दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
कृषिपूरक
नियंत्रण गोचीड, कीटकजन्य आजारांचे
आपल्या परिसरात टॅबॅनस/स्टोमोक्सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये. नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी. आजारी जनावरांची काळजी घ्यावी.
आपल्या परिसरात टॅबॅनस/स्टोमोक्सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये. नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी. आजारी जनावरांची काळजी घ्यावी.
अल्प किंवा अतिवृष्टीमुळे कीटक व गोचीडच्या संख्येत वाढ होते. ही वाढ जनावरांच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब आहे. कीटक व गोचीड रक्त शोषण करतात, तसेच आदिजीवीजन्य आजारांचा प्रसारदेखील त्यांच्यामार्फत केला जातो. त्यामुळे ट्रिपॅनोझोमोसीससारखे कीटकजन्य आणि थायलेरीओसीस व बॅबेसीओसीससारख्या गोचीडजन्य आजारांचा प्रादुर्भाव पहायला मिळतो. पशुपालकांनी वेळीच आजारांचे निदान लक्षात घेऊन, तत्काळ पशुवैद्यकामार्फत उपचार करून घ्यावेत. तसेच गोचीडमुक्त गोठा ही संकल्पना राबवावी.
नियंत्रणाच्या रूपरेषा ः
ट्रिपॅनोझोमोसीस (सरा) ः
- टॅबॅनस/स्टोमोक्सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये.
- नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
- आजारी जनावरांवर तात्काळ उपचार करावेत.
- कळपामधील एका जनावराला आजाराची लागण झाल्याचे आढळल्यास इतरांची काचपट्टीद्वारे तपासणी करावी, आणि त्यांना प्रतिबंधात्मक औषधाची मात्रा तात्काळ द्यावी. यामुळे तीन महिन्यांपर्यंत या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.
बॅबेसीओसीस/थायलेरीओसीस ः
- गोचीड नियंत्रण करावे.
- आजारी जनावरांवर उपचार करावेत.
- जनावराला सकस चारा द्यावा. रक्त वाढवणाऱ्या औषधांची मात्रा द्यावी.
- इतर जनावरांची तपासणी व गरज भासल्यास औषधोपचार करावा.
संपर्क ः डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४
(परजीवीशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
- 1 of 34
- ››