बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मिती

सराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ एकरांत बांबू लागवड केली आहे.प्रकल्प उभारणी करून त्यापासून ‘पॅलेट्‌स’निर्मितीलाही सुरुवात केली आहे.हॉटेल व बॉयलर उद्योगात इंधन म्हणून त्याचा वापर व विक्री करण्यास सुरुवात करून स्वयंरोजगाराची नवी दिशा त्यांनी दाखवली आहे.
कैलाश नागे यांनी तयार केलेल्या बांबू पॅलेटस
कैलाश नागे यांनी तयार केलेल्या बांबू पॅलेटस

सराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ एकरांत बांबू लागवड केली आहे. प्रकल्प उभारणी करून त्यापासून ‘पॅलेट्‌स’निर्मितीलाही सुरुवात केली आहे. हॉटेल व बॉयलर उद्योगात इंधन म्हणून त्याचा वापर व विक्री करण्यास सुरुवात करून स्वयंरोजगाराची नवी दिशा त्यांनी दाखवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सराई येथे कैलाश बाबूराव नागे यांची शेती आहे. ‘बीई. प्रोडक्शन’पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. राज्यातील विविध सहकारी साखर कारखाने व बॉयलर उद्योगांमधून त्यांनी उच्च पदापर्यंत नोकरीचा अनुभव घेतला. त्यानंतर ते केनिया देशातही नोकरीसाठी गेले. मात्र वडिलना गंभीर आजार झाल्याने तीन महिन्यांनी त्यांना परतावे लागले. जैवइंधनावर अभ्यास व बांबू लागवड आपल्या दहा एकर शेतीत कैलाश मका, कापूस आदी पिके घेत होते. जैवइंधनाच्या दृष्टीने काहीतरी करण्याच्या दृष्टीने त्यांना बांबूचे पीक व त्याच्या जैविक वस्तुमानापासून (बायोमास) पॅलेट्‌स तयार करण्याचा मार्ग मिळाला. त्याबाबत खूप अभ्यास केल्यानंतर उद्योगात उतरण्याचे पक्के केले. अनेकांशी चर्चा करून आपल्या आपल्या गावी म्हणजे सराई येथे अलीकडेच उद्योग सुरू केला आहे. त्यासाठी आपल्या साडेनऊ एकर क्षेत्रावर मानवेल बांबूची लागवडही केली आहे. बांबू लागवड रोपे तयार करायला खर्च येतो म्हणून बांबूची बियाण्यापासून लागवड केली. ऑगस्ट २०१९ मध्ये एकरी सुमारे २००० झाडे, तर २०२० मध्ये एकरी १५०० झाडांची लागवड केली. मानवेल जातीची निवड करण्यामागील कारण सांगताना कैलाश म्हणाले, की तोडणीस तो तसा सुलभ आहे. कमी पाण्यात तो येऊ शकतो. यंदाच्या पावसाळ्यातही आणखी एक एकर बांबूची लागवड होणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे पॅलेट्‌स तयार करताना बांबूचा कोणताच भाग वाया जात नाही. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये ‘कटिंग’ केले जाते. फांद्या, पाने असे सर्व भाग उपयोगात येतात. दरवर्षी एक इंच भाग जमिनीच्या वर ठेवून छाटणी करावी लागते. पॅलेट्‌सचा उपयोग कैलाश यांचा बांबू लागवडीचा अनुभव अडीच वर्षांचा तयार झाला आहे. मात्र १३ लाख रुपयांची गुंतवणूक करून पॅलेट्‌सनिर्मितीचा यांत्रिक प्रकल्प अलीकडेच उभारला आहे. दररोज सात टन पॅलेट्‌स तयार होण्याची त्याची क्षमता आहे. कैलाश म्हणाले, की बांबूच्या पॅलेट्‌सचा उपयोग होटेल्स व बॉयलर उद्योगात इंधन म्हणून होतो. त्यांनाच सध्या मागणी, लॉकडाउन या सर्व बाबी लक्षात घेऊन किलोला साडेनऊ रुपये दराने विक्री सुरू केली आहे. एलपीजी म्हणजे सिलिंडर गॅसचा दर किलोला सुमारे ८० ते ८५ रुपये असेल, तर या पॅलेटद्वारे तयार होणाऱ्या इंधनाचा दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत असतो. हॉटेल उद्योगासाठी बर्नरचीही गरज भासते. असे तयार होतात पॅलेट्‌स ‘यांत्रिकी सेटअप’मध्ये एका यंत्रात फांद्यासह बांबू टाकून लहान तुकडे केले जातात. चार इंच व्यासाच्या बांबूचीही कुट्टी होते. साडेसात एचपी मोटरसह या यंत्राची खरेदी दीड लाख रुपयांना केली आहे. प्रति तासात २० टन कुट्टी करण्याची त्याची क्षमता आहे. यंत्रामधून निघालेली कुट्टी एक दिवस वळवली जाते. ‘कन्व्हेअर बेल्ट’द्वारे हॅमर मिलमध्ये आणली जाते. पंधरा एचपीची मोटर असलेली ही मिल पावणेतीन लाख रुपयांना घेतली आहे. यात बांबू कुट्टीची पावडर केली जाते. प्रति तास ५०० किलो पावडर करण्याची त्याची क्षमता आहे. ही पावडर कन्व्हेअर बेल्ट अथवा मजुरांद्वारे पॅलेट्‌स मिलमध्ये आणली जाते. त्यात बसवलेल्या डायमधून विशिष्ट व्यासाच्या पॅलेट्‌स तयार होतात. त्याखाली बसलेल्या कटरच्या साह्याने विशिष्ट लांबीमध्ये ‘कट’ केल्या जातात. त्या गरम असल्याने बाहेर पडल्यानंतर थंड कराव्या लागतात. अन्य शेतकऱ्यांकडे लागवड दीड रुपये प्रति किलो दराप्रमाणे बांबू कुट्टी विकत घेण्याच्या करारावर काही शेतकऱ्यांनी ५० एकरांत बांबू लागवड केली आहे. तो तोडणीस यायचा आहे. संपर्क- कैलाश नागे, ९७३००२०४१० (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com