agriculture story in marathi, Kopner brothers fromj Nimbe, Dist. Nagar has developed their farm successfully in rainfed condition. | Agrowon

अवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील शेती

सूर्यकांत नेटके
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

चांगले शिक्षण घेतल्यानंतरही मी नोकरी करण्याऐवजी शेती कररून त्यातच प्रगती करण्याचा निर्णय घेतला. पडीक जमीन विकसित केली. मका, कांदा पिके घेत उत्पादनात वाढ केली. यंदा व्यवस्थापनावर अधिक लक्ष दिल्यामुळे मक्याचे पीक लष्करी अळीपासून वाचवता आले. ’
-विजय पंडीत कोपनर
संपर्क : ९९७०६३५४३४

 

नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील निंबे येथील विजय व विशाल हे उच्चशिक्षित कोपनर बंधू दरवर्षी मक्याचे चांगले उत्पादन घेण्यामध्ये कुशल झाले आहेत. यंदाही सतर्क राहून दोन फवारण्या वेळीच करून त्यांनी अमेरिकन लष्करी अळीपासून आपले पीक वाचवले आहे. विजय यांनी नोकरी नाकारून शेती करण्यास प्राधान्य देत माळरानावरील पडीक जमीन विकसित केली. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पंचवीस वर्षांपासून दुग्ध व्यवसायही जोपासला आहे. चांगल्या शेती उत्पादनातूनच त्यांनी संसार सावरला आहे.

नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. तालुक्यातील निंबे येथील विजय व विशाल या कोपनर बंधूंची सुमारे ११ एकर जमीन आहे. विजय यांचे बी.एस्सी. बीएड पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे धाकटे बंधू विशाल ‘एमफार्म’ असून ते मांडवगण फराटा (ता. शिरूर घोडनदी) येथे खासगी महाविद्यालयात नोकरी करतात. विजय यांनी मात्र नोकरी न करता शेतीतच प्रगती करण्याचा निर्णय घेतला. त्यांची चार एकर जमीन माळरानाची आणि पडीक होती. उपलब्ध असलेल्या शेतीत वेगवेगळे उत्पादन घेत आर्थिक स्थिती त्यांनी सावरली. त्यातून तीन वर्षांपूर्वी ही पडीक जमीन विकसित केली. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केले. त्यात उत्पादन घेणे शक्य झाल्यानंतर कुटूंबाच्या आर्थिक उत्पादनात भर पडू लागली. याच शेतीतील उत्पन्नाच्या जोरावर पाणी उपलब्धतेसाठी ६० फूट खोलीची विहीर खोदली. शेताशेजारूनच कुकडीचा कालवा जातो. त्यामुळे कालव्याला पाणी सुटले की त्याचा विहिरीला निश्चित फायदा होतो.

उत्पादनात केली वाढ
कोपनर परिवार पूर्वी बाजरी, ज्वारी, तूर अशी पिके घेत. वडील पंडीत यांच्या काळापासून मका हे पारंपरिक पीक होते. अलीकडील वर्षांत विजय यांच्यावर ही जबाबदारी आहे. त्यांनी एकरी उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. खत व पाणी व्यवस्थापनात बदल केला. शेणखतासह रासायनिक खतांचा वापर संतुलित केला. पाऊस व हवामान ठीकठाक राहिले, तर मक्याचे एकरी ३० व कमाल ३५ क्विंटल पर्यंत उत्पादन होते असे विजय सांगतात. मागील वर्षी पुरेशा पावसाअभावी २८ क्विंटलच उत्पादन घेता आले.

