agriculture story in marathi, Kande Family from Sindhudurga Dist. has succeed in Poultry farming with effective, precise management. | Agrowon

शून्यातून विकसित केले बहुविध जातींचे कुक्कुटपालन

एकनाथ पवार
मंगळवार, 30 मार्च 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरस येथील मधुसूदन व मीनाक्षी या कांदे दांपत्याने विविध पक्ष्यांच्या संगोपनातून कुक्कुटपालनाचा विस्तार करीत उलाढाल वाढवली.
पिले, खाद्य, कीट पुरविण्याबरोबर आता अनुभवी प्रशिक्षक म्हणूनही नाव कमावले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरस येथील मधुसूदन व मीनाक्षी या कांदे दांपत्याने विविध पक्ष्यांच्या संगोपनातून कुक्कुटपालनाचा विस्तार करीत उलाढाल वाढवली.
पिले, खाद्य, कीट पुरविण्याबरोबर आता अनुभवी प्रशिक्षक म्हणूनही नाव कमावले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी मार्गावर हुमरस (ता. कुडाळ) गाव आहे. भात, आंबा, काजू, कडधान्य अशी पिके येथील शेतकरी घेतात. गावातील मधुसूदन कांदेही पावसाळ्यात भातशेती, उन्हाळी नाचणी व अन्य पिके घ्यायचे. उन्हाळ्यात विहिरी खोदणे, बांधकाम करणे अशा कामांमधून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत. मात्र आर्थिक स्थिती सुधारत नव्हती. गावाची २००७ मध्ये जलस्वराज्य प्रकल्पासाठी निवड झाली. त्यानिमित्ताने होणाऱ्या ग्रामसभांना कांदे उपस्थित राहू लागले. प्रकल्पात गावातील भगीरथ प्रतिष्ठान कार्यरत होते. एका ग्रामसभेत प्रतिष्ठानचे मुख्य डॉ. प्रसाद देवधर यांनी कुक्कुटपालनाचे महत्त्व, त्यातून आर्थिक उन्नती व काही यशस्वी उदाहरणे विषद केली. कांदे यांच्या विचारांना चालना मिळाली. त्यावर अधिक अभ्यास करून कांदे आणि तीन मित्रांचे कुक्कुटपालन करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

प्रशिक्षणाचे कळले महत्त्व
हाती काहीच रक्कम नसल्याने घराच्या पडवीतच छोटेखानी व्यवसाय सुरू केला. ऐन हिवाळ्यात १०० पिले खरेदी केली. पण प्रचंड थंडीत त्यांचे संरक्षण कसे करावे याचे ज्ञान नव्हते. प्रशिक्षणही घेतलेले नव्हते. त्यामुळे ५० हून अधिक पिलांचा मृत्यू झाला. या प्रकाराने कांदे यांना धक्का बसला. पण ते निराश झाले नाहीत. स्वतःला प्रशिक्षणाची गरज असल्याचे जाणवले. क्षणाचाही विलंब न करता ‘भगीरथ’कडे प्रशिक्षणाची मागणी केली. ते यशस्वी पूर्णही केले.

सुरू झाला व्यवसाय
पूर्ण प्रशिक्षणानंतर नव्या जोमाने २०० पिल्ले आणली. अभ्यास, कष्ट व चांगल्या व्‍यवस्थापनातून व्यवसाय नेटका सुरू ठेवला. दोन वर्षांत सहा बॅचेस घेतल्या. व्यवसायातील बारकावे लक्षात घेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांच्या कमाईतून घरालगत सातशे ते आठशे पिल्ले राहतील या क्षमतेच्या शेडची उभारणी केली. अनुभव वाढू लागला. आर्थिक प्रगती होऊ लागली.
मग ‘भगीरथ’ने त्यांच्यावर कुक्कुटपालन प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवली. स्वतःचा व्यवसाय सांभाळून गावोगावी जाऊन कांदे शेतकरी व व्यवसायात नव्याने येणाऱ्यांना मार्गदर्शन करू लागले.

संधीचे सोने केले
प्रशिक्षणाच्या निमित्ताने एक संधी ठळक दिसून आली. जिल्ह्यात गावरान तसेच कावेरी जातीचे पक्षी सहज उपलब्ध होत नव्हते. प्रशिक्षणार्थी कांदे यांच्याकडे त्यांच्या उपलब्धतेबद्दल विचारणा करायचे. इथेच संधीचे सोने करायचे ठरवले. मागणी असलेली एक दिवसाची पिले आणून ती पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. सोबत पोल्ट्री कीट, खाद्य, औषधेदेखील पुरवू लागले. पिलांची मागणीही वाढू लागली. त्यामुळे पिले, अंडी देणारी कोंबडी अशा वर्गवारीसाठी शेड्‌स उभारली. हे करीत असताना घरचा पारंपरिक पोल्ट्री व्यवसायही टिकवला.

