agriculture story in marathi, Mahatma Phule Agri. University has developed farm machinery for farmers. | Agrowon

वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान

सूर्यकांत नेटके
बुधवार, 24 नोव्हेंबर 2021

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी’ विभागाने आत्तापर्यंत ३९ विविध अवजारे, यंत्रे विकसित करून त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन तयार केलेल्या यंत्रांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ व मजूरबळ कमी करण्याचे प्रयत्न झाले आहेत.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी’ विभागाने आत्तापर्यंत ३९ विविध अवजारे, यंत्रे विकसित करून त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन तयार केलेल्या यंत्रांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ व मजूरबळ कमी करण्याचे प्रयत्न झाले आहेत.
 
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात १९८५ मध्ये ‘कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी स्वतंत्र विभाग सुरु झाला. चाळीस वर्षांत त्याद्वारे विविध ३९ यंत्रे विकसित झाली.

यंत्रे व वैशिष्ट्ये
ट्रॅक्‍टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र
हरभरा, सोयाबीन, भुईमूग बियांची टोकण करता येते. दोन ओळींतील व दोन रोपांमधील अंतर बदलता येते. प्रति तासाला ४० गुंठ्यावर वरंबे तयार करून टोकण करता येते

स्वयंचलित लसूण घास कापणी यंत्र
प्रति तासात अधिक प्रमाणात घास कापते. त्यातून मजुरीत ९० टक्के तर खर्चात ४८ टक्के बचत होते.

ट्रॅक्‍टरचलित सरीवरंबा बहुपीक टोकण यंत्र
हरभरा, सोयाबीनची टोकण करता येते. सरी-वरंब्याचा आकार आवश्यकतेनुसार बदलता येतो. दोन सऱ्यांतील व दोन रोपांमधील अंतर बदलता येते. पेरणी वरंब्याच्या वरच्या टोकापासून सरीच्या तळापर्यत आवश्यकतेनुसार कोणत्याही ठिकाणी करता येते. प्रति तासाला ४६ गुंठ्यावर वरंबे तयार करून टोकण करता येते.

ट्रॅक्‍टरचलित ऊस आंतरमशागत यंत्र
उसाला भर देणे आणि दाणेदार खत पेरणीसाठी उपयुक्त यंत्र आहे. मातीचा वरचा थर फोडणे, उसाला भर देणे, खत पेरणी अशी कामे एकाच वेळी करता येतात. मुळाशी खतपेरणी झाल्याने वाढीस मदत होते. बाळबांधणी व मुख्यबांधणीही नुकसान टाळून करता येते. १२० सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतरावरील उसात वापर करता येतो.
 
बहुउद्देशीय शेतीयंत्र
एका बैलजोडीच्या साहाय्याने चालते. फणणी, कुळवणी.
-तूर, सोयाबीन, उडीद, मका, भुईमूग, रब्बी ज्वारी आदी पिकांसह आंतरपिकांची पेरणी.
दोन ओळीतील अंतर १२, १५ व १८ इंच इतके कमी अथवा जास्त करता येते.
-बियाणे नियंत्रित करणारी यंत्रणा बाजूला काढता येते. खताची पेरणी मानवचलित चाढ्याद्वारे करून बियाणांच्या खाली व वरच्या बाजूला २ ते २.५ सेंटीमीटरवर खत पडते. बियाणांच्या तबकड्या सहज बदलता येतात.

ट्रॅक्टर चलित मोल नांगर
जमिनीतील अतिरिक्त पाणी, क्षाराचा निचरा करण्यासाठी कमी खर्चातील हे यंत्र टॅक्टरद्वारे वापरता येते. सछिद्र निचरा पद्धतीसाठी वापर करता येतो.
 
बहुपीक टोकणयंत्र

 • ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग, सूर्यफूल, गहू आदींचे टोकण, खत पेरणी.
 • ट्रॅक्टर व पॉवरटीलर चलित. वजनाला हलके, वापरास सुलभ.
 • एकसमान अंतरावर टोकण. त्यामुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहून उत्पादनात वाढ होते.

बैलचलित ऊस आंतरमशागत यंत्र
दोन ओळीतील अंतर ९० ते १०० सेंटीमीटर असलेल्या उसातील गवत काढणे, आंतरमशागत आणि भर टाकण्यास उपयुक्त. वजनास हलके. त्यामुळे बैलजोडीला ओढणे सोपे. बहुपयोगी अवजाराच्या विविध यंत्रणा सहजासहजी बसवणे सोपे.
 
बिया फोडणी यंत्र

 • हिरडा, बेहडा, रिठा आदी औषधी बिया फोडण्यासाठी उपयुक्त.
 • प्रति तासाला ११ ते १२ किलो बिया फोडते. वजनाला हलके. उचलून नेणे शक्य.

ज्वारी काढणी चिमटा
मुळासह ज्वारी काढण्यासाठी विकसित केलेल्या मानवचलित चिमटयाने कमी कष्टात मुळासह ज्वारी काढता येते. वजनाला हलके असल्याने वापरास सुलभ.
 
कांदा रोप लागवड यंत्र

टॅक्टरचलीत या यंत्राद्वारे २० बाय ११ सेंटीमीटर अंतरावर एका तासात ९१ गुंठ्यावर लागवड शक्य. ७३ टक्के मजुरीची बचत.
 
कडबाकुट्टी यंत्र

 • लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी सिंगल फेज १ अश्वशक्तीचे विद्युतचलित यंत्र.
 • ओली ज्वारी, मका, ऊस, वाळलेली ज्वारी आणि मका यात वापर.

