी येथे जामनदी खोरे फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. सुमारे पाचशे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या या कंपनीने अलिकडील वर्षांत शेतमाल उत्पादन, तंत्रज्ञान, विक्री, पुरवठा, यासह रास्त दरात कृषी निविष्ठा विक्रीद्वारे यशस्वी वाटचाल केली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याचे कंपनीचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या अवर्षणग्रस्त तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचे संघटन करून
२०१६ मध्ये वावी येथे जामनदी खोरे फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. सुमारे पाचशे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या या कंपनीने अलिकडील वर्षांत शेतमाल उत्पादन, तंत्रज्ञान, विक्री, पुरवठा, यासह रास्त दरात कृषी निविष्ठा विक्रीद्वारे यशस्वी वाटचाल केली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याचे कंपनीचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.

 
सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. परिस्थितीवर मात करून शेतीत प्रगती करण्यासाठी
येथील प्रयोगशील शेतकरी एकत्र आले. त्यातूनच युवामित्र सामाजिक संस्था व नाबार्ड यांच्या सहकार्याने ३० डिसेंबर, २०१६ रोजी तालुक्यातील वावी येथे जामनदी खोरे फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात १२० शेतकरी प्रयत्नांतून जोडले गेले. प्रत्येकी एकहजार रुपये भागभांडवल संकलित करण्यात आले. संचालक मंडळाने झपाटून काम करताना शेतकऱ्यांना कार्यपद्धती समजून सांगितली. स्व भांडवलाचा आधार घेत कंपनीने वाटचाल केली ही आर्थिक व्यवस्थापनात जमेची बाजू ठरली आहे.

कंपनीचे उपक्रम
कृषी निविष्ठा केंद्र
कंपनीने आपल्या भांडवलातून कृषी निविष्ठा विक्री केंद्राची उभारणी केली. शेतकऱ्यांना रास्त दरात गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात हा त्यामागील उद्देश होता. शेतकऱ्यांना हंगामनिहाय लागणाऱ्या निविष्ठा व साहित्य त्यातून रास्त दरात मिळू लागले आहे.

डाळिंब विक्री
सदस्य शेतकऱ्यांकडील डाळिंबाला बाजारपेठा देणे हा कंपनीच्या कामकाजाचा पुढचा टप्पा होता. सन २०१७ मध्ये डाळिंब खरेदी करून दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश या राज्यांतील प्रमुख बाजारपेठांमध्ये पुरवठा केला. सुरुवातीच्या टप्प्यात ५५ लाखांची उलाढाल झाली. थेट बांधावर खरेदी करून हाताळणी, प्रतवारीद्वारे हा माल दहा किलो वजनाच्या पेटीतून विकण्यास सुरूवात केली.

कांद्याला बाजारपेठ
पुढील टप्प्यात सुमारे ८० टन कांद्याची खरेदी, हाताळणी, प्रतवारी करून पन्नास किलो गोणीतून दिल्ली बाजारात तो विक्रीसाठी पाठवला. स्थानिक ठिकाणी मार्केटिंग करणाऱ्या कृषक मित्र या कंपनीस तो पुरवला. त्याद्वारे मार्केटिंगचे तंत्र कंपनीने अवगत केले.

सूक्ष्मसिंचनाला प्रोत्साहन
पाणीटंचाई लक्षात घेता २०१८ साली महिंद्रा कंपनीसोबत सोबत करार करून शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था उभी करण्यासाठी २५ टक्के अनुदानाची सुविधा दिली. डाळिंब, कलिंगड, शेवगा पेरू, कांदा आदी पिकांसाठी त्याचा अवलंब सुरू झाला. त्यातून पाण्याचा काटेकोर वापर सुरू होऊन
उपलब्ध जलसाठ्याची कार्यक्षमता वाढली. अधिक क्षेत्र सिंचनाखाली आले.

जामनदी कंपनीविषयी

 • -स्थापना- डिसेंबर २०१६
 • -कार्यक्षेत्रातील गावे: वावी, पांगरी, पात्रे, मीठ-सागरे, काळे, सायाळे, शहा, कारवाडी, भरतपूर, कोळगाव मिरगाव
 • -सन २०१६-१७ असलेली १२० ही सदस्य संख्या आता ५०० पर्यंत पोचली
 • आहे.

