agriculture story in marathi, management of spices crops | Page 2 ||| Agrowon

मसाला पिकांना द्या पुरेसे पाणी

डॉ. वैभव शिंदे, डॉ. सुनील घवाळे
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे लक्षात घेऊन गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. नवीन रोपे, कलमांना सावली करावी. आधार द्यावा. झाडाच्या बुंध्याजवळ आच्छादन करावे.

दालचिनी

मसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे लक्षात घेऊन गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. नवीन रोपे, कलमांना सावली करावी. आधार द्यावा. झाडाच्या बुंध्याजवळ आच्छादन करावे.

दालचिनी

 • कोकण तेज व तेजपत्ता या जातींचे चांगले उत्पादन मिळते.
 • काढणी हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल असा असतो. साल काढण्यासाठी झाडे तोडल्यानंतर त्याला बुंध्यातून असंख्य फुटवे येतात. सर्वच फुटवे वाढू दिले तर गर्दी होते. त्यांची नीट वाढ होत नाही. हे टाळण्यासाठी मे -जून महिन्यामध्ये त्यांची विरळणी करावी. जोमदार चांगले वाढणारे ५ ते ७ फुटवे ठेवून बाकीचे सर्व फुटवे काढावेत. त्यामुळे अधिक व लवकर उत्पादन मिळते.

जायफळ

 • कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती आणि कोकण संयुक्ता या जातींचे चांगले उत्पादन मिळते.
 • नवीन रोपे, कलमांना सावली करावी. आधार द्यावा.
 • कलमे, रोपे पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. त्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होणे आवश्यक असते. ठिबक सिंचनाद्वारे प्रति झाड ३० लिटर प्रति दिन पाणी द्यावे.
 • बुंध्याजवळ आच्छादन करावे.

काळीमिरी

 • पाण्याच्या ताणापासून मिरीवेल जपावेत. नियमित पाणी द्यावे. फळांचे घोस उंदीर, खार, सरडे खाणार नाहीत. गळ होणार नाही यांची काळजी घ्यावी.
 • नवीन लागवडीला सावली करावी.
 • प्रति वेलाला १० लिटर प्रति दिन इतके ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
 • बुशपेपर मिरीची जोपासना करताना बुंध्यामध्ये तण येणार नाही याची काळजी घ्यावी.

लवंग

 • झाडास कडक उन्हाचा त्रास होतो. रोपे लहान असताना त्यावर सरळ ऊन पडले तर पाने करपतात. खोड काळे पडून खराब होते. म्हणून रोपांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी.
 • झाडांना पाण्याचा ताण पडणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पाण्याचा ताण पडल्यास पाने मोठया प्रमाणावर गळतात, फांद्या सुकतात.
 • प्रति दिन २० ते २५ लिटर ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.

ऑलस्पाईस

 • रोपांना आधार द्यावा. नियमित पाणी द्यावे.
 • बुंध्यात आच्छादन करावे.

डॉ. वैभव शिंदे, ९५१८९४३३६३
( प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)


इतर मसाला पिके
हळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...
हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...
हळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
साठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...
मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
सुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
हळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
हळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
मसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...
हळद पिकातील रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीची भरणी आवश्यक...सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ...
पानवेल लागवडीसाठी जोमदार बेणे निवडापानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी, रेती...