agriculture story in marathi, locust pest has created havoc in Maharashtra recently. The detail information about locust herewith. | Agrowon

टोळधाड- तूर्त संकट टळले !, तरी सतर्क, सुसज्ज राहणे गरजेचे

मंदार मुंडले
रविवार, 7 जून 2020

कोरोना संकटाशी सामना सुरू असतानाच राज्याला नव्या असलेल्या टोळधाडीचे भयंकर मोठे आव्हान महाराष्ट्राला विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना पेलावे लागले. पिकांचे, झाडांचे क्षणार्धात प्रचंड नुकसान करण्याची क्षमता असलेल्या टोळधाडीने आपला मोर्चा तूर्त मध्य प्रदेशाकडे वळवला आहे. तरीही धोका टळला असे न म्हणता नुकसान टाळण्यासाठी आपण कायम सतर्क व सुसज्ज राहणे गरजेचे आहे. त्या निमित्ताने टोळधाडीचा घेतलेला वेध.

कोरोना संकटाशी सामना सुरू असतानाच राज्याला नव्या असलेल्या टोळधाडीचे भयंकर मोठे आव्हान महाराष्ट्राला विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना पेलावे लागले. पिकांचे, झाडांचे क्षणार्धात प्रचंड नुकसान करण्याची क्षमता असलेल्या टोळधाडीने आपला मोर्चा तूर्त मध्य प्रदेशाकडे वळवला आहे. तरीही धोका टळला असे न म्हणता नुकसान टाळण्यासाठी आपण कायम सतर्क व सुसज्ज राहणे गरजेचे आहे. त्या निमित्ताने टोळधाडीचा घेतलेला वेध.
 
हवामान बदलामुळे किडी-रोगांचे संकट वाढले आहे. परराज्ये किंवा परदेशातील किडींचा धोका वाढला आहे. मक्यावरील स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा, पपईवरील मिलीबग ही त्याची उदाहरणे आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांनी कोरोना पाठोपाठ नुकतेच टोळधाडीचे नवे भयंकर संकट अनुभवले. प्रचंड मोठ्या थव्यांनी येणाऱ्या या टोळधाडीने दिसेल ते पीक, झाड, वनस्पती यांचा क्षणार्धात फडशा पाडला. किडीने नुकताच मध्य प्रदेशाकडे मोर्चा वळवला असला तरी हे संकट महाराष्ट्रावर पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपण सदैव सुसज्ज व सर्वतयारीनिशी असणे गरजेचे आहे.

काय आहे टोळधाड?

 • टोळधाड (लोकस्ट) हा नाकतोडे वर्गातीलच (ग्रासहॉपर) प्रकार
 • नाकतोडे शक्यतो स्वतंत्र आढळतात. टोळ समुहाने एकत्र येतात. त्यांचे पाठीमागील पाय मोठे. जेणे करून उडण्याची क्षमता प्राप्त होते. अत्यंत वेगाने प्रचंड किलोमीटर अंतर पार करू शकतात.
 •  त्यांचे वर्तन व सवयी नाकतोड्यांपेक्षा वेगळ्या.
 • जगभरात लोकस्टच्या सुमारे १० महत्त्वाच्या प्रजाती आढळतात.
 • -पैकी भारतात आढळणाऱ्या पुढीलप्रमाणे
 • डेझर्ट लोकस्ट (शास्त्रीय नाव- Schistocerca gregaria)
 • मायग्रेटरी लोकस्ट
 • बॉंबे लोकस्ट
 • ट्री लोकस्ट
 • वर्षाला २०० मिमी. पाऊस पडणाऱ्या आफ्रिकेतील वाळवंटी- कोरडवाहू (एरीड) व अर्धवाळवंटी कोरडवाहू (सेमी अरिड) भागातील ही मुख्यतः कीड
 • यात ३० देश व १६ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र
 • टोळधाडीची महामारी येते त्यावेळी ६० देशांतील सुमारे २९ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापू शकते. अशावेळी जागतिक लोकसंख्येच्या एक दशांश भागातील जीवनमान उध्वस्त करण्याची तिची क्षमता.

यापूर्वीची महामारी

 • किती वर्षांनी महामारी येते हे सांगता येत नसले तरी प्राचीन इजिप्त इतिहासकाळापासून नोंद.
 • या दशकातील नोंद- १९२६-१९३४, १९४०-४८, १९४९-६३, १९६७-६९, १९८६-१९८९ व यंदाचे वर्ष.

