नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
यशोगाथा
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा दर्जेदार दुग्धव्यसाय
नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर कुटुंबाने तेरा वर्षांपूर्वी दुग्धव्यवसायास सुरुवात केली. दूध उत्पादन सातत्यपूर्ण दर्जेदार ठेवत सुमारे २०० पर्यंत ग्राहकांचा विश्वास कमावला. ग्राहकहित याच गोष्टीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करीत वर्षातील ३६५ दिवस अखंड सेवा देण्यात त्यांनी तत्परता ठेवली आहे.
नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर कुटुंबाने तेरा वर्षांपूर्वी दुग्धव्यवसायास सुरुवात केली. दूध उत्पादन सातत्यपूर्ण दर्जेदार ठेवत सुमारे २०० पर्यंत ग्राहकांचा विश्वास कमावला. ग्राहकहित याच गोष्टीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करीत वर्षातील ३६५ दिवस अखंड सेवा देण्यात त्यांनी तत्परता ठेवली आहे.
नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथे क्षीरसागर कुटुंब राहते. त्यांची शेती गोदावरी नदीच्या शेजारी असल्याने दूषित पाण्यामुळे सामू वाढून जमिनीचा पोत बिघडला होता. शेतमालाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम व्हायचा. त्यातच नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला नसलेला भाव यामुळे खर्च करूनही परतावा मिळत नव्हता. कर्ज होऊन उधारी वाढती होती. या अडचणींमुळे कुटुंबाची परवड थांबून कुटुंबातील एकाने शेती करायची तर दुसऱ्याने नोकरी असे ठरले. घरातील धाकटा मुलगा रवींद्र यास २००८ साली औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला. पण त्याचे मग लागेना. काही दिवसातंच शुल्क परत घेऊन प्रवेश रद्द केला. या रकमेतून एक गाय घेऊन दुग्धव्यवसाय सुरू दिला.
शेतीला पर्याय दुग्धव्यवसायाचा
दोन लीटरपासून व्यवसायास सुरुवात झाली. पुढे २०१४ मध्ये द्राक्ष व गुलाबशेती कमी करून हा व्यवसाय वाढवला. त्यामुळे कुटुंबातील शंकर पूर्णवेळ दुग्धव्यवसाय आले. अनुभव नसल्याने त्यांनी अनेक बाबी समजून घेतल्या. दर मिळण्यासाठी थेट दूधविक्री सुरू केली. सुरुवातीला सेवा व तत्परता या गुणांमुळे मागणी वाढत गेली. याकामी कुटुंबाचा पाठिंबा असल्याने सुरुवातीला एका होल्स्टिन फ्रिजियन गायीपासून सुरू केलेला व्यवसाय ११ संख्येवर गेला. मर्यादित गाय, घरगुती नियोजन व रास्त परतावा या व्यावसायिक अंगाचे स्वरूप ठेवले.
दुग्धव्यवसाय दृष्टिक्षेपात
- एकूण गायी- ११
- दुधाळ- ८
- कालवडी मिळून एकूण संख्या- २३
- दररोजचे दूध संकलन व विक्री- सुमारे १३० ते १५० लीटर
- मोठे बंधू शंकर व लहान बंधू रवी अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी दुधाचे रतीब घालतात.
- दुधाचा दर प्रति लीटर दर ४२ रु.
थेट दारापर्यंत विक्री
- 'रविशंकर डेअरी फार्म' असे नाव दिले आहे. गोठ्यापासून पाच किलोमीटर अंतरात निवासी सोसायट्यांमध्ये जोडलेले ग्राहक ही व्यवसायाची जमेची बाजू आहे.
- दर महिन्याला ग्राहकांना सदस्य दूध कार्ड. यात दूध वितरणाच्या नोंदी उदा. एकूण बिल, जमा, बाकी यांचा तपशील.
- मागणीप्रमाणे मंगल कार्यालये, हॉटेल्स यांनाही पुरवठा
- मागणी वाढून दूध कमी पडल्यास जवळील दुग्धोत्पादकांकडून खरेदी करून ग्राहक साखळी मजबूत केली आहे.
- वार्षिक उलाढाल- २५ लाख रुपये.
