नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
अॅग्रो विशेष
चॉकलेट्स......नव्हे गुळाचे जॅगलेट्स
कोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा कानोसा व ग्राहकांची मागणी लक्षात घेत नव्या रूपात बाजारपेठेत अवतरला आहे. चॉकलेटप्रमाणे जॅगलेटद्वारे मूल्यवर्धन करून गुळाला अधिक दर मिळवला आहे. १५ ग्रॅमपासून तीस किलो वजन, आकार व पॅकिंगमध्ये बदल घडले आहेत.
कोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा कानोसा व ग्राहकांची मागणी लक्षात घेत नव्या रूपात बाजारपेठेत अवतरला आहे. चॉकलेटप्रमाणे जॅगलेटद्वारे मूल्यवर्धन करून गुळाला अधिक दर मिळवला आहे. १५ ग्रॅमपासून तीस किलो वजन, आकार व पॅकिंगमध्ये बदल घडले आहेत.
कोल्हापुरी गुळाचा लौकिक देशभर आहे. जिल्ह्यातील हवामान, जमिनीची प्रत, ऊस व्यवस्थापन
यामुळे या भागात तयार होणाऱ्या गुळास मधूर चव असते. एकेकाळी तीस किलो इतक्या मोठ्या रव्याचा (ढेप) ग्राहक असायचा. आता बाजारपेठ व ग्राहकांची पसंती बदलली आहे. सध्याची बाजारपेठ दहा किलो रवे निर्मितीवर चालते. पण दरात सातत्य नसल्याने या आकाराच्या निर्मितीलाही मर्यादा येत आहेत. यामुळे स्वत:हून ग्राहक शोधणे आणि त्यांच्या मागणीनुसार
बदल करणे क्रमप्राप्त झाले आहे. सकारात्मक बाब म्हणजे कोल्हापुरी गुळाचा दर्जा टिकविण्यासाठी
संस्थाही पुढे आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना स्वतःहून काही बदल करणे अशक्य आहे त्यांना मदत करून त्या गूळनिर्मितीच्या पद्धती, पॅकिंगमध्ये बदल घडवत उद्योगात विविधता आणत आहेत.
परदेशात निर्यात
कोल्हापूर येथील शाहू गूळ खरेदी विक्री संघाच्या परिसरात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी २००१ पासून कार्यरत आहे. श्रीमती सुजाता जाधव अध्यक्षा आहेत. संस्थेने अगदी पाच ग्रॅमपासून ते १५ ग्रॅम, १०० ग्रॅम, एक किलो, १० किलो अशा विविध आकारापर्यंत गुळाची निर्मिती केली आहे. संस्थेचे व्यवस्थापक एम. एस. जाधव म्हणाले, की पंधरा ग्रॅम वजनाच्या लॉलीपॉप आकाराच्या गुळाची दोन वर्षांपूर्वी ४० टन, मागील वर्षी २६० टन तर यंदा ऑक्टोबर ते आजमितीस ८५० टन गुळाची निर्यात साधली. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, कॅनडा आदी देशांत आमचा गूळ पोचला आहे.
कपाच्या चहाची संकल्पना
लॉलीपॉप आकाराचा गूळ चहात टाकल्यास एक कप चहा तयार होईल अशी संकल्पना व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी मांडली. संस्थेने ती तातडीने अमलात आणली. आंतरराष्ट्रीय मानांकनात बसेल असा दर्जा तयार केला आहे. संस्थेने तेरा गूळ उत्पादकांशी करार केला आहे. संस्थेची वेबसाइट आहे.
वर्षाला ७०० टनांपर्यंत विक्री होते. यापुढेही नावीन्यपूर्ण पॅकिंग आणण्याचा प्रयत्न आहे.
