आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे प्रगतीपथावर

गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोरडवाहू अभियान राबविले होते. त्याद्वारेमहिला शेतकऱ्यांना विविध पिकांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अभ्यासदौरे केले. यात सुमारे शंभर महिला सहभागी झाल्या. त्यांना शेती विकासाची चांगली दिशा मिळाली आहे. -कुसुम संजय केदारी सरपंच
कडदे गावात सुधारीत तंत्राद्वारे भात व फूलशेती केली जाते.
कडदे गावात सुधारीत तंत्राद्वारे भात व फूलशेती केली जाते.

पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. चारसूत्री पद्धतीने भात लागवड करून हेक्टरी उत्पादनवाढ घेण्यात ते तरबेज झाले आहेत. त्यासोबतच काही शेतकरी पॉलिहाऊसद्वारे संरक्षित शेतीचा अवलंब करू लागले आहेत. दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालनाचीही जोड देत अर्थकारण उंचावत गावाने विकासाची दिशा पकडली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शहरीकरण वाढत असल्याने येथील जमिनींना सोन्याचे भाव आले आहे. मात्र काही शेतकरी जमीन विक्रीमध्ये न गुंतता आपल्या शेतीच्या विकासाकडेच लक्ष देत आहेत. तालुक्यातील कडदे गावातील शेतकऱ्यांबाबत असेच म्हणता येईल. गावात सुमारे २००० ते ३००० मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात भाताचेच मुख्य पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गावात २०१४ पूर्वी ऊस, भात, ज्वारी, बाजरी, फूललशेती, भुईमूग, सोयाबीन अशी पारंपरिक पिके घेतली जायची. मात्र पारंपरिक शेतीत उत्पादन कमी मिळत असल्याने गावातील शेतकऱ्यांना कुटूंब चालविणे अडचणीचे झाले होते. आधुनिक शेतीकडे वाटचाल पाच वर्षांपूर्वी कृषी विभागाने गावात कोरडवाहू क्षेत्र विकास अभियान राबविण्यास सुरवात केली.कृषी सहायक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येकी एक एकर याप्रमाणे चारसूत्री भात लागवड पद्धतीची ८५ प्रात्यक्षिके राबवण्याचे ठरले. हळूहळू त्याला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला.त्यातून या तंत्रज्ञानाखालील क्षेत्रात वाढ दिसू लागली. कडदे गावातील शेती- दृष्टिक्षेपात

  • भौगोलिक क्षेत्र - ५८३.२२ हेक्टर
  • दरवर्षी भाताखालील क्षेत्र - १५० हेक्टरच्या दरम्यान
  • चारसूत्री पद्धतीने लागवड - ५० ते ६० टक्के
  • सुमारे ५ ते ७ हेक्टरवर संरक्षित शेतीचा अवलंब
  • रब्बी हंगामात सुमारे ३० - ३५ हेक्टरवर टोमॅटो व भाजीपाला
  • ४० ते ५० हेक्टर - ऊस, २० ते २५ हेक्टर - गहू, ज्वारी
  • सुधारीत तंत्राचा अवलंब

