दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला ग्राहकांचा विश्‍वास

सांगली येथील माळी कुटुंबीयांनीदूध प्रक्रिया पदार्थांची निर्मिती सुरू केली आहे. गुणवत्तापूर्ण निर्मितीतून उलाढाल वाढवण्याबरोबर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
दूध प्रक्रिया पदार्थ तयार करताना सुनिता माळी
दूध प्रक्रिया पदार्थ तयार करताना सुनिता माळी

सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून अविरतपणे दुग्ध व्यवसायात आहे. गोठा व्यवस्थापनाद्वारे दूध उत्पादन, संकलन यापुढे जाऊन त्यांनी बाजारपेठ ओळखून प्रक्रिया पदार्थांची निर्मिती सुरू केली आहे. गुणवत्तापूर्ण निर्मितीतून उलाढाल वाढवण्याबरोबर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.   सांगली शहरातील कलानगर येथे सुभाष माळी यांचे कुटुंब राहते. त्यांचे नाव आज खात्रीशीर दुधासाठी प्रसिद्ध आहे. कुटुंबातील बाळासाहेब माळी ‘नेव्ही’मध्ये कार्यरत होते. त्यांचे निधन झाले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांना उद्योजकतेची दृष्टी दिली. उत्पादन निर्मिती करून स्वतः विक्री करण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे असे ते नेहमी सांगायचे. आज कुटुंबाने त्यांचाच आदर्श घेतला आहे. दुग्धव्यवसायाची वाटचाल माळी कुटुंबाने १९६५ च्या सुमारास चार एकर शेती विकत घेतली. त्यांचे संयुक्त मोठे कुटुंब आहे. घरातील मुलांना भरपूर दूध मिळावे यासाठी गायी- म्हशी दावणीला होत्या. साधारण १९९८ मध्येच दुग्ध व्यवसायाचा पाया रोवला गेला. गेल्या अठरा ते वीस वर्षापासून व्यवसाय अविरतपणे सुरू आहे. केवळ दूध विक्री करण्यापेक्षा बदलती बाजारपेठ व ग्राहकांची मागणी ओळखून प्रक्रियायुक्त उत्पादन निर्मितीत त्यांनी प्रवेश केला. श्रीकांत यांनी पत्नी सुनिता , बंधू शशिकांत असे घरातील मुख्य सदस्य व्यवसायात सक्रिय आहेत. उत्पादनाची जबाबदारी सुनिता सांभाळतात. त्या सांगतात की शेती, गोठा आणि च्या आनुषंगिक बाबींविषयी फारशी माहिती नव्हती. मात्र घरातील सर्वांनी विश्वास ठेवला. त्यामुळे जिद्दीने त्यात उभारणे शक्य झाले. अनुभवातून शिक्षण सुनिता म्हणाल्या की निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नव्हते. पण शिक्षण व अभ्यासाला वयाची अट लागत नाही. जिद्द हीच गोष्ट महत्त्वाची असते. घरीच मग शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला एक ते दोन किलो श्रीखंड तयार करायचे. त्याची चव पाहायची. परिवारातील मित्रमंडळींना ते चवीसाठी द्यायचे, त्यातून येणारे बदल स्वीकारायचे असा नित्यनियमाने चालायचे. दर्जा टिकवण्यासाठी ग्राहकांकडून सल्ले देखील घेतले. यात प्रशिक्षित होण्यास सहा महिन्याचा कालावधी गेला. त्यातून मग हातोटी येऊ लागली. आम्हांला जे शिकता आलं नाही ते आमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न आहे. घरातील नव्या पिढीतील आकाशला डेअरी टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेण्याची आवड आहे. त्याला आम्ही सहमती दिली आहे. याच्या शिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असं सुनिता सांगतात. विक्री व्यवस्था माळी यांची शहरात सुमारे तीन ठिकाणी विक्री केंद्रे आहेत. शहरात दररोजचे ४०० लीटर दूध रतिबाला जाते. कलानगरमध्ये गोठा व दूध विक्री केंद्रातून प्रक्रियायुक्त पदार्थांचीही विक्री होते. तेथून दररोज ३० ते ४० लीटर दुधाची विक्री होते. कलानगर, विश्रामबाग, सांगली गावभाग, धामणी, संजयनगर या परिसरापर्यंत ग्राहकांचे जाळे पसरले आहे. उत्पादने तयार करताना एखादी चूक झाल्यास ती पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जाते. विक्री कशा पद्धतीने वाढवता येईल याचा विचारविनिमय सर्वजण मिळून करतात. गुणवत्तेबरोबरच ताजी बनवलेली उत्पादने उपलब्ध होत असल्याने ग्राहकांकडून मागणी असल्याचे सुनिता सांगतात. लॉकडाऊनच्या काळातील विक्री कोरोना संकटात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात शहर बंद होते. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. अनेक भागात भाजी विक्री देखील बंद होती. आमच्या उत्पादनांना मागणी कमी होईल अशी भिती निर्माण झाली होती. परंतु या दरम्यान परिसरातील ग्राहकांकडून श्रीखंड, आम्रखंडसह पनीर आदींची मागणी वाढली. या काळात पनीरचा रोजचा खप २० ते २५ किलो व्हायचा. आमच्यासाठी ही संधी ठरली. या काळात नवीन ग्राहक आम्ही जोडले असे सुनिता सांगतात. वर्षभर मागणी एस. बी. माळी नावाचा ब्रँड तयार केला आहे. बेकरी, लग्न समारंभ, केटरिंग आदींच्या माध्यमातून उत्पादनांना वर्षभर मागणी असते. दररोज सुमारे २०० ते ३०० लीटर दुधावर प्रक्रिया केली जाते. हंगामात हाच आकडा ५०० लीटरवर जातो. श्रीखंड व आम्रखंड किलोला २०० रुपये, बासुंदी २४० रु, तूप ५५०, खवा ३०० रु. चक्का २०० व पनीर ३२० रुपये असे दर आहेत. दिवसाला ६० ते ६५ किलोची एकूण विक्री होते. बाजारपेठेतील मागणी ओळखून बटरस्कॉच, ड्रायफ्रूट श्रीखंड, गुलकंद बासुंदी असे पदार्थ थोड्या प्रमाणात ठेवण्यास सुरू केले आहेत. संपर्क- सुनिता माळी- ९५७९३५९२००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com