 
जीवनचक्र-

 •  तीन ते पाच महिने (हवामान व पर्यावरण परिस्थितीनुसार)
 • -डीअवस्था- दोन आठवडे (१० ते ६५ दिवस)
 • पिल्लावस्था- (हॉपर)- पाच ते सहा अवस्था (३० ते ४० दिवस)
 • प्रौढावस्था-३ आठवडे (दोन, चार महिन्यांपर्यंतही)

दोन बाबी माहीत असणे गरजेचे.
(ज्या आधारे टोळधाड मार्गक्रमणाची दिशा स्पष्ट होते.)

 • १))प्रादुर्भावित देशांची भौगोलिकदृष्ट्या तीन भागांत विभागणी
 • पश्‍चिम विभाग- आफ्रिकी देश- उदा. माली, अल्जेरिया, मोरोक्को, चाद, लिबिया
 • मध्य विभाग- इजिप्त, सुदान, इथिओपिया, सौदी अरेबिया, इराक
 • पूर्व विभाग- इराण, अफगणिस्थान, पाकिस्तान, भारत

२) पुनरुत्पादन हंगाम (ब्रिडींग सिझन)

 • १)हिवाळा (विंटर)- नोव्हेंबर ते डिसेंबर
 • २)वसंत- (स्प्रिंग)- जानेवारी ते जून
 • ३)उन्हाळी- (समर)- जुलै ते ऑक्टोबर
 • भारतात केवळ उन्हाळी हंगाम आढळतो. पाकिस्तानात स्प्रिंग व उन्हाळी असे दोन्ही हंगाम.
 • यंदा पाकिस्तानात स्प्रिंग हंगामात पुनरोत्पादीत झालेल्या टोळधाडीचा थवा राजस्थानातून मध्य प्रदेश व तेथून महाराष्ट्रात पोचला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अँफन वादळाचा परिणाम व वाऱ्याच्या दिशांचाही परिणाम होता.

टोळधाड विषयात कार्यरत प्रमुख संस्था

 • लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन- (LWO)
 • मध्यवर्ती मुख्यालय- फरिदाबाद, हरियाणा, प्रक्षेत्र मुख्यालय- जोधपूर, राजस्थान
 • विभागीय कार्यालये- एलओसी (लोकस्ट सर्कल ऑफीसेस) नावाने.
 • केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पीक संरक्षण, क्वारंटाईन व साठवणूक संचालनालय (डिरेक्टोरेट ऑफ प्लॅंट प्रोटेक्शन क्वारंटाईन ॲण्ड स्टोरेज) अंतर्गत ही संघटना कार्यरत

संघटनेची मुख्य कार्ये

 • देशातील टोळधाडग्रस्त वा वाळवंटी प्रदेशात (राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा)
 • अत्यंत सखोल सर्वेक्षण, नियंत्रणात्मक सर्व पद्धती राबवणे
 • पिकांचे नुकसान वाचवण्यासाठी सुमारे दोन लाख चौरस किलोमीटर वाळवंटी प्रदेशात सातत्याने देखरेख
 • टोळधाड ताजी स्थिती, धोके, नियंत्रण याबाबत भारत- पाक बैठका
 • एफएओसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेसमवेत सातत्याने समन्वय
 • तंत्रज्ञान, नियंत्रण पद्धतीविषयी प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन.
 • (संबंधित अधिकारी, राज्यांचे कृषी विभाग, शेतकरी यांच्यासाठी)
 • आणीबाणीच्या संकटावर मात करण्यासाठी नियंत्रण क्षमता तयार करणे, मोहिमा राबवणे
 • टोळवर्गावर तसेच रासायनिक व जैविक कीडनाशकांची जैवक्षमता तपासण्यासाठी संशोधन
 • वेळोवेळी पूर्वसूचना (ॲलर्ट), सल्ला माहितीपत्रे (ॲडव्हायसरी बुलेटिन्स)

‘एफएओ’ चे कार्य

 • संयुक्त राष्ट्रसंघाअंतर्गत अन्न आणि कृषी संघटना (एफएओ- मुख्य कार्यालय- रोम, इटली)
 • हीच कार्ये जागतिक स्तरावर राबवते. त्यातून सर्व देशांमध्ये समन्वय
 • टोळधाडी विषयी संपूर्ण माहिती, उपग्रह छायाचित्रे, हवामान, ताजी स्थिती, मार्गक्रमण, नियंत्रण उपाय आदींच्या अनुषंगाने वेळोवेळी इशारे, सल्ले, प्रशिक्षण कार्यक्रम 
 • एफएओचे अधिकारी किथ क्रेसमन म्हणतात....
 • पक्षी, साप, पाली, उंदीर असे अनेक परभक्षी असले तरी डेझर्ट लोकस्ट त्यांच्यापासून सुटका करून घेऊ शकतात.
 • उच्च तापमान, वाळवंटी हवामान त्यांच्यासाठी अधिक अनुकूल
 • स्थानिक टोळ झुंडीने एकत्र आल्यासही मोठा धोका.
 • पैदाशीची ठिकाणे शोधण्यासाठी, पावसाची क्षेत्रे, हिरवी शेते वा कुरणे शोधण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा उपयोग महत्त्वाचा.

