संकटातही ऐंशीहजार लेअर पक्षी उत्पादनाची धडपड 

ॲग्रोवने दिले बळ मेहनतीच्या बळावर रावणकर यांनी पोल्ट्री क्षेत्रात यश संपादन केले. या यशात ॲग्रोवनचा मोठा वाटा राहिला असल्याचे ते सांगतात. पोल्ट्री व्यवसायासाठी आधुनिक साधनसामग्री व अन्य स्रोतांचा वापर करण्याबाबकत ॲग्रोवनने मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी सांगितले.
खरवाडी येथील जयप्रकाश रावणकर यांचा लेअर कोंबड्यांचा व्यवसाय
खरवाडी येथील जयप्रकाश रावणकर यांचा लेअर कोंबड्यांचा व्यवसाय

अमरावती जिल्ह्यात खरवाडी येथे सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी जयप्रकाश रावणकर यांनी १०० लेअर कोंबड्यांपासून पोल्ट्री उद्योगाला सुरवात केली. अत्यंत चिकाटी, धाडस, पक्ष्यांचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन या आधारे दीड लाख पक्षी क्षमतेपर्यंत उल्लेखनीय वाढ केली. आज पशुखाद्यांचे वाढते दर व उत्पादन खर्चामुळे ८० हजार पक्ष्यांच्या संख्येत या व्यवसाय स्थिरतेवर ठेवण्याची रावणकर यांची धडपड स्तुत्य म्हणावी लागेल.    अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यातील खरवाडी येथील जयप्रकाश रावणकर यांनी जिल्ह्यात आदर्श म्हणावी, अशी लेअर कोंबड्यांची पोल्ट्री सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी सुरू केली. त्यांचे वडील दत्तात्रय ऊर्फ नानासाहेब रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात वरिष्ठ अधिकारी पदावर होते. जयप्रकाश यांनी नोकरीपेक्षा शेतीवरच भर दिला. त्यांची ४० एकर शेती आहे.  पोल्ट्री व्यवसायाची वाटचाल  जयप्रकाश यांनी १९७८ मध्ये कृषी पदवी संपादन केली आहे. शेतीत करिअर सुरू करताना पोल्ट्री किंवा दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार संकरित एचएफ गायींची खरेदी केली. त्यासाठी बॅंकेकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतु, पुढे अर्थकारण न जुळल्याने व्यवसाय फायदेशीर नसल्याचे लक्षात आले. अधिक अभ्यासाअंती त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याची जोखीम उचलली. सुरवातीला ८० हजार रुपये कर्जाने सुरवात केली. हळूहळू व्यवसायातील अनुभव वाढत गेला. पक्ष्यांची वृध्दी होत गेली. मग टप्प्याटप्प्याने ७२ लाखांप्रमाणे कर्ज घेत भांडवलवृध्दीही झाली. अंड्यांच्या विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्यात खूप शोधाशोध करावी लागली. पोल्ट्री व्यावसायिकांकडून उत्पादित होणाऱ्या अंड्यांमध्ये गावरान कोंबड्यांच्या अंड्यांप्रमाणे पौष्टिक घटक नसल्याचा समज रुढ होता. त्यामुळे ग्राहकच मिळत नव्हते असे जयप्रकाश सांगतात. त्यामुळे चार ते पाच दिवस अंडी संकलित करून अमरावती येथे विकावी लागायची. परंतु चिकाटी, सातत्य, ग्राहक व व्यापारी मिळवण्याचे प्रयत्न अखेर फळाला आले. रावणकर यांचा व्यवसाय नफ्यात व स्थिरतेकडे आला.  सध्याचा व्यवसाय दृष्टिक्षेपात 

  • चांदूर बाजार-अमरावती मार्गावरील खरवाडी येथे व्यवसायाचे ठिकाण 
  • क्षमता एक लाख ६० हजार पक्ष्यांची 
  • सद्य:स्थितीत पक्षी सुमारे ८० हजार 
  • वर्षभरात सुमारे चार ते पाच बॅचेस 
  • शंभर आठवडे एक बॅच चालते 
  • त्या काळात प्रतिपक्ष्यांपासून ३२० ते ३४० अंड्यांची उत्पादकता 
  • शेड 

