Agriculture story in marathi, management of poultry birds diseases | Agrowon

वेळीच ओळखा कोंबड्यांतील विविध रोगांचा प्रादुर्भाव 

अजय गवळी 
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता, इ. मुळे रोगजंतूंचा प्रवेश झाल्यावर लगेच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. कोंबड्यांमध्ये होणाऱ्या काही प्रमुख रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय माहित असणे आवश्यक असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून होणारे नुकसान टाळता येते. 

कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता, इ. मुळे रोगजंतूंचा प्रवेश झाल्यावर लगेच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. कोंबड्यांमध्ये होणाऱ्या काही प्रमुख रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय माहित असणे आवश्यक असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून होणारे नुकसान टाळता येते. 

रोगजंतू आणि रोगजंतूंना अनुकूल परिस्थिती या दोन गोष्टी कुठलाही रोग होण्यास कारणीभूत ठरतात. रोगजंतूंनी शरीरात प्रवेश केला तरी अनुकूल परिस्थिती नसल्यास रोग होऊ शकत नाही किंवा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. कोंबड्यांमध्ये साधारणपणे पुढील रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

रानीखेत 
हा रोग विषाणूंपासून होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास १०० टक्के मरतूक होऊ शकते. लहान कोंबड्यांमध्ये घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे, वेड्यावाकड्या हालचाली इत्यादी लक्षणे दिसतात. तर मोठ्या कोंबड्यांमध्ये अवघड श्वासोच्छवास, मंद भूक, ताप येणे, पांढरी पातळ हगवण, मान वाकडी होणे, मज्जासंस्थेवर परिणाम, अंडी-उत्पदनात घट, पातळ कवचाची व निकृष्ट दर्जाची अंडी, इत्यादी लक्षणे दिसतात. रोग झाल्यावर या रोगावर उपचार नाहीत. परंतु रोग होऊ नये यासाठी पिल्ले ५ ते ७ दिवसांची असताना 'लासोटा' ही लस नाकात किंवा डोळ्यांत एक थेंब या प्रमाणात द्यावी. तसेच आठव्या आठवड्यात व १८ व्या आठवड्यात 'आर २ बो ही लस (०.५ मिली.) कातडीखाली द्यावी. 

रक्ती हगवण (कॉक्सीडिओसिस) 
हा रोग 'कॉक्सीडिया या रक्तातील परजीवींपासून होतो. विष्टेमध्ये रक्त दिसते. विष्ठा लालसर पातळ असते. कोंबड्यांच्या गुदद्वाराजवळ रक्तमिश्रित विष्टा आढळते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्यांचा तुरा कोमेजतो, कोंबड्या पेंगतात, खाणे कमी होते. अंडी-उत्पादनही कमी होते. अशक्तपणा आढळतो. तसेच कोंबड्यांची मरही मोठ्या प्रमाणात आढळते. हा रोग पूर्णपणे नियंत्रित करता येतो. 

देवी 
हा रोग विषाणूंपासून होतो. या रोगाची लागण झाल्यास कोंबड्यांचा तुरा व डोळे मलूल होतात. पायावर पिसे नसलेल्या भागावर पिवळे फोड दिसतात. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी फोडांवर खपली धरते व ती पडते. या खपलीतून विषाणूंचा प्रसार होतो. या रोगाची लागण झाल्यावर भूक मंदावते. नाकातून द्रव पदार्थ वाहतो. तोंडात चिकट पदार्थ तयार होतो. त्यामुळे कोंबड्यांचा खाद्य खाता येत नाही व कोंबड्या भुकेने मरतात. या रोगाची लागण होऊ नये म्हणून सहाव्या व सोळाव्या आठवड्यात देवी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी. रोग झाल्यास फोड आलेली जागा पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवून घ्यावी व त्यावर कोणतेही प्रतिजैविक मलम लावावे. 

मरेक्स 
हा रोग विषाणूंमुळे होतो. कोंबड्यांचे पाय लुळे पडतात. खाद्य खाऊ न शकल्याने कोंबड्या मारतात. हा रोग बहुतांशी लहान पिलांना होतो व त्यामुळे ६ ते १० आठवडे वयोगटातील पिल्ले मारतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग पाचव्या ते सहाव्या महिन्यात आढळून येतो. या रोगामुळे कोंबड्यांचे पाय, पंख, मान लुळी पडते, वजन, श्वसनास त्रास होतो, विष्ठा पातळ पडते व पिसांच्या मुळाशी सूज दिसून येते. या रोगावर उपाय नाही. परंतु प्रतिबंधक उपाय म्हणून पिल्ले एक दिवसाची असताना मरेक्स हि लस द्यावी. 