डेझर्ट लोकस्ट नियंत्रण- ‘सीआयबीआरसी’द्वारा संमत कीटकनाशके
(केवळ शेड्यूल्ड वाळवंटी प्रदेशात)

 • मॅलॅथिऑन- ९६ टक्के यूएलव्ही
 • मॅलॅथिऑन ५ टक्के डीपी
 • फेनव्हलरेट ०-४ टक्के डीपी
 • क्विनॉलफॉस १. ५ टक्के डीपी
 • पिके, बाभूळ व अन्य झाडांवर फवारणी
 • क्लोरपायरिफॉस २० टक्के इसी
 • क्लोरपायरिफॉस ५० टक्के इसी
 • डेल्टामेथ्रीन २.८ टक्के इसी
 • डेल्टामेथ्रीन १.२५ टक्के यूएलव्ही
 • डायफ्ल्यूबेंझ्युरॉन- २५ टक्के डब्ल्यूपी
 • फिप्रोनील ५ टक्के एससी
 • फिप्रोनील २.९२ टक्के इसी
 • लॅंबडा सायहॅलोथ्रीन- ५ टक्के इसी
 • लॅंबडा सायहॅलोथ्रीन १० टक्के डल्ब्यूपी
 • मॅलॅथिऑन ५० टक्के इसी
 • मॅलॅथिऑन २५ टक्के डब्ल्यूपी

 नियंत्रण

 • थाळ्या, फटाके वाजवणे, ट्रॅक्टरचा आवाज करणे आदी उपायांचा वापर टोळधाडीला शेतापासून पळवून लावण्यासाठी होतो. मात्र फवारणी हा नियंत्रणाचा महत्त्वाचा पर्याय असू शकतो.
 • शेतकरी वैयक्तिक स्वरूपात फवारणी करू शकत नाही.
 • त्याची कारणे
 • १)टोळधाड एका जागी न थांबता दिवसा थव्यांच्या रूपाने सक्रिय असणारी, हवेत उडणारी (फ्लाईंग) कीड आहे. प्रति दिन १०० ते १५० किलोमीटर प्रवास करू शकते.
 • २)एका थव्यात (स्वार्म) प्रति चौरस किलोमीटर वर्गात ४ ते ८ कोटी एवढ्या प्रचंड संख्येने संख्या असते.

नियंत्रणासाठी खालील घटकांचे एकत्रीकरण हवे.

 • कृषी विद्यापीठ वा संशोधन संस्था- कीडनाशक निवड, मात्रा, तांत्रिक मार्गदर्शन
 • कृषी विभाग
 • शेतकरी
 • एकमेकांच्या समन्वयातून फवारणी कार्यक्रम आराखडा, यंत्रणा, मनुष्यबळ, फवारणी यंत्रे, कीटकनाशके उपलब्धता व प्रत्यक्ष कार्यक्रम अंमलबजावणी

खालील घटकांचे साह्यही मोलाचे

 • स्वयंसेवी संस्था
 • -कीडनाशक उद्योगातील विभागीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना
 • प्रसारमाध्यमे- वेळोवेळी शास्त्रीय प्रबोधन व जागरूकता

नियंत्रणाची मुख्य वेळ

 • संध्याकाळी सहा- सातनंतर ते रात्रभर व सूर्योदय होण्यापूर्वीच्या वेळेत फवारणी
 • या काळात टोळधाड जमिनीवर किंवा झाडा-झुडपांवर हालचाल न करता शांत बसून असते.