  • १२० बाय ३३ फूट आकाराची १२ शेडस. प्रतिशेडमध्ये पाच हजार पक्ष्यांचे संगोपन 
  • तसेच १६० बाय ३६ फुटाच्या शेडमध्ये सातहजार पक्षी 
  • नव्याने ६०० बाय ४८ फूट आकाराची प्रत्येकी दोन शेडस बांधण्याचे काम 
  • उन्हाळ्यात तापमान नियंत्रित करण्यासाठी शेडमध्ये फॉगर्स 
  • टीनपत्र्यांवर तणस गवताचे आच्छादन 
  • उत्पादन व विक्री 

  • दररोजचे अंडी उत्पादन सुमारे ७० हजार 
  • व्यापारी व ग्राहक जागेवर येऊन खरेदी करतात. यात चांदूरबाजार, परतवाडा, मोर्शी, अकोट, अंजनगाव, जळगाव खांदेश, ब्राम्हणवाडा या गावांसह मध्यप्रदेशातील बैतूल, मुलताई, भोपाळ या सीमेवरील राज्यांचा समावेश 
  • फीडमील व पशुखाद्य वितरण कल्पकता  सद्य:स्थितीत दररोज १० टन पशुखाद्याची गरज भासते. पशुखाद्य पक्ष्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी खास ट्रॉली तयार करून घेण्यात आली आहे. त्यास गिर बॉक्‍स, शाफ्ट आदींची सुविधा दिली आहे.  दहा हजार पक्ष्यांमागे सव्वा टन पशुखाद्य लागते. ट्रॉली तयार करण्यासाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च आला. मजूरांकरवी ट्रॉली ढकलत पशुखाद्याचे वितरण होते.  चाळीस व्यक्‍तींना रोजगार  व्यवसायात ४० मजुरांना रोजगार दिला आहे. त्यांच्या निवासाची सोय याच ठिकाणी केली आहे. परिसरात पाण्यासाठी २० हजार लिटरची टाकी उभारली आहे. त्या खालील मोकळ्या जागेत कार्यालय बांधले आहे.  व्यवसाय स्थिर ठेवण्यात अडचणी  रावणकर म्हणाले, आत्तापर्यंत हा व्यवसाय किफायतशीर पणे सुरू होता. अलकडे मात्र मका, तांदूळ चुरी वा अन्य पशुखाद्याचे दर वाढल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. सोयाबीन ढेपेचे दर प्रती टन ३० हजार रुपयांवरुन ३४ हजार रुपये, मका १३०० रुपये प्रतिक्‍विंटलवरुन २३०० रुपये तर तांदूळ चुरी १३५० रुपये प्रतिक्‍विंटल दरावरून १९०० रुपयांपर्यंत गेली आहे. सध्या अंड्याचा दर ३ रुपये आहे. पण, त्याचा उत्पादन खर्च ३ रुपये ४० पैसे आहे. सध्या व्यवसाय सुरू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. व्यवसायातून कोंबडीखत मिळते. शेतात वापरून उर्वरित खताची विक्री चार हजार रुपये प्रतिट्रॉली दराने होते. वर्षभरात त्यातून सुमारे साडेसात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, व्यवसायातील खर्च वाढल्याने ते उत्पन्न देखील पुरेसे पडत नाही.  ॲग्रोवने दिले बळ  मेहनतीच्या बळावर रावणकर यांनी पोल्ट्री क्षेत्रात यश संपादन केले. या यशात ॲग्रोवनचा मोठा वाटा राहिला असल्याचे ते सांगतात. पोल्ट्री व्यवसायासाठी आधुनिक साधनसामग्री व अन्य स्रोतांचा वापर करण्याबाबकत ॲग्रोवनने मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी सांगितले. रावणकर यांच्यापासून प्रेरणा घेत अमरावती ते चांदूर बाजार मार्गावर सुमारे ५० पेक्षा अधिक पोल्ट्री व्यवसायाची उभारणी झाली. युवकांचा कल पूरक व्यवसायाकडे वाढीस लागल्याचे त्यातून दिसून येते.    संपर्क- जयप्रकाश रावणकर- ९९२२१०२००१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com