agriculture story in marathi, KVK, Mamurabad, jalgaon has done extension of weeding implements. | Agrowon

केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या कोळप्यांचाही प्रसार

चंद्रकांत जाधव
बुधवार, 28 जुलै 2021

मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (ता.जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने
शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे वळवले आहे. अल्पभूधारक व अधिक क्षेत्रधारक अशा सर्वांची गरज ओळखून दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे व पॉवर वीडर या अवजारांची प्रात्यक्षिके स्वक्षेत्रासह शेतकऱ्यांकडे राबविली आहेत. भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राने शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यामार्फत यंत्रवापराला चालना दिली आहे.

मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (ता.जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे वळवले आहे. अल्पभूधारक व अधिक क्षेत्रधारक अशा सर्वांची गरज ओळखून दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे व पॉवर वीडर या अवजारांची प्रात्यक्षिके स्वक्षेत्रासह शेतकऱ्यांकडे राबविली आहेत. भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राने शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यामार्फत यंत्रवापराला चालना दिली आहे.
 
शेतीचे क्षेत्र मोठे असो की लहान, किंवा अलीकडील काळात मजूरटंचाईची समस्या सर्वांनाच भेडसावते आहे. अनेक अल्पभूधारकांना बैलजोडीचे संगोपन करणेही अवघड झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) विविध अवजारांची प्रात्यक्षिके देऊन शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे वळवले आहे.

यात दातेरी हातकोळपे, सायकल कोळपे व पॉवर वीडर यांचा समावेश आहे. त्याद्वारे वेळ, श्रम आणि पैशांमध्ये बचत होणार आहे. केंद्राने जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, जामनेर आदी भागांत य यंत्रांचा प्रसार केला आहे. त्यातून अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा उपयोग करू लागले आहेत. त्याचे लाभही त्यांना दिसत आहेत. केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) वैभव सूर्यवंशी व विषय विशेषज्ञ (विस्तार) विशाल वैरागर यांनी हिरिरीने कार्यवाही राबविली आहे. त्या माध्यमातून गावांमध्ये जावून लहान स्वरुपात प्रात्यक्षिके घेण्यात
आली आहेत.
 

केंद्राच्या प्रोत्साहनातून सुमारे १३ शेतकरी पॉवर वीडरचा, तर १५ शेतकऱ्यांनी सायकल कोळप्याचा अवलंब केला आहे. यात कमाल शेतकरी अल्पभूधारक आहेत. सुमारे १२५ हेक्टरवर या तीनही यंत्रांचा वापर तीन वर्षांत सुरू झाला आहे.

दातेरी हात कोळपे
पिकाच्या दोन ओळींतील तणनियंत्रण किंवा जमीन भुसभुशीत करण्यासाठी याचा उपयोग करता येतो.एक मजूर उभ्याने कोळपणी करू शकतो. दोन्ही हाताने मागे पुढे ढकलून चालविता येते. त्यामुळे कामाचा शीण कमी होतो. मजुराची कार्यक्षमता, उत्साह टिकून काम वेगाने होते. कोळप्याचे पाते १५ सेंटिमीटर लांबीचे असते. दोन ओळींत १५ सेंटिमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्यापिकात आंतरमशागत करता येते. साधारणपणे ३ सेंटिमीटर खोलीपर्यंत खुरपणी होते. हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत या यंत्रांचा वापर होतो. हातकोळप्याचे वजन कमी म्हणजे सात किलो असल्याने सहज उचलून नेता येते. एक मजूर दिवसाकाठी १५ ते २० गुंठे क्षेत्राची कोळपणी करू शकतो. किंमत सुमारे एकहजार रुपयांपर्यंत आहे.

