दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती- कुटुंबाचे अर्थकारण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील ज्योती जीवन पावसकर यांनी पतीच्या मदतीने शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली. अखंड कष्ट, प्रशिक्षण व नेटके व्यवस्थापन यातून जनावरांची संख्या वाढवली. त्यातून शेती व कुटुंबाचे अर्थकारण उंचावले.
दुग्धव्यवसााय सांभाळणाऱ्या ज्योती पावसकर.
दुग्धव्यवसााय सांभाळणाऱ्या ज्योती पावसकर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील ज्योती जीवन पावसकर यांनी पतीच्या मदतीने शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली. अखंड कष्ट, प्रशिक्षण व नेटके व्यवस्थापन यातून जनावरांची संख्या वाढवली. त्यातून शेती व कुटुंबाचे अर्थकारण उंचावले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) हे माणगाव खोऱ्यातील प्रगतिशील गाव म्हणून ओळखले जाते. ‘एसआरआय’ पद्धतीचा स्वीकार करून भात उत्पादनात दीडपट ते दुपटीने वाढ केलेल्या या गावात दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसायांना चालना मिळाली आहे. गाव परिसरातील आंबेरी-निवजे मार्गावरील गणेश मंदिरानजीक पावसकर कुटुंब राहते. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या गावातील बहुतांशी शेतकऱ्यांप्रमाणे हे कुटुंब खरिपात भात तर उन्हाळ्यात चवळी, कुळीथ, मिरची व अन्य भाजीपाला पिके घेत होते. ज्योती यांची धडाडी कुटुंबात एकूण सहा माणसे. सर्व मदार शेतीवरच. शेतीची जबाबदारी घरातील ज्योती व पती जीवन यांच्यावर होती. घरखर्चाचा ताळमेळ घालताना त्यांची चांगलीच दमछाक व्हायची. चारही मुले शिक्षण घेत असल्यामुळे खर्चाचा भार होता. घर व शेतीची कामे आटोपल्यानंतर मोलमजुरीचे काम दांपत्य करायचे. दिवसभर काम केल्यानंतर ७० रुपये मजुरी मिळायची. त्यातून आर्थिक नियोजन उभे करावे लागे. अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागे. मिळत नव्हता. घरी पूर्वीपासूनच जनावरे होती. परंतु दुधाचा वापर घरगुती वापरासाठीच होत असे. त्यातून अर्थकारणाला भरीव चालना मिळत नव्हती. आशेचा किरण सन २०१० मध्ये भगीरथ प्रतिष्ठानने निवजे गावात कार्य करण्यास सुरुवात केली. शेतीपूरक व्यवसायावर भर असलेल्या डॉ. प्रसाद देवधर यांनी संस्थेच्या माध्यमातून चळवळ सुरू केली. दुग्ध, कुक्कुटपालन, बायोगॅस, गांडूळ खत, सिंचन आदी विषयांवर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे होऊ लागले. यातील एक- दोन मेळाव्यांना ज्योतीदेखील उपस्थित होत्या. दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यासमोर आशेचा किरण निर्माण झाला. गावातील काहींनी हा व्यवसाय करण्याची तयारी दर्शविली. त्यात ज्योती यांचाही समावेश होता. आर्थिक घडी बसवायची तर या व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे ज्योती यांना मनोमन पटले. हा निर्धार संस्थेकडे बोलून दाखविला. त्यांना तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी माडखोल येथील संस्थेत पाठविण्यात आले. तेथे जनावरांचे आजार, दूध गुणवत्ता, गोठा व्यवस्थापन आदी सर्व बाबी जाणून घेता आल्या. प्रशिक्षणानंतर एक प्रकारे आत्मविश्‍वास निर्माण झाला. दुग्ध व्यवसायास प्रारंभ कर्ज काढून दोन म्हशी खरेदी केल्या. परंतु काही दिवसांतच एका पाठोपाठ एक अशा दोन म्हशी आजारी पडल्या. त्याचा दुग्धोत्पादनावर परिणाम झाला. याचा धक्का ज्योती यांना बसला. डोक्यावर कर्ज असल्यामुळे परतफेडीचा त्या सतत विचार करीत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी म्हशींवर उपचार केले. व्यवस्थापन सुधारले. म्हशींची प्रकृती ठणठणीत झाल्यावर पुन्हा व्यवसायातील बारकाव्यांवर भर दिला. त्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही. दुग्ध व्यवसायातील बाबी

  • एकत्रित पाच एकर शेती. खरिपात दोन एकरांत भात.