गंबोरो 
हा रोग विषाणूमुळे होतो. कोंबड्या पेंगतात, अडखळत चालतात, पातळ पांढरी हगवण होते व गुदद्वाराजवळची पिसे विष्ठेमुळे घाण होतात. 

जंत 
जंतामुळे कोंबड्यांची वाढ खुंटते, अंडी उत्पादन कमी होते, पातळ तसेच बिनकवचाची अंडी मिळतात, जंत झालेल्या कोंबड्यांची खाद्याचे मांसात किंवा अंड्यात रूपांतर करण्याची क्षमता कमी होते. त्यांचे वजन घटते व हगवण लागते. यासाठी कोंबड्यांना जंताचे औषध प्रत्येक महिन्यात द्यावे. औषध सतत २ ते ३ दिवस द्यावे. औषध दिल्यानंतर जे जंत पडतील ते उचलून लांब टाकावेत औषध देण्याआगोदर २ दिवस वऔषध दिल्यानंतर २ दिवस पाण्यातून जीवनसत्त्वे द्यावेत म्हणजे कोंबड्यांवर ताण ना येऊन त्यांच्या उत्पादनावर वाईट परिणाम होणार नाही.  

जीवनसत्त्व 'अ' चा अभाव 
कोंबड्यांमध्ये जीवनसत्त्व 'अ'चा अभाव असल्यास त्यांच्या डोळ्यांतून व नाकातून पाणी येते. डोळे सुजतात डोळ्यांचा दाह होतो, डोळ्यांत पांढरा पदार्थ साचतो, वाढ खुंटते. याकरिता बी-कॉम्प्लेक्स १०० कोंबड्यांना १५ ते ३० मि.ली. पिण्याच्या पाण्यातून ४ ते ५ दिवस द्यावे. 

कॅर्लीटोपॅरालिसिस 
जीवनसत्त्व 'ब' किंवा रायबोफ्लेवीन कमी पडल्यास कोंबड्यांच्या पायाची बोटे वाकडी होतात व ते गडघ्यावर चालू लागतात. कोंबड्यांमध्ये लांगडेपणा दिसतो. परंतु कोंबड्यांचे खाणे-पिणे व्यवस्थित असते. याकरिता बी-कॉम्प्लेक्स कोंबड्यांना १५ ते ३० मि.लि. पिण्याच्या पाण्यातून ४ ते ५ दिवस द्यावे. 

खाद्यात चुन्याचे प्रमाण कमी असणे 
हा प्रकार अंड्यांवरील कोंबड्यांमध्ये दिसून येतो. खाद्यात चुन्याचे प्रमाण कमी असल्यास अंड्याचे कवच पातळ होते. अशा कोंबड्यांना खाद्यातून शिंपलापूड द्यावी किंवा मीठविरहित खनिज मिश्रण द्यावे. 

गोचीड, उवा वगैरेंपासून उपद्रव 
हे कीटक कोंबड्यांच्या शेडमध्ये राहून रात्रीच्या वेळी कोंबड्यांचे रक्त शोषण करतात. त्यांच्या चाव्यांमुळे कोंबड्या बेचैन होतात. रक्त कमी होऊन कोंबड्यांना ऍनिमिया होतो. अंडी-उत्पादन, घटते, वाढ खुंटते, तसेच ह्या कीटकांद्वारे रोगप्रसारही होतो. यावर वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करणे महत्वाचे असते. 
टीप ः पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कोंबड्यांवर उपचार करावेत. 
 
संपर्क ः अजय गवळी ः ७४४७७८२६६६ 
(लेखक पशुतज्ज्ञ आहेत.)  


इतर कृषिपूरक
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...
किफायतशीर दूध उत्पादनासाठी गाईची निवड गाईची निवड करताना शरीररचना, रंग याचबरोबर...
फायदेशीर देशी मागूर माशांचे संवर्धन कराथाई मागूर हा मासा मांसभक्षक आहे. थाई मागूरची वाढ...
देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफाव्यावसायिक पद्धतीनेच शेती नियोजन करायचे, हा...