‘यूएलव्ही’ फवारणीबाबत

 • यूएलव्ही (अल्ट्रा लो व्हॉल्यूम) प्रकारातील कोणत्याही फॉर्म्युलेशनचा (उदा. मॅलॅथिऑन ९६ टक्के यूएलव्ही) वापर फक्त ‘एलडब्ल्यूओ’ च्या कुशल अधिकाऱ्यांकडून. त्याचे स्प्रेअरही वेगळे.
 • त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणासही या कीटकनाशकांचा वापर करण्यास मनाई.
 • कृषी सेवा केंद्रातही ते उपलब्ध होत नाही.
 • कीडनाशक उद्योगातील सरकारी कंपनीकडून मागणीनुसार एलडब्ल्यूओला त्याचा पुरवठा.
 • यूएलव्ही फॉर्म्युलेशन सर्वोच्च तीव्रतेचे (हायस्ट कॉन्संट्रेट) स्वरूपाचे. त्यात मिश्रणासाठी पाण्याचा वापर केला जात नाही.
 • शेतकऱ्यांना वापरण्यासाठीचे म्हणजे बाजारपेठेत मिळणाऱ्या मॅलॅथिऑनचे फॉर्म्युलेशन ५० टक्के इसी (तुलनेने सौम्य)असते. त्याचे पाण्यात मिश्रण करून फवारणी करण्यात येते.

 बिकानेर जिल्ह्याने केले प्रभावी नियंत्रण
राजस्थानला टोळधाडीचे संकट नवे नाही. बिकानेर जिल्ह्याने १९९३, २००३, २००७, २०१९ व यंदा टोळधाडीशी सामना केला आहे. मागील वर्षी मे ते जानेवारीपर्यंत त्याची मोठी समस्या राहिली. त्यामुळे
त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे. बिकानेरचे कृषी उपसंचालक जगदीश पुनिया म्हणाले की आमच्याकडे बीटी कापूस व भुईमूग ही मुख्य पिके असतात. कापूस हे टोळधाडीचे आवडीचे पीक असून अत्यंत कमी वेळेत ते मोठ्या प्रमाणात फस्त करतात. भुईमूग हे तुलनेने कमी आवडीचे पीक आहे. आमच्याकडे टोळधाडीचा प्रादुर्भाव पाकिस्तानातून होतो.

नियंत्रण ‘स्‍ट्रॅटेजी’

 • नियंत्रणासाठी बिकानेर कृषी विभागाचे विशेष पथक.
 • शेतकऱ्यांचे नेटवर्क. त्याद्वारे कृषी विभाग त्यांच्यासोबत कायम संपर्कात
 • त्यातून दिवसभर सक्रिय असलेली टोळधाड संध्याकाळी कोठे स्थिरावते याचा अंदाज येतो. त्यासाठी विंडी ॲपचीही मदत
 • काहीवेळा ड्रम वाजवून टोळधाड पडीक किंवा मोकळ्या मैदानी प्रदेशात स्थिर होण्यासाठी वळेल असाही शेतकऱ्यांकडून प्रयत्न. बोर किंवा अन्य झाडांवरही ते बसतात.
 • मग कृषी विभागाची ‘रेस्क्यू टीम’ कीटकनाशक घेऊन तेथे पोचते.

असा असतो फवारणी कार्यक्रम

 • ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रेअर्सचा वापर (स्प्रेअर्स शेतकऱ्यांचे)
 • त्याची पाईप दूरवर नेता येते. गनमधून प्रेशर चांगले मिळते. २५ ते ४० फूट उंच झाडांवरही फवारणी शक्य होते.
 • बिकानेर कृषी विभाग अशा ३५० स्प्रेअर्सद्वारे सुसज्ज
 • टोळधाडीची संख्या, तापमान, उष्णता आदी बाबींचा फवारणीपूर्वी अभ्यास
 • रात्री ११ ते पहाटेपर्यंत फवारणी. वाळवंटी असल्याने बिकानेरमध्ये तापमान ४६ अंशापर्यंतही पोचते. अशा उष्णतेत टोळधाड पहाटे लवकर सक्रिय होते. फवारणी त्यापूर्वी आटोपण्यात येते.
 • मुख्यत्वे क्लोरपायरिफॉस. काही वेळा डेल्टामेथ्रीन, लॅंबडा सायहॅलोथ्रीन यांचा वापर.
 • क्लोरपायरिफॉस ५० टक्के इसी सर्वात परिणामकारक वाटल्याचा अनुभव.
 • जानेवारीच्या थंडीच्या काळात पहाटे धुके पडते. अशावेळी सकाळी नऊपर्यंतही फवारणी केली.
 • आठवड्यात एके ठिकाणी दोन वेळाही फवारणीची काहीवेळा गरज.

