Agriculture story in marathi, livestock diseases caused by ticks | Agrowon

नियंत्रण गोचीड, कीटकजन्य आजारांचे

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. गजानन चिगुरे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

आपल्या परिसरात टॅबॅनस/स्टोमोक्‍सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये. नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी. आजारी जनावरांची काळजी घ्यावी.
 

आपल्या परिसरात टॅबॅनस/स्टोमोक्‍सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये. नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी. आजारी जनावरांची काळजी घ्यावी.
 

अल्प किंवा अतिवृष्टीमुळे कीटक व गोचीडच्या संख्येत वाढ होते. ही वाढ जनावरांच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब आहे. कीटक व गोचीड रक्त शोषण करतात, तसेच आदिजीवीजन्य आजारांचा प्रसारदेखील त्यांच्यामार्फत केला जातो. त्यामुळे ट्रिपॅनोझोमोसीससारखे कीटकजन्य आणि थायलेरीओसीस व बॅबेसीओसीससारख्या गोचीडजन्य आजारांचा प्रादुर्भाव पहायला मिळतो. पशुपालकांनी वेळीच आजारांचे निदान लक्षात घेऊन, तत्काळ पशुवैद्यकामार्फत उपचार करून घ्यावेत. तसेच गोचीडमुक्त गोठा ही संकल्पना राबवावी.
 
नियंत्रणाच्या रूपरेषा ः
ट्रिपॅनोझोमोसीस (सरा) ः

  • टॅबॅनस/स्टोमोक्‍सीस या प्रजातींचे कीटक आढळल्यास जनावरांना सूर्यप्रकाशामध्ये चरायला सोडू नये.
  • नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
  • आजारी जनावरांवर तात्काळ उपचार करावेत.
  • कळपामधील एका जनावराला आजाराची लागण झाल्याचे आढळल्यास इतरांची काचपट्टीद्वारे तपासणी करावी, आणि त्यांना प्रतिबंधात्मक औषधाची मात्रा तात्काळ द्यावी. यामुळे तीन महिन्यांपर्यंत या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.

बॅबेसीओसीस/थायलेरीओसीस ः

  • गोचीड नियंत्रण करावे.
  • आजारी जनावरांवर उपचार करावेत.
  • जनावराला सकस चारा द्यावा. रक्त वाढवणाऱ्या औषधांची मात्रा द्यावी.
  • इतर जनावरांची तपासणी व गरज भासल्यास औषधोपचार करावा.

संपर्क ः डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४
(परजीवीशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी) 


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...