यंदा अळीपासून वाचवले पीक
दरवर्षी चार एकरांपुढेच असलेले खरिपातील मका पीक यंदा नऊ एकरांत होते. लागवडीवेळी एकरी १० किलो झिंक सल्फेट, पाच ५ टन शेणखताचा वापर केला. जमीन भुसभुशीत ठेवली. पाणी धारण क्षमता चांगली राहिली. कर्जत तालुक्याच्या दक्षिण भागात अलीकडील काळात मक्याचे क्षेत्र वाढले आहे. यंदा मात्र बहुतांश भागात त्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पीक वाया गेले.विजय यांनी मात्र लागवडीपासूनच जागरूक राहून योग्य प्रकारे व्यवस्थापन ठेवले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी दुसऱ्या शिफारसीत कीटकनाशकाची फवारणी त्यांनी केली. द्रावण पोंग्यात पडेल असे नियोजन केले.
वेळीच दाखवलेल्या या सतर्कतेमुळे प्रादुर्भाव रोखण्याला मदत झाली. विजय यांच्या मार्गदर्शनामुळे गावातील काही शेतकऱ्यांनाही प्रादुर्भाव रोखणे शक्य झाले.

चांगल्या उत्पादनाची आशा
आता प्लॉट संपला आहे. यंदा संकरीत वाण बदलले आहे. त्याचे एकरी ३५ ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादन विजय यांना अपेक्षित आहे. जानेवारीच्या काळात त्याची विक्री होईल. या भागातील अनेक शेतकरी एकत्रपणे येथून जवळ असलेल्या एका मका प्रक्रिया कंपनीला विक्री करतात. त्यामुळे बाजारपेठेची तशी चिंता नाही. सध्या क्विंटलला १८०० ते २२०० रुपये दर सुरू आहे. मागील वर्षी १७०० रुपये दर मिळाला होता. गरजेनुसार बाजारसमितीतही विक्री होते.

मजुरीचा खर्च केला कमी
कोपनर कुटूंबात पाच सदस्य आहेत. त्यातील चार जण शेतात राबतात. सकाळी सहा वाजता त्यांच्या कामास सुरुवात होते. अधिक गरजेच्या वेळी नातेवाईक व परिसरातील सहकारी कामांसाठी येतात. मग कोपनर कुटूंबातील सदस्यही त्यांच्याकडे कामांस जातात. साहजिकच मजुरांची गरज कमी झाल्याने वर्षाला तीस ते चाळीस हजार रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे.

दुग्ध व्यवसाय जोपासला
विजय यांच्या वडिलांनी पंचवीस वर्षांपासून दुग्ध व्यवसाय सातत्याने जोपासला आहे. सध्या त्यांच्याकडे चार संकरीत गाई व म्हैस आहेत. सध्या दररोज पंचवीस लिटर दूध डेअरीस घातले जात आहे. विशेष म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती साधारण असताना दुग्ध व्यवसाच्या जोरावरच दोघा बंधूंचे उच्चशिक्षण झाले. या व्यवसायातूनही कुटूंबाला आर्थिक हातभार लागतो. जनावरांसाठी मक्यापासून मुरघास तयार करण्यात येतो. त्यामुळे चाऱ्यावरील खर्च कमी केला आहे.

कांदा उत्पादनावर भर
मक्यानंतर कांदा घेण्यात येतो. त्याची एकरी उत्पादकता १० ते १३ टनांपर्यंत जोपासली आहे. तीन वर्षांपूर्वी अडीच एकरांत २१ टन उत्पादन, दोन वर्षांपूर्वी चार एकरांवर ५२ टन तर गेल्यावर्षी अडीच एकरांत २८ टन उत्पादन घेतले. गेल्यावर्षी दुष्काळाचा फटका सहन करावा लागला. मात्र शेणखताच्या वापरातून कांद्याचे एकरी उत्पादन वाढवण्यास मदत झाली आहे. व्यापारी जागेवर येऊन मालाची खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक, अडत खर्चात बचत झाली आहे. कांद्याने कोपनर यांना बऱ्यापैकी आधार दिला आहे. यंदा एक एकरांत लागवड केली असून अजून चार एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.

वांगी लागवडीस सुरुवात
मागील वर्षापासून वांग्याचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी उत्पादनने फार साथ दिली नाही. यंदा २० गुंठ्यात अलीकडेच लागवड केली आहे. आठवड्यातून दोन दिवसांला तोडणी करुन त्याची करमाळा (जि. सोलापूर) येथील बाजारात स्वतः विक्री सुरू केली आहे. त्यातूनही आर्थिक स्त्रोतही वाढवण्याला हातभार लागला आहे. भाजीपाला क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न आहे.

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...