Agriculture story in marathi, Listeriosis disease of cows and buffaloes | Agrowon

ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणे

डॉ. लीना धोटे, पंकज शेंडे
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीवजन्य आणि बुरशीजन्य या प्रकारात विभागले जातात. असे आजार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या पशुपालकाला होण्याची शक्यता असते, त्यालाच झुनोटिक आजार असे म्हणतात.

जनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीवजन्य आणि बुरशीजन्य या प्रकारात विभागले जातात. असे आजार प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या पशुपालकाला होण्याची शक्यता असते, त्यालाच झुनोटिक आजार असे म्हणतात.

लिस्टेरिओसिस म्हणजे काय?
लिस्टेरिओसिस हा एक झुनोटिक किंवा प्राणिजन्य मानवीय आजार आहे. म्हणजेच असा आजार जो जनावरांपासून माणसाला किंवा माणसापासून जनावरांना होऊ शकतो. पशुपालक, पशुवैद्यक किंवा कत्तलखान्यात, जंगलात, प्राणिसंग्रहालयात, प्राण्यांच्या दुकानात, दवाखान्यात, प्रयोगशाळेत काम करणाऱ्यांना लिस्टेरिओसिस होण्याचे प्रमाण जास्त आहे.
लिस्टेरिओसिस प्रामुख्याने लिस्टेरिया मोनोसायटोजनेस (एल एम) नावाच्या जिवाणूमुळे होतो. एल एम हा एक ग्राम पॉसिटीव्ह रॉड असून मनुष्यामध्ये जवळ जवळ सर्व संक्रमणासाठी नोंदवला आहे. तर प्राण्यांमध्ये लिस्टेरिया मोनोसायटोजनेस, लिस्टेरिया इवानोवी आणि लिस्टेरिया सिलिगेरी नोंदवले गेले आहेत.

आजार कोणाला होऊ शकतो?
गर्भवती महिलांना, नवजात बालकांना, ६५ किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांना आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांमध्ये एंसिफलिटीसी, सेप्टीसेमिया आणि गर्भपात होऊ शकतो. अंदाजे दरवर्षाला १६०० लोक या आजाराला बळी पडतात आणि त्यापैकी २६० जणांचा मृत्यू होतो

रोगाचा प्रसार

 • निरोगी जनावरांचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांशी संबंध
 • गोठ्यातील अस्वच्छता
 • जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष
 • प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या द्रव्य पदार्थच्या म्हणजेच लाळ, रक्त, विष्टा, मूत्र, इ. च्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो.
 • जिवाणू ने दूषित झालेले अन्न, पाणी, दूध, मांस किंवा त्याचे पदार्थ सेवन केल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो.
 • साठवलेल्या खाद्य (सायलेज फीड) सेवन केल्यामुळे जनावरांमध्ये रोग होऊ शकतो.

लक्षणे

 • सडकून ताप येणे (१०४ ते १०६ फॅरेनहाईट)
 • अशक्तपणा
 • डोकेदुखी
 • असंतुलितपणा
 • स्नायू वेदना
 • गाभण जनावरे गाभडतात
 • मेंदूवर आघात होऊन झटके येतात
 • गर्भवती महिला-गर्भवती महिलांना सामान्यतः ताप येणे, स्नायू वेदना, फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अश्या महिलांमध्ये गर्भपात (२० टक्के), अकाली प्रसूती, नवजात बालकांचा मृत्यू (३ टक्के) या प्रकारची लक्षणे दिसून येतात.

रोगनिदान

 • शरीरातील द्रव्य पदार्थापासून लाळ, रक्त, विष्टा, मूत्र इ. पासून किंवा दूषित झालेले अन्न, दूध, मांस व त्यांचे पदार्थ, पाणी, सायलेज फीड पासून प्रयोगशाळेत जिवाणू लिस्टेरिया मोनोसायटोजनेसचे निदान केले जाऊ शकते.
 • सिरॉलॉजिकल चाचणी - अँटीबॉडीज तपासणी
 • एलिसा
 • डॉट ब्लॉट
 • एन्टीबीओटीक संवेदनशील चाचणी

प्रतिबंध आणि नियंत्रण

 • आजारी जनावरे वेगळे करून त्यांच्यार योग्य ते औषधोपचार करून काळजी घ्यावी. आजार बरा झाल्याची खात्री झाल्यानंतरच गोठ्यातील जनावरांमध्ये मिसळावे.
 • कच्चे दूध पिल्यामुळे लिस्टेरिया होत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे, त्यामुळे दूध उकळून प्यावे.
 • लिस्टेरिओसिस झालेल्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचे सेवन करू नये.
 • जनावरांची प्रयोगशाळेमध्ये लिस्टेरिया चाचणी करून आजार नसल्याची खात्री करून घ्यावी.
 • जनावरे आणि गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.
 • गोठ्यात जनावरे बदलताना किंवा नवीन जनावरांची खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.
 • संक्रमन झालेली प्लासेन्टा (नाळ) गर्भाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
 • कत्तल खाण्यात काम करणारे कामगार, मांस-वेष्टित काम करणारे कर्मचारी व पशुवैद्यक तसेच सतत जनावरांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

संपर्क ः डॉ. लीना धोटे, ७९७२४१३५३३
(पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक.) 


इतर कृषिपूरक
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...