यूएलव्ही व फायर ब्रिगेडची मदत

 • बिकानेर कृषी विभागाकडून गरजेनुसार ‘एलओसी’ ची मदत. जीपसारख्या वाहनातून त्याद्वारे यूएलव्ही फवारणी. त्याचा वापर ‘शेड्यूल्ड डेझर्ट एरिया’ अथवा मोकळ्या जमिनीतच. पिकांवर फवारणी नाही.
 • यूएलव्हीचा झोत सहा मीटर उंच जातो. वारे उत्तर व दक्षिण असतील तर वाहन पूर्व पश्‍चिम चालते.
 • त्याचे थेंब ५० ते १०० मायक्रॉन इतक्या कमी आकाराचे.
 • रस्त्याकडेच्या झाडांवर फवारणीसाठी अग्निशामक बंबाची मदत घेण्यात येते.
 • सर्व माध्यमांतून टोळधाडीचे सुमारे ६० टक्क्यांपर्यंत यशस्वी नियंत्रण. उर्वरित ४० टक्के टोळांवरही देखरेख.

राजस्थानात ड्रोनचा वापर सुरू
‘एलडब्ल्यूओ’ च्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की यंदा जयपूर व अन्य दोन-तीन ठिकाणी
आम्ही ड्रोनद्वारे फवारणी सुरू केली आहे. ड्रोन केवळ १५ लिटर क्षमतेचे व ‘बॅटरी ऑपरेटेड’ असतात.
त्यामुळे सतत भरून घेण्याची समस्या असते. डोंगर, टेकडी, काटेकुटे, बाभळी अशा अवघड भागात नियंत्रण करण्यासाठी ड्रोन फायदेशीर ठरतात. मात्र मैदानी प्रदेशात ट्रॅक्टर माऊंटेड यंत्रे अधिक फायदेशीर राहतील. मागील वर्षापासून टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. राजस्थानातील ११, गुजरातमधील दोन व पंजाबातील थोडासा भाग प्रादुर्भावित होता. अँफन वादळामुळे तो अन्यत्र वळला.

एअर क्राफ्टचा वापर
आपल्याकडे १९९३ मध्ये हे साधन उपलब्ध होते. सध्या वापरात नाही. सध्या हवाई दलाची काही हेलिकॉप्टर्स आहेत. (एमआय १७). इंग्लंडहून नोझल्स किंवा स्प्रेईंग कीट यायची बाकी आहेत. त्यानंतर त्यांचा वापर करण्याचे प्रयोजन आहे.
 
महत्त्वाचे व तातडीने करावयाचे उपाय

 • -शास्त्रीय पंचनामे व शेतकऱ्यांना त्वरित, पुरेशी नुकसानभरपाई.
 • -टोळधाड ओळख, नियंत्रण, परिस्थिती हाताळणी आदी प्रशिक्षण कार्यक्रम.
 • शेतकरी, कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्रे, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, कीडनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी,
 • प्रसारमाध्यमे यांच्यासाठी
 • -सर्वेक्षण, देखरेख (सर्वेलन्स, मॉनिटरिंग) व नियंत्रण यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी. त्यात सातत्य.
 • -टोळमादी वालुकामय व ओलावा असलेल्या ठिकाणी मातीत खोलवर अंडी घालते. ठिकठिकाणच्या अशा जागा शोधून तेथे सातत्याने सर्वेक्षण. प्रसंगी उच्च तंत्राच्या कॅमेरा तंत्राचा वापर शक्य होईल का ते पाहणे.
   
 • शास्त्रज्ञांची जबाबदारी अधिक
 • टोळधाडच नव्हे तर नव्याने येऊ घातलेल्या तसेच गंभीर संकट निर्माण केलेल्या किडी-रोगांबाबत अधिक प्रभावी संशोधनाची गरज.
 • अधिक संशोधन झालेल्या देश- परदेशातील संस्था, अनुभवी शास्त्रज्ञ यांच्यासोबत राज्यातील शास्त्रज्ञांनी नेटवर्क वाढवणे गरजेचे. जेणे करून त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा.
 • कीड येण्यापूर्वी इशारा देण्याऱ्या (फोरवार्निंग सिस्टीम) अचूक व अत्याधुनिक यंत्रणेची गरज व अंमलबजावणी. राज्यातील नियमित किडींबाबत पूर्वइशारा देणे अवघड राहिलेले नाही. मात्र राज्य व देशाबाहेरील किडी-रोगांबाबत धोक्याचे इशारे देण्याबाबत प्रभावी कार्य होणे गरजेचे.
 • रासायनिक उपायांना प्रभावी जैविक पर्याय शोधण्याची गरज

 (लेखक ॲग्रोवनचे उपमुख्य उपसंपादक व पीक संरक्षण विषयाचे अभ्यासक आहेत)

संपर्क- मंदार मुंडले- ९८८१३०७२९४

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...