पक्ष्यांमुळे फळबागेत होणारे नुकसान टाळण्यासाठी लेझर प्रणाली

पक्ष्यांमुळे फळबागेत होणारे नुकसान टाळण्यासाठी लेझर प्रणाली
पक्ष्यांमुळे फळबागेत होणारे नुकसान टाळण्यासाठी लेझर प्रणाली

हंगामानुसार फळ उत्पादकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. फळबागेमध्ये पक्व फळांचे पक्षी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. एकाच वेळी पक्ष्यांनी फळे खाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. पक्ष्यांमुळे फळांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका युरोपियन कंपनीने साैरऊर्जेवर चालणारे लेझर प्रणालीवर आधारित एक यंत्र विकसित केले अाहे. या यंत्रामुळे पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता फळांची पक्ष्यांमुळे होणारी नासाडी नियंत्रणात आणता येते. गतवर्षी चेरीच्या बागेमध्ये या यंत्राचे प्रयोग घेण्यात अाले, त्यातून सकारात्मक परिणाम दिसून अाले अाहेत. यंत्राची वैशिष्ट्ये

  • हे यंत्र वापरण्यास सोपे अाणि प्रभावी असून एकावेळी ४० ते ५० एकर क्षेत्र या यंत्राच्या कक्षेमध्ये येते.
  • हे यंत्र एका उंच खांबावर बसविण्यात अालेले अाहे. ज्यावर गोलाकार फिरणारी हिरव्या रंगाची लेझर किरणे सोडणारी यंत्रणा बसविण्यात अाली अाहे.
  • लेझर यंत्रणा सॉफ्टवेअरनुसार सतत कार्यरत राहते.
  • अधिक व्यापक परिणामांसाठी हे यंत्र अधिक उंचावर असणे अावश्‍यक अाहे त्यामुळे हे यंत्र १८ फुट अाणि २२ फुट उंचीच्या खांबावर बसविण्यात अाली अाहेत.
  • यंत्रामध्ये साैरऊर्जेने चार्ज होणारी बॅटरी बसविण्यात अाली अाहे.
  • फिरणारी हिरवी लेझर किरणे झाडांवरून सतत फिरत राहतात. त्यामुळे झाडावर बसलेले पक्षी घाबरून पळून जातात. पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com