  • दुग्ध व्यवसायाला ११ वर्षे पूर्ण झाली.
  • दोन म्हशींपासून सुरू केलेल्या गोठ्यात लहान- मोठी अशी १७ जनावरे.
  • प्रति दिन १५ ते १६ लिटर दूध संकलन. सरासरी ४० रुपये प्रति लिटर दर.
  • निवजेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेकडे विक्री.
  • *वार्षिक उलाढाल- सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत.
  • गांडूळ खत युनिट व परसबागेतील कुक्कटपालनातूही आर्थिक आधार
  • सन २०१० मध्ये दोन पंढरपुरी म्हशी खरेदी करण्यासाठी बचत गटांकडून ३५ हजार रुपये कर्ज घेतले.
  • भगीरथ प्रतिष्ठानने २० हजार रुपये उपलब्ध करून दिले.
  • २०१२ मध्ये गोठा बांधण्यासाठी एक लाख रुपये कर्ज.
  • २०१५ मध्ये आणखी दोन म्हशी घेतल्या.
  • २०१६ मध्ये शेततळे.
  • प्रगतीकडे वाटचाल

  • संस्था, बँकेकडून घेतलेल्या कर्जांची वेळेत परतफेड घेतल्यामुळे पत निर्माण झाली.
  • दुग्ध व अन्य व्यवसायांतील उत्पन्नातून दोन मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. एक मुलगा बारावीत तर एक दहावीत आहे.
  • दोन बायोगॅस असून इंधन खर्चात बचत केली आहे.
  • दैनंदिन वापरासाठी लागणारे दूध, दही, तुपाची उपलब्धता
  • दैनंदिन व्यवस्थापन पावसकर कुटुंबाचा पहाटेपासूनच दिनक्रम सुरू होतो. ‘अलार्म’ लावल्याप्रमाणे म्हशी पाच वाजताच आवाज देतात. सर्वप्रथम गोठ्याची साफसफाई व पाण्याने धुऊन घेतला जातो. जनावरांच्या हालचालींचे निरीक्षण केले जाते. कोणती म्हैस प्रतिसाद देत नाही, आवाज देत नाही हे जाणून घेतल्यानंतर पुढील कामाला सुरवात केली जाते. दूध काढणे, खाद्य घालणे ही कामे होतात. दूध डेअरीला पुरवण्याच्या कामांत मुलांची मदत होते. पती जीवन म्हशींना चरण्यासाठी घेऊन जातात. ज्योती चाऱ्याची कापणी करून आणतात. पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत काम अखंड सुरू असते. जनावरांचे प्रेम माणसे माणसांवर जितके प्रेम करीत नाहीत त्यापेक्षा कित्येक पटीने जनावरे माणसांवर आणि सोबतच्या जनावरांवर प्रेम करतात. एक दिवस जरी गोठ्यात गेलो नाही तर जनावरे हंबरून अस्वस्थ करून टाकतात. एवढेच नाही तर संगतीतील एखादे जनावर बरोबर नसेल तर त्याचा परिणाम त्यांच्यावर दिसून येतो असे ज्योती आवर्जून सांगतात. प्रतिक्रिया दुग्ध व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक घडी बसवू शकलो. कष्टाच्या दुग्ध व्यवसायातून मिळालेले पैसे हाती आल्यानंतर वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते. त्यातून घरखर्च चालवण्याबरोबरच चारही मुलांना चांगले शिक्षण देऊ शकलो. दोन मुली पदवीधर झाल्या हे समाधान आहे. -ज्योती पावसकर, ९४०५४००७९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com