  • पूर्वी भातशेतीत बैलांच्या सहाय्याने नांगरणी, वखरणी व्हायची. नवीन तंत्रज्ञानाची माहिती झाल्यानंतर
  • कृषी विभागाच्या माध्यमातून ट्रॅक्टर, पॉवर टिलरची खरेदी करून त्याचा लाभ घेतला आहे.
  • गावात दोन कृषी सेवा केंद्रे असल्याने चांगल्या दर्जाचे भात बियाणे शेतकऱ्यांना गावातच उपलब्ध होते.
  • दरवर्षी चारसूत्री पद्धतीने सुमारे दीडशे हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन असते. त्यासाठी वाफे पद्धतीचा अवलंब करून रोपवाटिका तयार केली जाते.
  • बीजप्रक्रियेनंतर एकरी १५ ते २० किलो याप्रमाणे इंद्रायणी वाणाचा वापर करून रोपे तयार केली जातात. - गरजेनुसार तणनाशकाचा वापर केला जातो.
  • रोपे साधारणपणे २५ दिवसांनंतर लागवडयोग्य होतात. ट्रॅक्टर व बैलांच्या सहाय्याने चिखलणी होते. -
  • अनुभवानुसार ३० बाय २० सेंटिमीटर अंतरावर लागवड होते.
  • यामुळे रोग- किडींचे प्रमाण कमी होते. भाताची वाढ चांगली होऊन उत्पादनात भरीव वाढ होत असल्याचे
  • शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापनात युरिया ब्रिकेटचा वापर केला जातो.
  • भाताला अधिक पाणी लागते असा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. मात्र पाण्याचे योग्य नियोजन करून काटेकोर पाण्यातही चांगले उत्पादन घेता येते हे कडदेकरांनी सिद्ध केले आहे.
  • मजुरांद्वारे भाताची काढणी होते. त्यानंतर भाताची बांधणी करून यंत्राद्वारे मळणी होते.
  • मळणी केलेल्या भाताचे ग्रेंडिंग करून पॅकिंग केले जाते. त्यासाठी गावातच 'जय मल्हार राईस मिल' ही आधुनिक राईसमील भात उत्पादक रमेश शेंडगे यांनी सुरू केली आहे.
  • उत्पादन पूर्वी हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत भाताचे उत्पादन व्हायचे. चारसूत्री पद्धतीचा अवलंब केल्यानंतर उत्पादनात वाढ होऊ लागली. सध्या प्रति हेक्टरी ५० ते ते ५५ क्विंटल उत्पादन मिळत आहे. काही अपवादात्मक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ८० क्विंटलहून अधिक उत्पादन मिळत आहे. पॉलिहाऊस उभारणी गावात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सुरवातीला एका पॉलिहाऊसची उभारणी झाली. त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा दिसून आल्याने टप्प्याटप्प्याने सुमारे ५-७ हेक्टरवर पॉलिहाउसेस उभारण्यात आले. सध्या त्यात जरबेरा, गुलाब अशी फुलपिके घेण्यात येत आहेत. या उच्च तंत्रज्ञान शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ठिबक व मल्चिंग तंत्राचा अवलंब गावात ठिबक सिंचन व पॉली मल्चिंग तंत्राचाही वापर वाढला आहे. यामुळे पाण्याची बचत होण्यासोबत पिकाची गुणवत्ताही वाढली आहे. ‘जलयुक्त’च्या कामावर भर गावात कोरडवाहू शेती अभियान २०१४-१५ मध्ये राबविण्यात आले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०१५-१६ मध्ये गावात दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याची साठवणूक होऊन भूजलपातळीत वाढ झाली आहे. पिण्यासाठी, सिंचनासाठी तसेच पिकांसाठी लागणारी पाण्याची गरज ७० ते ८० टक्क्यापर्यंत भागविण्यात यश आले आहे. मजगीकरणाचे कामही करण्यात आले आहे. त्यामुळे पडीक जमीन पिकांखाली आली आहे. पूरक व्यवसाय लागले वाढीस गावातील शेतकरी दुग्ध व कुक्कुटपालनाकडे वळाल्याचे दिसून येते. सुमारे १५ ते २० शेतकऱ्यांकडे ३०० हून अधिक दुभती जनावरे आहेत. दररोज सुमारे ४०० ते ५०० लिटर दूधसंकलन होते. पुणे ही त्यासाठी बाजारपेठ असून महिन्याला सहा ते सात लाख रुपयांची उलाढाल होते. करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायही बहरला आहे. गावात सुमारे २५ हजार पक्षांची क्षमता असलेले शेडस आहेत. त्यातून महिन्याला चांगली आर्थिक उलाढाल होते. अर्थकारण सुधारतेय गावातील शेतकरी ऊस, सोयाबीन, ज्वारी, गहू, भुईमूग या पिकांचेही हंगामनिहाय उत्पादन घेतात. त्यामुळे वर्षभरात खर्च वजा जाता चांगले उत्पन्न हाती येते. त्यातून कपटूंबाचा आर्थिक खर्च निघण्यास मदत होते. भात शेती, संरक्षित शेती, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायातून मोठी उलाढाल होऊन गावचे अर्थकारण बदलण्यास मोठी मदत झाली आहे. शेतकरी प्रतिक्रिया  दरवर्षी सुमारे बारा एकरांवर भात पीक असते. सहा वर्षांपासून चारसूत्री पद्धतीने लागवड करतो. त्यातून उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. -बबन तुपे, कडदे `माझी तीन ते चार एकर शेती आहे. भात शेतीबरोबर तीस वर्षांपासून दुग्धव्यवसाय करीत आहे. त्यासाठी १६ गायींचे पालन होते. दररोज सुमारे १५० ते २०० लिटर दुधाचे संकलन होते. त्याची पुण्याला विक्री होते. संजय खराडे, संपर्क - ९८२३५८९६९० गावात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपक्रम राबवले जातात. त्यासाठी लागणारे पाणी, वीज, रस्ते व मार्गदर्शन, अभ्यासदौरे, आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातात. गावातील सर्वांनी एकदिलाने काम करून गावाला विकासाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. गावाला पुणे जिल्हा परिषदेचा कृषी ग्रामपुरस्कारही मिळाला आहे. त्याचप्रमाणे आदर्श सरपंच पुरस्काराने मलाही सन्मानित करण्यात आले आहे. हरिचंद्र तुपे माजी सरपंच संपर्क - ९८८१५४०५६६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com