- पशुखाद्य, वैद्यकीय तपासण्या व अन्य असा मासिक खर्च- ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत
- नफ्याची टक्केवारी- ३० टक्के नफा
लॉकडाऊनमध्ये खबरदारी घेत दूधवितरण
लॉकडाऊनमध्ये दुधवितरणात अडचणी होत्याच. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत वितरण सुरू ठेवले. यात हातमोजे, मास्क, चष्मा यांचा वापर होतो. दूधवितरण करण्यापूर्वी दोनवेळा साहित्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. किमान मानवी स्पर्श
करून दूध वितरणावर भर ठेवला. त्यामुळे अडचणीतही दुधाची मागणी वाढती आहे.
मजुरांशिवाय घरच्यांकडूनच व्यवस्थापन
श्रीरसागर कुटुंबाने मजुरांची मदत न घेता संपूर्ण घरच्या सदस्यांकरवी व्यवसायाचे व्यवस्थापन केले आहे.
कुटुंबात १० सदस्य आहेत. शंकर व रवींद्र या बंधूंचे पहाटे चारपासून कामकाज सुरू होते. शेण-चारा, खाद्य, जनावरांना स्नान, दूध काढणे या बाबी दोघे बंधूच करतात. महिला सदस्य दुधाचे
पॅकिंग करतात. उत्पन्नातून कौटुंबिक खर्च, व्यवसायासाठी स्वतंत्र खर्चाची तरतूद व अन्य बचत बाजूला ठेवली जाते. नव्या पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येते. यासह काही जनावरांचा विमा काढला आहे.
गोठा व्यवस्थापन
- सुरुवातीला भांडवल नसल्याने व्यवस्थित गोठा नव्हता. पुढे जुन्या घराचा वापर करून करून किमान खर्चात पक्का गोठा तयार करण्यात आला. गव्हाणींची रचना, पाणी पुरवठा यंत्रणा, हिरवा चारा कुट्टी यंत्र, संपूर्ण गोठ्यात सिमेंटचा कोबा तसेच शेण व मूत्र धुण्यासाठी यंत्रणा आहे
- यासह शेती व दुग्धव्यवसायासाठी लागणारे सर्व यांत्रिकीकरण
- गायींच्या खरेदीवरील खर्च कमी करण्यासाठी गोठ्यातच कालवडी तयार करण्यावर भर
- महिन्यातून दोनदा वैद्यकीय तपासणी
- गुणवत्ता व दूध वाढ होण्यासाठी गहू भुसा, तूर डाळ चुणी, मका भरड, ढेप, कांडी खाद्य आहारात समावेश
- दुधवाढीसाठी खाद्यात खनिज मिश्रणाचा आवर्जून वापर
- ८ एकरांत घर, विहीर, गोठा. बाकी क्षेत्रावर हिरव्या चाऱ्याचे वर्षभर नियोजन.
- यातील सहा एकरांत ऊस, १० गुंठ्यात मका व दीड एकरांत गिन्नी गवत
- या भागात सायगाव वाणाचा ऊस आहे. त्यात साखर कमी असते. त्याचा चारा देण्यात येतो.
- कापणीचे नियोजन करून वर्षभर हिरवा चारा
अर्थकारणाला बळकटी देणारे स्रोत:
- दरवर्षी दोन हजार रुपयांप्रमाणे सुमारे १५ ट्रॉली शेणखत विक्री
- स्वयंपाकासाठी गोबर गॅस सुविधा
- दर महिन्याला मागणीनुसार ५ ते १० किलो तूपनिर्मिती. ५५० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री
- वर्षातून दोनदा ऊस तोडणी. दोनशे टन विक्री.
कृषी व श्रमसंस्काराचा वसा:
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या विचारांचा क्षीरसागर परिवारावर प्रभाव आहे. कृषिसेवा व गोसेवा’ हे ब्रीद घेऊन वाटचाल असल्याने ‘कामालाच राम’ मानतात. वडिलांच्या श्रमसंस्कारामुळे अचूक व काटेकोर व्यवहार ही शिस्त लागली आहे.
प्रतिक्रिया
आम्ही वर्षातील ३६५ दिवस ग्राहकांना अखंड दर्जेदार दूध पुरवतो. कोणत्याही घरातील लहान मुलाला
केंद्रस्थानी ठेवून ते दूध पौष्टीकच असले पाहिजे हाच एकमेव विचार आम्ही अनेक वर्षांपासून जपला.
तो अमलात आणला. दुधाची प्रत अत्यंत चांगली असल्याने लॉकडाऊन काळातही ग्राहकांकडून
आमच्या दुधाला अत्यंत चांगली मागणी होती.
-शंकर क्षीरसागर-९२२६९६८१६३
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››