सायकल कोळपे-
या यंत्राद्वारे १५ सेंटिमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकांमध्ये ५ ते ७ सेंटिमीटर खोलीपर्यंत कोळपणी, निंदणी, खुरपणी करता येते. एक मजूर दिवसाकाठी सुमारे १५ ते २० गुंठे क्षेत्रात निंदणी, खुरपणी करू शकतो. याची किंमत बाराशे रूपयांपर्यंत आहे. दातरी हातकोळपे व सायकल कोळपे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहेत.

किफायतशीर पॉवर वीडर
ज्या पिकांच्या ओळीतील अंतर ६० ते ७० सेंटिमीटरपेक्षा जास्त आहे अशांमध्ये तण काढणीसाठी पॉवर वीडरचा वापर होतो. बांधावर तसेच रस्त्याच्या कडेला वाढणाऱ्या तणाचे नियंत्रण करण्यासाठीही त्याचा वापर होतो. जिल्ह्यात केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, पिकांसाठी शेतकऱ्यांनी या यंत्राचा वापर वाढविला आहे. या यंत्रामध्ये इंजिन, इंधन टाकी, ब्लेड्‍स, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन, गिअरबॉक्स अर्थात ‘हॅन्डल वीथ स्पीड कंट्रोल’ आदी यंत्रणा आहे.

पॉवर वीडरची वैशिष्ट्ये

 • रुंदी (इंच)- १२ ते ३९
 • अश्‍वशक्ती- २ ते ७
 • ब्लेड संख्या ८ ते २४ पर्यंत.
 • पेट्रोल किंवा डिझेलचा वापर शक्य
 • -वजन ५०, ६० ते १०० किलो
 • 'स्टिअरिंग’ची उंची आवश्यकतेनुसार बदलता येते, गरजेनुसार फिरवणे शक्य.
 • इंधन वापर- प्रति तास एक लिटरपर्यंत.
 • चार ते सहा इंच खोलीपर्यंत व एका तासात सुमारे पाऊण ते एक एकरापर्यंत कार्य शक्य.
 • किंमत ४० हजारांपासून ते एक लाखापर्यंतं.
 • -बहुवीध सोयीचे यंत्रही उपलब्ध. यात बेडला माती लावणे, रोटर, रीपर, पाण्याचा पंप, एचटीपी
 • आदी उद्देशानेही काम करता येते.

प्रतिक्रिया
माझी सुमारे सहा एकर शेती आहे. मी यांत्रिकीकरणाकडे वळलो. सुरुवातीला मिनी ट्रॅक्टर कृषी विभागाच्या मदतीने घेतला. आता आंतरमशागतीसाठी पॉवर वीडर घेतला आहे. कापूस पिकात कमी वेळेत व गुणवत्तापूर्ण कोळपणीचे काम यामुळे करू शकत आहे. शिवाय पैसेही कमी लागतात. एकरभर आंतरमशागत तीन लिटर डिझेलमध्ये करता येते. ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रोत्साहनाने व मदतीने पॉवर वीडरचा वापर सुरू केला. एकरी ३०० ते ४०० रुपये खर्च व महत्त्वाचा वेळ या यंत्रणेमुळे वाचतो. 
-रवींद्र झुरकाळे, शिरसोली (ता. जि.जळगाव)

आमच्या शेतकरी गटाने पॉवर वीडर घेतले आहे. हे यंत्र वापरण्यापूवी दोन वर्षे पाहणी, अभ्यास केला. आमच्या गटातील शेतकऱ्यांसह भाडेत्त्वावर ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. अल्पभूधारक तसेच शेतीक्षेत्र असलेल्या नोकरदार मंडळींना बैलजोडीचे संगोपन करणे शक्य नसते. अशांना हे यंत्र फायद्याचे आहे. भाडेतत्त्वावर पॉवर वीडरद्वारे कोळपणीसाठी किमान ५०० रुपये प्रति हेक्टर मशागतीसाठी वाचविता येतात.
- हितेंद्र माळी, निसर्गमित्र शेतकरी गट, म्हसावद (ता.जि.जळगाव)

वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...