agriculture story in marathi, Mahendra Jondhale a small holder from Parbhani Dist. has became successful sericulture farmer. | Agrowon

अल्पभूधारकाला आधार रेशीम शेतीचा

माणिक रासवे
मंगळवार, 8 जून 2021

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीसारखे पूरक व्यवसाय फायदेशीर ठरले आहेत. ही बाब परभणी जिल्ह्यातील शेंद्रा येथील तरुण शेतकरी महेंद्र जोंधळे यांच्याबाबत सिद्ध झाली आहे. चार एकर पारंपरिक शेतीला तांत्रिक मार्गदर्शनातून केलेली रेशीम शेती महत्त्वाचा आर्थिक आधार ठरली आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीसारखे पूरक व्यवसाय फायदेशीर ठरले आहेत. ही बाब परभणी जिल्ह्यातील शेंद्रा येथील तरुण शेतकरी महेंद्र जोंधळे यांच्याबाबत सिद्ध झाली आहे. चार एकर पारंपरिक शेतीला तांत्रिक मार्गदर्शनातून केलेली रेशीम शेती महत्त्वाचा आर्थिक आधार ठरली आहे. उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत मिळाला आहे.

सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी पारंपरिक शेतीला पर्याय शोधत आहेत. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीचा पर्याय वरदान ठरत आहे. परभणी जिल्ह्यातही रेशीम शेतीकडे वळण्याचा कल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तुती लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. परभणी- ताडळकळस राज्य मार्गावरील शेंद्रा येथील महेंद्र तुकाराम जोंधळे यांची रेल्वे मार्गाला लागून चार एकर मध्यम ते भारी जमीन आहे. सिंचनासाठी बोअरची व्यवस्था आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात हे क्षेत्र येते. परंतु दरवर्षी कालव्याची आवर्तने मिळण्याची खात्री नाही. या भागातील शेतकऱ्यांप्रमाणे जोंधळे देखील काही पूर्वी खरीप, रब्बी व उन्हाळी भुईमूग अशी पिके घेत. मिरची, कांदा, गाजर, कोथिंबीर, विविध पीकपद्धतीचा अवलंब केला. मात्र विविध कारणांनी समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही.

रेशीम शेतीने दाखवला मार्ग
गावातील शेतकरी रेशीम शेती करीत होते. त्यांना महिन्याकाठी चांगले उत्पन्न देणारे साधन त्यातून मिळाले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत जोंधळे यांनीही रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. विविध ठिकाणांहून त्यासंबंधीची माहिती घेतली. यू-ट्यूब चॅनेलवर शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्या. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांची मुलाखत पाहिली. त्यांची भेट घेत सविस्तर माहिती घेतली. रेशीम संशोधन योजनेतर्फे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षणदेखील पूर्ण केले.

रेशीम शेतीला प्रारंभ
सन २०१६ मध्ये एक एकर क्षेत्रावर व्ही वन वाणाच्या तुतीची लागवड करून रेशीम शेतीचा प्रारंभ केला. तुतीबागेशेजारी ६० फूट लांबी, २५ फूट रुंदी व १६ फूट उंच आकाराचे टीनपत्र्याचे छत असलेले रेशीम कीटकसंगोपनगृह बांधकाम केले. लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने रॅक तयार केले. त्यासाठी तीन लाख रुपये खर्च झाला. रॅकमध्ये नॉयलॉन जाळ्यांऐवजी घरातील जुन्या साड्यांचा वापर केल्यामुळे खर्च कमी करता आला. बरबडी (ता. पूर्णा) येथील रेशीम उत्पादक श्रीधर सोलव यांच्याकडून चॉकी (बाल्यावस्थेतील रेशीम कीटक) खरेदी केले. पहिल्या वर्षी थोडे कमी उत्पादन मिळाले. अनुभव येत गेला तसे संगोपनातील बारकावे माहीत होऊ लागले. कोष उत्पादनातही सुधारणा झाली. आता सुमारे चार ते पाच वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

व्यवस्थापनावर भर

  • व्यवस्थापन काटेकोर केले.
  • कोष काढणी झाल्यानंतर संगोपनगृहाची साफसफाई, निर्जंतुकीकरण या बाबींवर कटाक्षाने भर
  • तुतीचा उत्तम प्रतीचा पाला दर्जेदार कोष उत्पादनासाठी अत्यंत
  • महत्त्वपूर्ण आहे. चॉकी अवस्थेत कीटकांची विशेष काळजी घेतली जाते.
  • पुढील बॅच घेण्यासाठी तुती बागेचे व्यवस्थापनही महत्त्वाचे असते. कोष काढणी सुरू होते त्या वेळीच बागेची छाटणी केली जाते. त्यानंतर नांगरणी, वखरणी करून खतांच्या मात्रा देऊन पाणी देण्यात येते.
  • छाटणीनंतर दीड महिन्याच्या कालावधीत पाला तयार होतो. त्यानंतर चॉकी आणून पुढील बॅच सुरू होते.

कोष उत्पादनात वाढ
सुरुवातीची काही वर्षे रेशीम कीटकाच्या बायव्होल्टाइन जातीच्या प्रति १०० अंडीपुंजांच्या बॅचपासून ८० ते ९० किलो कोष उत्पादन मिळायचे. बंगळूर जवळील रामनगरम येथील मार्केटमधे कोषांची विक्री व्हायची. खात्रीशीर उत्पन्न मिळू लागले. आत्मविश्‍वास वाढला. त्यामुळे तुतीचे क्षेत्र वाढवले. आज ते सुमारे दीड एकर आहे. वर्षभरात सुमारे चार ते पाच बॅचेस घेतल्या जातात. सरासरी २०० अंडीपुंजांपासून १२५ ते १५० किलो कोष उत्पादन मिळते. खर्च वजा करता वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. डॉ. लटपटे यांच्यासह जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांचे मार्गदर्शन मिळते.

रेशीम कोष उत्पादन (वार्षिक)

वर्ष          अंडीपुंज.. कोष उत्पादन (किलो)  दर (रू.)
२०१७-१८.. .९००.  .  .४८०..             ४२५
२०१८-.१९.. १२००      ६४०                ३३०
२०१९-२०   १०००      ५७०                ३८०

विक्रीचे प्रयत्न
मराठवाड्यात रेशीम कोष खरेदी मार्केट नव्हते. सुरुवातीची काही वर्षे अन्य शेतकऱ्यांप्रमाणे जोंधळे यांना परभणी येथून रेल्वेद्वारे रामनगरम येथील मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी न्यावे लागत. त्यासाठी वाहतूक खर्च तसेच वेळ लागत असे. त्यानंतर तेलंगणातील जनगाव येथील मार्केटमध्ये कोष विक्री केली जायची. पुढे जालना व दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पूर्णा येथे रेशीम कोष खरेदी मार्केट सुरू झाले. त्यामुळे वाहतूक खर्च, वेळेत बचत होत आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे रेल्वे वाहतूक तसेच स्थानिक बाजारपेठा बंद राहिल्या. परिणामी कोष उत्पादन निम्म्यावर आले. गेल्या वर्षी प्रत्येकी २०० अंडीपुंजाच्या तीन बॅचेसमध्ये २५० किलो कोष उत्पादन मिळाले. पूर्णा येथील मार्केट मध्ये २०० ते ३०० रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागली. निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्याने यंदा नव्या जोमाने रेशीम कोष उत्पादनास सुरुवात होईल.

पीठगिरणीतून उत्पन्नस्रोत
महेंद्र यांच्यासोबत आई भारतबाई, वडील तुकाराम, पत्नी प्रतीक्षा हे कुटुंब सदस्यही शेती व रेशीम कोष उत्पादनात मदत करतात. बंधू रवी मुंबई येथे नोकरीस आहेत. जोंधळे यांची शेती गावापासून तीन किलोमीटरवर आहे. ये- जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे कुटुंबाने व मजुरांनी शेतातच वस्ती केली आहे. त्यामुळे कामांचा उरक वाढला आहे. सर्वांच्या सोयीसाठी जोंधळे यांनी पिठाची गिरणी सुरू केली आहे. त्याद्वारे पूरक उत्पन्न मिळते.

संपर्क- महेंद्र जोंधळे, ७९७२६८१४३८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
मानवलोक... ग्रामीण पुनर्रचनेसाठी...शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी...
पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय...पुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी)...
बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती...मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...