संपर्क- एम. एस. जाधव, ७५८८०६४४०९\
जॅगलेट ब्रॅण्ड
कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या वडणगे गावातील सचिन पाटील यांचा वडिलोपार्जित गुळाचा व्यवसाय आहे. त्यांनी सुरुवातीला काकवीच ब्रॅण्ड तयार केला. विश्वकर्मा ॲग्रो फूड्स असे फर्मचे नाव आहे. अभ्यास, शोधवृत्तीतून ग्राहकांची मागणी, दर्जा, किंमत यांचा अभ्यास केला. त्यातून चॉकलेटच्या आकाराचा गूळ तयार करण्यास प्रारंभ केला. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे लक्षात आले. यंदाच्या हंगामापासून साडेतीन ग्रॅम वजनाचा चॉकलेटच्या आकाराचा क्यूब त्यांनी बाजारपेठेत आणला आहे. गुळाला इंग्रजीत जॅगरी म्हणतात. यातील पहिली दोन अक्षरे ‘जॅग’ व चॉकलेट या शब्दातील शेवटची दोन अक्षरे ‘लेट’ असा मिलाफ करून जॅगलेट नाव तयार केले. ते दोन पद्धतीत सादर केले
आहे. ४० क्यूबच्या डब्याला ४० रुपये तर १०० क्यूबच्या डब्याला - ९० रुपये दर आहे.
जॅगलेटला मागणी
- आतापर्यंत जॅगलेटची कोल्हापूर मार्केटला दोन टनांपर्यंत विक्री
- कोल्हापूर व पुणे येथील विक्रेते, आयुर्वेदिक दुकानांमधून चांगली मागणी आहे. मात्र उत्पादन पुरेसे नाही असे पाटील सांगतात. गुळाची ढेप विकली असती तर किलोला ६० रुपये दर मिळाला. जॅगलेटच्या मूल्यवर्धनातून हाच दर किलोला २५० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पाटील म्हणाले.
- गूळनिर्मिती रसायनविरहित करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रति तासाला पन्नास किलोपर्यंत पॅकिंग होते. पाच ते सहा तासात 300 किलो क्यूब्स तयार होतात.
संस्थेकडून प्रमाणित
कोल्हापूर येथील ऊस व गूळ संशोधन केंद्राबरोबरच भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) या क्यूबला प्रमाणित केले आहे. वडिलोपार्जित गुऱ्हाळात बदल करून बाजारपेठेचा, गुळाच्या गुणवत्तेचा अभ्यास करीत पाटील यांनी नवा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे.
संपर्क- सचिन पाटील, ९८६०९९९९९७
‘शाहू’च्या क्यूबची तेलंगणाला विक्री
छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघ हा कोल्हापुरातील जुना संघ आहे. राजाराम पाटील संघाचे अध्यक्ष आहेत. संघाने काही वर्षांपासून एक किलोसह अर्धा किलो, १४ ग्रॅमच्या क्यूबची विक्री सुरू केली आहे. यंदा परराज्यांतील बाजारपेठ शोधली आहे. दर आठवड्याला तेलंगणा राज्यात क्यूब्स पाठवले जात आहेत. किलोला शंभर रुपये दराने आठवड्याला पाचशे किलोपर्यंत विक्री होते. संघाने आपल्या सभासदांकडून क्यूब्ज तयार करून घेतले आहेत. त्यासाठी मोफत प्रशिक्षण उपक्रमही सुरू केला आहे. दहा किलो, एक किलो व त्या पुढे जाऊन सहज तोंडात टाकण्यासारखा आकार तयार करण्याचा तसेच पावडर तयार करणारे यंत्र व ड्रायरही उपलब्ध करून देण्याचा संघाचा प्रयत्न आहे.
संपर्क- राजाराम पाटील- ७७७६८१२३१६
प्रचलित पद्धतीत होतोय बदल
- तीस, दहा किलो रव्यांऐवजी पावडर, वड्या, क्यूब्जची निर्मिती
- प्लॅस्टिक जार, छोटे बॉक्स आदींचा वापर
- ग्राहक, मॉल, दुकाने, संस्थांकडून पसंती
- सौद्यात मिळेल त्या दराला विक्री. दर्जा चांगला असेल उच्चांकी दराला विक्री
- मनुष्यबळ वाचविणाऱ्या आधुनिक गुऱ्हाळांची उभारणी
- स्वब्रॅण्ड निर्मितीवर भर