केसर आंबा सल्ला

आंब्यावरील भुरी
आंब्यावरील भुरी
  • सध्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानातील घसरण लक्षात घेता काही ठिकाणच्या आंबा कलमातून मोहर बाहेर येण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे.
  • बहुतांशी ठिकाणी आंबा बागा चांगल्या मोहरल्या आहेत. सध्याच्या काळात बागेतील वाळलेल्या रोगट काड्या, गवत गोळाकरून बागेची स्वच्छता ठेवावी.
  • बागायती क्षेत्रातील कलमांची सुप्तावस्था संपून मोहर पडण्यास सुरवात झाली आहे. या मोहरावर तुडतुड्यांच्या प्रादुभार्वाची लक्षणे दिसू लागली आहेत.
  • सद्यःस्थितीत बहुतांशी आंबा बागा सुप्तावस्थेत असल्यामुळे ताणाच्या स्थितीत आहे. या स्थितीत कलमांना पाणी दिल्यास ताण तुटून कलमे नवतीवर जाण्याची दाट शक्‍यता असते. भारी व हलक्‍या जमिनीत लागवड केलेल्या कलमांना मोहर बाहेर पडण्यासाठी पाणी देऊ नये अन्यथा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • मोहर पूर्णपणे बाहेर पडून फळे बाजरीच्या आकाराची झाल्यानंतर पाणी देण्यास सुरवात करावी. त्यानंतर मात्र गरजेप्रमाणे नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचनाने पाणी द्यावयाचे असल्यास प्रती दिन प्रती झाड ७० ते ८० लिटर पाणी दिल्याने फळांचा आकार मोठा होऊन प्रत, दर्जा सुधारण्यास मदत होते.
  • घन लागवड (५ मिटर बाय ५ मिटर) करण्यात आलेल्या बागेत प्रथम पीक ४ ते ५ वर्षांनंतर आणि पारंपरिक (१० मिटर बाय १० मिटर) पद्धतीने लागवड केलेल्या बागेतून ७ ते ८ वर्षांनंतर फळ उत्पादन घेणे कलमाच्या कायीक वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
  • कलम लागवडीनंतर लवकर फळे घेण्याचा अट्टाहास करू नये. कमी वयाच्या कलमांना आलेला मोहर वाढीच्यादृष्टीने काढून टाकणे फायदेशीर ठरते.
  • काही बागांमध्ये पुरेसा मोहर आलेला असल्यास कडाक्‍याच्या थंडीमुळे येणारा पुर्नमोहर टाळण्यासाठी जिबरेलिक आम्ल ५० मिलि ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही ॲग्रेस्कोमधील शिफारस आहे.
  • ९) वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या फळांची गळ होऊ नये म्हणून फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रती लिटर पाणी) फवारणी करावी.
  • कीड, रोग नियंत्रण  तापमानवाढीच्या काळात तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणे ओळखून कीडनाशकांची फवारणी करावी. तुडतुडे नियंत्रण ः प्रतिलिटर पाणी

  • ॲसिटामिप्रिड (२० टक्के) ः ०.४ ग्रॅम किंवा
  • ट्रायडिमेफॉन (२५ डब्ल्यू पी) ः १ ग्रॅम किंवा
  • थायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूसी) ः ०.७ ग्रॅम
  • भुरी नियंत्रण ः प्रतिलिटर पाणी

  • कार्बेन्डाझीम ः १ ग्रॅम किंवा
  • हेक्‍झाकोनॅझोल (५ ईसी) ः ०.५ मिलि किंवा
  • कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड (५० डब्ल्यूसी) ः २.५ ग्रॅम
  • खोडकिडीचे नियंत्रण 

  • खोडकिडीने खोडाला पाडलेल्या छिद्रामध्ये तार घालून भुसा बाहेर काढावा. या छिद्रात इंजेक्‍शनच्या साह्याने क्विनॉलफॉस २ मिलि प्रती लिटर पाण्यात मिसळून सोडावे. त्यानंतर छिद्र चिखलमातीने बंद करावे.
  • टीप ः काही बागांतील मोहर फुलण्याच्या अवस्थेत असल्यास, गरज नसताना कीटकनाशकांची फवारणी करू नये. यामुळे परागीभवन वाढविणाऱ्या कीटकांची संख्या वाढण्यास मदत होते.
  • संपर्क ः डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४ (केसर आंबा गुणवत्ता केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com