भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
यशोगाथा
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे मॉडेल
यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४० सदस्य अशा चव्हाण कुटुंबाची एकी शेतीतून भक्कम व अजोड झाली आहे. बहुविध पीक पद्धती, पोल्ट्रीतील करार शेती व शेळीपालन असा प्रतिकूल स्थितीत एकात्मिक शेतीचा आदर्श या कुटुंबाने उभारला आहे.
यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४० सदस्य अशा चव्हाण कुटुंबाची एकी शेतीतून भक्कम व अजोड झाली आहे. बहुविध पीक पद्धती, पोल्ट्रीतील करार शेती व शेळीपालन असा प्रतिकूल स्थितीत एकात्मिक शेतीचा आदर्श या कुटुंबाने उभारला आहे.
लातूर जिल्ह्यात यशवंतवाडी येथील पाच भावांच्या एकत्रित चव्हाण कुटुंबाकडे सुमारे ६० एकर शेती आहे. खरीप, रब्बी पिकांसह दोन हेक्टर क्षेत्र शेळीपालन, एक एकर करारांतर्गत पोल्ट्री चार हेक्टर भाजीपाला तर तीन हेक्टर ऊस क्षेत्र आहे.
प्रत्येकाची जबाबदारी
कुटुंबात मुख्य पाच भावंडांपैकी माधवराव भुजंगराव चव्हाण सर्वात मोठे व कर्ते पुरुष. प्रेमाने त्यांना अण्णा संबोधतात. निर्णयाचे अधिकार त्यांनाच. त्यानंतर येणारे किशनराव भाजीपाला शेती, वसंतराव शेळीपालन, हनुमंतराव कोरडवाहू शेती तर सर्वात लहान गणपतराव यांच्याकडे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. नंतरच्या पिढीत ११ भावंडे आहेत. त्यानुसार बागायती शेती ज्ञानोबा व माधवराव, कुकुटपालन सतीश, विशाल व शरद यंत्रे, वाहन सचिन तर शेळीपालन निवृत्ती पाहतात. प्रत्येक सदस्याला आवडीनुसार काम देण्याच्या माधवरावांच्या नेतृत्वगुणामुळे प्रत्येकजण आपली जबाबदारी आनंदाने आणि नेटाने पार पाडतो. त्यातूनच कुटुंबाची एकी अधिक बळकट झाली आहे. सर्व सदस्यांची संख्या ४० पर्यंत आहे.
शेती पद्धती
- दहा बोअरवेल, एक विहीर, एक शेततळे अशी सिंचनसाधने
- १० एकरांत पीकफेरपालटचे तंत्र. बारमाही भाजीपाला. त्यामुळे हाती पैसा खेळता राहतो.
- भाजीपाला विक्री स्वतःच्या वाहनाने अमरावती, निजामाबाद पुणे लातूर परळी नागपूर आधी बाजार पेठांमध्ये.
- अलीकडे सहा एकरांत सीताफळ, आंतररीक कलिंगड
- तीन वर्षांपूर्वी पाच एकरांत १४ बाय १० फुटावर प्रत्येकी सुमारे दोनहजार मिलिया डुबिया व चंदन लागवड. भविष्यासाठीची ही गुंतवणूक.
- करारांतर्गत पोल्ट्री उद्योग
- सन २०१५-१६ मध्ये कुटुंबाने करारांतर्गत ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगाची कास धरली.
- सतीश यांना विशाल व शरद ही भावंडे मदत करतात.
- श्रावण महिना वगळता अन्य काळात संगोपन सुरूच
- वीस हजारांपर्यंत अल्प खर्चात शेड
- सुमारे १६ हजार पक्षांच्या वर्षभरात सुमारे ५ ते ६ बॅचेस
- एक दिवसाच्या पिल्लांची ४५ दिवसांपर्यंत वाढ
- ६६ रुपयांच्या खर्चात कोंबडीचे वजन एक किलोपर्यंत करण्याची जबाबदारी
- निर्धारित खर्चात प्रति किलो पक्षामागे साडेपाच रुपये दर कंपनी देते.
- खर्च- वाढ, घटीवर उत्पन्नाचे गणित
- प्रत्येक शेडभोवती वृक्ष लागवडीतून नैसर्गिकरित्या तापमान नियंत्रण
- प्रति बॅचपासून १२ ते १५ ट्रॉली कोंबडीखत. त्याचा शेतातच वापर. त्यामुळे वर्षाला सेंद्रिय खतांवरील दोन लाखांपर्यंत खर्चात बचत.