कांदे यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

 • तीन एकर जमीन.
 • पावसाळी भातशेती. उन्हाळी चवळी, कुळीथ, नाचणी, वाल, मिरची व अन्य भाजीपाला
 • सन २००७ पासून कुक्कुटपालन व्यवसायात. केवळ १०० पिलांपासून सुरुवात.
 • आज एका शेडमध्ये ७०० ते ८०० पिले, तर दुसऱ्या शेडमध्ये
 • अडीच हजारांपर्यंत पिले.
 • एक शेड ३९९ चौरस फूट, तर दुसरे पावणेदोन हजार चौरस फूट.
 • प्रति पिलावर महिन्याला ७० रु. खर्च
 • एक महिन्याच्या पिलाची (सुमारे ३०० ग्रॅम) विक्री ९५ रुपयांना.
 • पक्ष्यांच्या मरतुकीचे प्रमाण दोन ते तीन टक्के.
 • महिन्याला सुमारे दोन ते अडीच लाख रुपये उलाढाल
 • महिन्याचा खर्च- २ लाख १० हजार ते सव्वादोन लाख रु.
 • पारंपरिक कुक्कुटपालनातून वर्षाला तीन महिने वयाच्या पक्ष्यांची २५० रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री. त्यातून ७५ हजार रुपयांपर्यंत उलाढाल.
 • प्रति अंडे १० रुपयांप्रमाणे वर्षाला सुमारे पाच ते सहा हजार अंडी विक्री.
 • दूध विक्रीतूनही ४८ हजार रुपये उलाढाल

गुंतवणूक
केवळ बाराशे रुपयांच्या गुंतवणुकीवर व्यवसाय सुरू केला. वाढ करताना शेडची गरज भासली. त्यासाठी फक्त साहित्यांची गरज होती. बांधकाम स्वतःच केले. त्यामुळे १५ ते २० हजार रुपयेच खर्च आला. दुसऱ्या शेडची उभारणी त्याच पद्धतीने अवघ्या ३० ते ३५ हजारांत केली. व्यवसायातून मिळालेल्या रकमेचाच वापर केला.

बाजारपेठ

 • गावरान, कावेरी, डीपी. क्रॉस आदी पक्ष्यांची पिले (एक दिवसांपासून एक महिन्यापर्यंतची) प्रति महिना २५०० ते ३ हजार या संख्येने शेतकरी, बचत गट यांना पुरवठा. शालेय मुलांनाही पिले देतात.
 • जिल्हा व जिल्ह्याबाहेरही शेतकरी ग्राहक आहेत. पिले दर्जेदार दिली जातात. त्यामुळे सतत मागणी असते. बाजारपेठेसाठी अन्यत्र जावे लागत नाही.

आदर्श, अनुकरणीय

दांपत्य उपसते अखंड कष्ट

संपूर्ण व्यवसाय मधुसूदन व मीनाक्षी हे कांदे दांपत्यच पाहते. शक्यतो मजूर ठेवलेले नाहीत.
पहाटे चार वाजता कामास सुरुवात होते. संध्याकाळी सातपर्यंत अखंड कामांत मग्न असतात.
दुग्ध व्यवसायातही रस आहे. एक म्हशीच्या पालनातून संख्या चारपर्यंत नेली आहे. दोन म्हशींची विक्रीही केली.

कोंबडी खतापासून बायोगॅस
कांदे गावरान कोंबडी खताच्या आधारे सहा वर्षांपासून बायोगॅस चालवीत आहेत. १० किलो कोंबडीखत दोन घनमीटरच्या गॅसयंत्रणेत वापरले तर त्या इंधनावर चार माणसांचा चार दिवसांचा स्वयंपाक होते असे त्यांनी सांगितले.

नाचणीचे उत्पादन वाढले
शेतातही कोंबडीखताचा वापर असतो. चार गुंठ्यांत उन्हाळी घरगुती नाचणी करतात.
सुमारे साडेतीन गुंठ्यांत पावणेदोनशे किलोपर्यंत नाचणी पिकते असे कांदे सांगतात.

ज्ञानविस्तार
आतापर्यंत तीन हजार ते साडेतीन हजार जणांना कांदे यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्याच्या नोंदी ठेवल्या आहेत. एक मुलगा पदवीपर्यंत तर दुसरा ‘इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेत आहे.

संपर्क- मधुसूदन कांदे, ९०४९४४१३८९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...