चारसूत्री भात लागवड चौकट

 • १.२० बाय ०.४० व १५ बाय २५ सेंटीमीटरवर पुनर्लागवडीसाठी सोयीचे.
 • ब्रिक्रेटयुक्त खताचा वापर सुलभ होऊन उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ.

बंदिस्त वाफे तयार करण्याचे अवजार

 • हायड्रॉलिक यंत्राच्या साहाय्याने दोन मीटर रुंदीचे बंदिस्त वाफे तयार करता येतात.
 • लांबी आवश्यकतेनुसार बदलता येते.
 • जलसंधारणासाठी दुष्काळी भागासाठी उपयुक्त.
 • ट्रॅक्टरद्वारे चालवता येते. एका दिवसात चार ते साडेचार हेक्टरवर वाफे करता येतात.
 • मजुरी व अन्य खर्चात ८३ टक्के बचत.

बियाणे कवच फोडणीयंत्र

 • सिंगल फेज १ अश्वशक्तीचे विद्युत मोटार चलित यंत्र.
 • हिरडा, बेहडा, रिठा आदींचे प्रति तासाला १२५ ते १५० किलो बिया कवच फोडते.
 • आदिवासी भागासाठी फायदेशीर.

शेवगा शेंगा काढणी झेला
उंच झाडावरील शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी उपयुक्त.
शेंगांना इजा होऊ न देता दर तासाला २५० ते २८० शेंगा काढता येतात.

ऊस बेणे कापणी यंत्र

 • एका डोळ्याच्या उसाचे बेणे कापण्यासाठी, ऊस रोपवाटिका, मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीसाठी.
 • विद्युत चलित यंत्राद्वारे एका डोळा ऊसबेणे कापण्याची क्षमता ताशी ६६५०.
 • एकाच वेळी चार मजुरांच्या साहाय्याने बेणे कापणी. बेण्याची लांबी ४० ते ७० सेंटीमीटर ठेवता येते.

ऊसरोपे लागवड यंत्र
टॅक्टरचलित यंत्राद्वारे दर तासाला २० गुंठे रोपे लागवड.
लागवडीच्या खर्चात पारंपरिक पद्धतीपेक्षा ६२ टक्के बचत.
 
कुट्टी यंत्र
फळबागेत छाटणीनंतर उपलब्ध होणाऱ्या अवशेषाची कुट्टी करून बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्यासाठी हायड्रॉलिक पद्धतीचा वापर. एका तासात ४७ गुंठे क्षेत्रावरील अवशेषांची कुट्टी करते. पारंपारिक पद्धतीच्या खर्चात ७२ टक्के बचत.
 
फळबाग व्यवस्थापन यंत्र
फळबागांतील जारवा तोडणे, वरंबा फोडण्यासाठी उपयुक्त. झाडांना कोणती इजा होऊ न देत नाही. हायड्रो-मेकॅनिक नियंत्रित सेन्सर्सचा वापर. एका तासात १३ गुंठे क्षेत्रावर व्यवस्थापन करते.
 
नवे तंत्रज्ञान

विद्यापीठाने विविध यंत्रे- अवजारे शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने नव्या तंत्रज्ञानावर भर दिला आहे. द्राक्ष बागेत कुट्टी यंत्र विकसित करण्यावर भर आहे. फळबागांत रिमोटचलित फुले रोबो विकसित केला आहे. केवळ पिकलेले, अडचणीच्या ठिकाणी असलेले अचूक फळ तोडणीसाठीही रोबो विकसित करण्याचे काम सुरु आहे.जमीन सपाटीकरणासंबंधी, अत्याधुनिक पेरणी यंत्रावरही संशोधन सुरु आहे.

मोबाईल ॲपवर नोंदणी
यंत्राविषयी माहितीची देवाणघेवाण व माहितीसाठी ‘फुले सॅम’ व ‘फुले सन्मान’ हे मोबाईल ॲप्स विभागाने मोफत उपलब्ध केले आहेत. सहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे.

‘फुले रोबो’ ला बक्षीस
केंद्रीय कृषी मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘ॲग्री इंडिया हॅकेथॉन’ स्पर्धेत विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘फुले रोबो’ या यंत्राला स्पर्धेत एक लाख रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. देशातून सुमारे सहा हजार यंत्रे स्पर्धेत सहभागी होती.

संपर्क- डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,
(कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग प्रमुख
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

विद्यापीठाचे यंत्रे, अवजारे विक्री केंद्र- ०२४२६- २४३२१९


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...
हाडावर वाढवता येईल संगणक!हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार...
एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने...एकाच प्रकारच्या शेतीवर अवलंबून राहिल्यास आर्थिक...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...
ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्रटोकण यंत्राद्वारे पेरणी केल्यास रोपांची संख्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने...
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित...काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
लेसर चिमट्याने पकडता येतील विषाणूसिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील...
वनस्पतींचे भौगोलिक मूळ ठरवणे होईल सोपेविविध पिके किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये भौगोलिक...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
शेतातून पिकासोबतच घेता येईल सौरऊर्जा...शेती आणि सौरऊर्जा यांचे उत्पादन एकाच वेळी घेणे...
शेतीत यांत्रिकीकरण रूजवलेले चौधरीममुराबाद (ता.. जि. जळगाव) येथील मनोज सदाशिव चौधरी...
नाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक...भाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित...