agriculture story in marathi, Mahesh Gojewad from Hadolati, Dist. Latur is doing his poultry business successfully. He has got best alternative tocrop farming in drought. | Agrowon

युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर पक्षीपालन 
धोंडोपंत कुलकर्णी 
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पोल्ट्री व्यवसायात घरच्यांची साथ 
महेश म्हणाले की, दुष्काळात शेतीतून उत्पन्न मिळवण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. ब्रॉयलर पक्ष्यांच्या व्यवसायाचा म्हणूनच शेतीला मोठा आधार झाला आहे. दोन कायमस्वरूपी मजूर आहेत. मात्र आईवडील, भाऊ व दोघांच्या पत्नी असे घरचे पाच ते सहा सदस्य मिळून व्यवसायात राबत असल्यानेच व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे शक्य झाले. 

लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या तरुणाने दुष्काळात शेतीत आलेल्या मर्यादा ओळखून ब्रॉयलर कोंबडीपालन सुरू केले. सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून एक हजार पक्ष्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय साडेसहा हजार पक्ष्यांपर्यंत विस्तारला आहे. वर्षाला सुमारे सहा बॅचेसमधून समाधानकारक उत्पादन घेत पक्ष्यांना चांगली बाजारपेठही मिळवली आहे. दुष्काळातील शेतीला या व्यवसायातून त्याने चांगलाच आधार दिला आहे. 

लातूर जिल्ह्यात हडोळती (ता. अहमदपूर) येथील महेश गोजेवाड यांची सुमारे दहा एकर शेती आहे. मात्र सातत्याने येत असलेल्या दुष्काळामुळे विविध पिके घेण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे महेश यांनी पूरक व्यवसायांची चाचपणी सुरू केली. पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. या क्षेत्रात नोकरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सेवादाता म्हणून व्यवसाय सुरू केला. त्याद्वारे दुग्ध व्यवसायातील बारकावे अभ्यासले. 

शेतीतून राजकारणात व पुन्हा शेतीत 
दरम्यान, गावाच्या राजकारणाची गोडी लागली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर शेतीकडे म्हणावे तसे लक्ष देणे शक्य होईना. त्यामुळे कष्टाच्या भाकरीकडे दुर्लक्ष झाले. मग महेश पुन्हा शेतीकडे वळले. दुग्ध व्यवसाय जेमतेम सुरू होता. मात्र अधिक अभ्यास केल्यानंतर ब्रॉयलर पक्ष्यांचा व्यवसाय फायदेशीर राहील असे वाटले. जिल्हा परिषदेच्या योजनेतून एक हजार ब्रॉयलर कोंबडीपालनाची योजना राबवण्यास सुरवात केली. यातूनच व्यवसायाची पहाट झाली असे म्हणता येईल 

व्यवसायातील ठळक बाबी 

 • व्यवसाय अधिक क्षमतेने चालावा यासाठी लातूर, नांदेड जिल्ह्यांतील पोल्ट्री व्यवसाय महेश यांनी प्रत्यक्ष पाहिले. हैदराबाद तसेच पुणे येथील पोल्ट्री प्रदर्शनांनाही भेटी दिल्या. 
 • सुमारे १५ लाख रुपये खर्च करून शेड उभारले. यात १०० बाय ३० फूट व १४० बाय २५ फूट आकाराची दोन शेडस आहेत. 
 • व्यवसायात अजून १४ लाख रुपयांची गुंतवणूकदेखील अपेक्षित असल्याचे ते सांगतात. 
 • व्यवसायात मिळत असलेले उत्पन्नच पुन्हा भांडवल म्हणून वापरून वृद्धी केली. 
 • एक दिवसाचे पिलू १५ रुपयांपासून ते २५, ३० व कमाल ४५ रुपयांना खरेदी करावे लागते. 
 • हंगामानुर त्यांचे दर बदलतात. 
 • चार वर्षांपूर्वी एक हजार पक्ष्यांच्या संगोपन सुरू केलेला हा व्यवसाय आज साडेसहा हजार पक्ष्यांपर्यंत विस्तारला आहे. 
 • पुणे येथील या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडून एक दिवसाची पिले संगोपनासाठी उपलब्ध होतात. 
 • कोंबड्यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची महेश यांची सवय आहे. त्यामुळे चांगले व्यवस्थापन करणे सोपे होते. त्यांना आजाराची लागण झाल्यास ते समजून येते. हा व्यवसाय यशस्वी करताना लसीकरणाच्या वेळाही काटेकोर पाळण्यात येतात. 
 • संगोपन करताना वातावरण बदलाचाही फटका बसतो. 
 • सुमारे पाच टक्क्यांपर्यंत मरतुकीचे प्रमाण. 
 • पूर्ण लक्ष घालून जिद्द व परिश्रमाच्या जोरावरच तो यशस्वी करावा लागतो असा महेश यांचा अनुभव आहे. 

अर्थकारण व विक्री व्यवस्था 

 • सुमारे ४५ दिवस संगोपन केल्यानंतर पक्षी सरासरी अडीच किलो वजनाचे म्हणजेच विक्रीयोग्य होतात. 
 • वर्षभरात सुमारे पाच ते सहा बॅचेस घेतल्या जातात. 
 • पक्ष्यांची विक्री व्यवस्था जागेवरच होत असल्याने फारशी जोखीम नसते. जो व्यापारी चांगला दर देईल त्याला पक्ष्यांची विक्री केली जाते. 
 • वर्षाची सरासरी पकडली तर प्रति किलो ७२ रुपये दर मिळतो. हा दर खाली घसरून ५२ रुपयेदेखील होतो. तर कमाल ११८ रुपयांवरही जातो. 
 • प्रति पक्ष्याच्या संगोपनासाठी प्रति बॅचमागे पशुखाद्याचा खर्च ८० रुपये असतो. अलीकडील काळात मका व अन्य खाद्याचे दर वाढले आहेत. 
 • प्रति पक्ष्यामागे सुमारे २० ते २५ रुपये नफा मिळू शकतो. अर्थात हंगाम, उत्पादन खर्च, मजुरी, दरांतील चढउतार यानुसार नफा घटतोही. 
 • वर्षाकाठी सुमारे २५ ट्रॅक्टर ट्रॉली कोंबडीखत मिळते. प्रति ट्रॉली तीन ते चार हजार रुपये दराने त्याची विक्री होते. 
 • सुमारे ७० ते ७५ टक्के खर्च पशुखाद्यावर होतो. 

युवकांना मोफत प्रशिक्षण- 
महेश यांच्या घरातील वडीलधाऱ्यांनी सरपंच, उपसरपंद अशी पदे भूषवली आहेत. महेशदेखील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. युवकांना या व्यवसायासाठी प्रेरणा मिळावी यासाठी महेश इच्छुक शेतकऱ्यांना या व्यवसायात मोफत मार्गदर्शन करतात. व्यवसाय करताना जोखीम स्वीकारण्याची मानसिक तयारी केली. गावाच्या राजकारणाकडे वेळ देण्यापेक्षा आपल्या भाकरीवर लक्ष केंद्रित करून पूर्ण वेळ दिल्यास यशाच्या पायघड्या साद घालतात अशी आत्मविश्र्वासपूर्वक प्रतिक्रिया महेश देतात. मिळालेल्या संधीचे सोने केल्यास निश्चितच यश मिळते. हडोळतीच्या या युवकाची ही झेप जिल्ह्यासाठी कौतुकास्पद व अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॅा. भूपेंद्र बोधनकर व्यक्त करतात. 

संपर्क- महेश गोजेवाड- ९६८९६६१८८९

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...