असे बनवा घरच्या घरी पशुखाद्य

उन्हाळ्यात गाई, म्हशी आणि इतर जनावरांची भूक कमी होते. सध्याच्या वातावरणामध्ये जनावरांच्या पशुखाद्याची कमतरता भासत आहे. हे लक्षात घेऊन पशुपालकांनी घरगुती पशुखाद्य तयार केल्यास दूध उत्पादनात कमी येणार नाही, जनावरे सुद्धा सुदृढ राहतील. संतुलित पशुखाद्य घरी उपलब्ध असलेल्या धान्य व त्याचे तुकडे, टरफले यापासून सहजपणे तयार करता येते.
Make animal feed at home
Make animal feed at home

उन्हाळ्यात गाई, म्हशी आणि इतर जनावरांची भूक कमी होते. सध्याच्या वातावरणामध्ये जनावरांच्या पशुखाद्याची कमतरता भासत आहे. हे लक्षात घेऊन पशुपालकांनी घरगुती पशुखाद्य तयार केल्यास दूध उत्पादनात कमी येणार नाही, जनावरे सुद्धा सुदृढ राहतील. संतुलित पशुखाद्य घरी उपलब्ध असलेल्या धान्य व त्याचे तुकडे, टरफले यापासून सहजपणे तयार करता येते. १०० किलो संतुलित पशुखाद्य बनविण्यासाठी लागणारे घटक

  • दाणे -   मका, ज्वारी, गहू आणि बाजरी यांचे प्रमाण साधारणतः ३४ किलो पर्यंत असावे.
  • पेंड (भुईमूग व मूग पेंड) -  यांचे प्रमाण साधारणतः २९ किलो आवश्यक आहे. यांपैकी कोणतीही एक पेंड दाण्यामध्ये मिसळून घ्यावी.
  • टरफले / भुसा (गहू, हरभरा, डाळी, भात) यांचे प्रमाण साधारणतः ३४ किलो आवश्यक आहे.
  • खनिज मिश्रण २ किलो आणि मीठ १ किलो घ्यावे.
  • वरील सर्व घटक पदार्थ एकत्र मिसळून व भरडा करावा. हा भरडा जनावरास संतुलित पशुखाद्य म्हणून देऊ शकतो.
  • भरडा मिश्रित संतुलित पशुखाद्याचे प्रमाण

  • गाईसाठी १.५ किलो आणि म्हशीसाठी २ किलो प्रति दिवस.
  • दुधावर असणाऱ्या गाईला १ लिटर दुधामागे ४०० ग्रॅम.
  • दुधावर असणाऱ्या म्हशींसाठी १ लिटर दुधामागे ५०० ग्रॅम अधिक संतुलित पशुखाद्य द्यावे.
  • गाभण गाय किंवा म्हैस सहा महिन्यापेक्षा जास्त - १.५ किलो प्रति दिवस संतुलित पशुखाद्य द्यावे.
  • वासरांना त्यांचे वय आणि वजन यानुसार साधारणतः १ ते २.५ किलो प्रति दिवस पशुखाद्य द्यावे.
  • पाणी गरजेनुसार आणि ऋतू नुसार ८०-१०० लिटर प्रती जनावर द्यावे.
  • हिरवा चारा- मका, विशिष्ट गवत व पाने-१५ ते २० किलो प्रति जनावर
  • वाळलेला चारा कडबा किंवा काड- ६ ते ८ किलो प्रती जनावर.
  • वाळलेला चारा व हिरवा चारा कुट्टी करून द्यावा.
  • शेळ्या- मेंढ्यांसाठी संतुलित आहार

  • भुईमुगाची ढेप २५ किलो
  • गव्हाचा कोंडा ३३ किलो
  • मका, बाजरी, ज्वारी भरडलेली ४० किलो
  • खनिज पदार्थांचे मिश्रण १ किलो
  • मीठ १ किलो
  • वरील सर्व पदार्थ बारीक भरडून एकत्र करून शेळ्यांना संतुलित खाद्य म्हणून देता येतात.
  • दररोज प्रती शेळी अर्धा किलो संतुलित खाद्य द्यावे.
  • संपर्क-  डॉ गोपाल मंजुळकर,९८२२२३१९२३ (विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान),कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com