- कंपनीकडून खाद्य, एक दिवसाचे पक्षी, लसीकरण, पशुवैद्यकाची सुविधा
- वर्षाकाठी सुमारे सहा ते सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न.
- प्रति पक्षी तयार करण्यासाठी ४ ते साडेचार किलो खाद्य वापर.
- सातव्या, चौदाव्या व २१ दिवशी असे तीन वेळा लसीकरण
बंदिस्त शेळीपालन
सन २०१५ मध्ये उस्मानाबादी शेळ्या व आफ्रिकन बोअर यांच्यापासून दोन लाख रुपयांत बंदिस्त शेळीपालनाला सुरवात केली. वीस ते २२ किलो वजनाचा बोकड झाला की विक्री तसेच पाटीचे संगोपन करून उद्योगवाढ असे सूत्र ठेवले. दीडशेपर्यंत शेळीपालनाचा विस्तार केला. सध्याच्या घडीला लहान- मोठ्या धरून ८० पर्यंत शेळ्यांचे संगोपन होते.
ठळक बाबी
- दिवसभर मुक्त संचारासाठी एक एकर तारेचे कुंपण
- कुंपणात बांधावर झाडांचा नैसर्गिक सावलीसाठी तर चढ उताराचा बागडण्यासाठी वापर
- दोन एकरांत खाद्यासाठी सुबाभूळ लागवड
- रात्री शेळ्यांच्या सुरक्षेसाठी ६० बाय २० फुटाचे बंदिस्त शेड
- एक एकराच्या कुंपणातच दिवसा खाण्यासाठी 100 बाय 70 आकाराच्या साध्या शेडची निर्मिती.
- वर्षाकाठी ३० ते ४० बोकडांची विक्री
- वीस किलो वजनाच्या बोकडाची किलोला ५०० ते ६०० रुपये दराने विक्री
- ५० ग्रॅम प्रतिदिन प्रति शेळी खुराक. सरकी पेंड, घरचेच गहू, सोयाबीन, मका आदींच्या भरड्याचा वापर.
- सुका चारा-खुराक-हि रवा चारा- पुन्हा सुका व झाडपाला अशी दिवसभराची खाद्यव्यवस्था
- जून, जुलै दरम्यान तीन वेळा लसीकरण
- औषधी, खुराक आदींवर वर्षाला सुमारे २५ हजाराचां खर्च
- वार्षिक उत्पन्न- सुमारे चार लाखांपर्यंत.
यांत्रिकीकरणावर भर
श्रम करण्याच्या तयारीसोबत यांत्रिकीकरणाची जोडही दिली आहे. दोन ट्रॅक्टर्स, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, पंजी, नांगर, मोगडा, पाळी यंत्र, रोटावेटर, बेड यंत्र, मालवाहतुकीसाठी पिकअप, कुटुंबातील व्यक्तींना जाण्या-येण्यासाठी दोन वाहने आदींचे व्यवस्थापन ज्ञानोबाराव करतात. कल्पकतेतून त्यांनी साठवणुकीच्या शेडमधील भुसा हलविण्याचे यंत्र, ट्रॅक्टरवरील कोळपणी यंत्र, बैलचलित दहा किलो वजनाचा व आठ फूट रुंद कुळव आदींची निर्मिती केली आहे.
नैसर्गिक आपत्ती
दहा वर्षांपूर्वी होल्स्टिन व जर्सी गायींचे संगोपन केले. त्यात बऱ्यापैकी यशही मिळाले.
मात्र कालांतराने अडचणी आल्या. त्यामुळे पूर्ण बंद नाही मात्र घरच्या दुधापुरता व्यवसाय मर्यादित ठेवला. बदल स्वीकारताना सुमारे १५ वर्षे १५ एकरांपर्यंत द्राक्षशेतीही करून पहिली. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे ती थांबवावी लागली.
संपर्क- माधवराव चव्हाण-८८८८६८२४९०
निवृत्ती चव्हाण९५६१३३९९५२ (शेळीपालन)
सतीश चव्हाण-९७६६२२९९७० (कुकुटपालन)
फोटो गॅलरी
- 1 of 94
- ››