-संचालक- १३, विलास चंद्रभान पगार हे अध्यक्ष तर मच्छिंद्र सीताराम चिने उपाध्यक्ष आहेत.
यांसह व्यवस्थापक म्हणून किशोर चिने, कृषी निविष्ठा केंद्र प्रतिनिधी, एक मार्केटिंग प्रतिनिधी तसेच
युवा मित्र संस्थेचा प्रतिनिधी कार्यरत आहे.

-वार्षिक उलाढाल

आर्थिक वर्ष                   :उलाढाल (रूपये)

२०१६-१७                          :१,४७,०००

२०१७-१८                         ३,७३,९६८

२०१८-१९                        २५,१४,२६७

२०१९-२०                        ५७,१८,३६८

नाबार्डचे पाठबळ
अल्प मनुष्यबळात अधिकाधिक स्वभांडवलात काम करण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो.
सुरुवातीच्या काळात नाबार्डकडून सचिवाच्या वेतनापोटी सात हजार रुपये प्रति महिना मदत मिळायची. कार्यालय फर्निचरच्या खरेदीसाठीही प्रोत्साहनपर मदत मिळाली आहे.

कंपनीचे प्रमुख उद्देश व सेवा

 • शेतकऱ्यांना माफक दरात कृषी निविष्ठा व साहित्य विक्री
 • परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे संघटन
 • बाजारपेठांचे निरीक्षण, शोध व मागणीनुसार पीक निवड
 • मागणी-पुरवठा यांचा ताळेबंद करून शेतमाल विक्री नियोजन
 • मार्गदर्शन व प्रशिक्षण
 • सामूहिक ताकदीची जाणीव करून जीवनमान उंचावणे
 • दुग्धव्यवसाय संबंधित साहित्याचा पुरवठा
 • पीकनिहाय तज्ञांचे मार्गदर्शन
 • कृषी पूरक उद्योगासाठी प्रशिक्षण व मेळाव्यांचे आयोजन
 • शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी व विक्री

शेतीत संघटनात्मक कार्य
मिरची, कांदा, भोपळा या पिकांची गटशेती करण्यात येत आहे. कंपनीने बाजार व्यवस्थेशी ‘लिंक’ तयार केल्याने व्यापारी, मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी झाला. त्यामुळे विक्री साखळी मजबूत होण्यास मदत झाली. कंपनीच्या निविष्ठा केंद्राच्या माध्यमातून बियाणे पुरवले जातात. पीक व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. सदस्यांना प्रकाश सापळेही अनुदानावर उपलब्ध केले आहेत.

तंत्रज्ञान विस्तारासाठी उपक्रमांचे आयोजन 
काढणीपश्‍चात मालाची विक्रीव्यवस्था कंपनीकडून पाहिली जाते. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, याठिकाणी भेटी दिल्या जातात. सिंचनाचे प्रयोग, कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन, साठवणूक व्यवस्था यावर मुख्य भर दिला जातो.

राष्ट्रीय पातळीवर सन्मान
‘जामनदी’ शेतकरी कंपनी’चा ईरमा सामाजिक संस्था, नाबार्ड, यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला आहे. गुजरातमधील आनंद जिल्ह्यात आयोजित ‘आध्यम’ हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ‘शेतकरी उत्पादक कंपनीच्या भावी योजना’ या स्पर्धेत या कंपनीसह नऊ राज्यांतील १०० शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला. यात शेतकरी कंपन्याकडून पुढील पाच वर्षांतील शेतकऱ्यांसाठी असलेल्या शाश्वत योजनांचा अहवाल मागविण्यात आला होता. ‘जामनदी’ कंपनीने बाजी मारत या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. रोख रुपये ३० हजार व पारितोषिक मिळाले.

संपर्क :
विलास पगार (चेअरमन) ९८२२४१९३१०
किशोर चिने (व्यवस्थापक) ९७३०००३९४९ 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...