agriculture story in marathi, Manohar Dahake of Akola Dist. has done integrated farming successfully in alkaline soil. | Agrowon

खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील एकात्मिक शेती

गोपाल हागे
शनिवार, 11 सप्टेंबर 2021

सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर शेषराव डाहाके यांनी कोरडवाहू परिस्थितीत खारपाणपट्ट्यात बहुविध पिकांची शेती यशस्वी केली आहे. त्याशिवाय शेततळे, त्यात मत्स्यपालन, शेळीपालन, कोंबडीपालन, गांडूळखत निर्मिती आदींच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धती उभी केली आहे.

सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर शेषराव डाहाके यांनी कोरडवाहू परिस्थितीत खारपाणपट्ट्यात बहुविध पिकांची शेती यशस्वी केली आहे. त्याशिवाय शेततळे, त्यात मत्स्यपालन, शेळीपालन, कोंबडीपालन, गांडूळखत निर्मिती आदींच्या माध्यमातून एकात्मिक शेती पद्धती उभी केली आहे.

अकोला जिल्ह्यात सावंगी मोहाडी हे सुमारे हजार लोकवस्तीचे गाव आहे. जिल्हा मुख्यालयापासून जवळ असल्याचा फायदा गावाला होतो. गावातील शेती कोरडवाहू आहे. काही शेतकऱ्यांनी हंगामी सिंचनासाठी बोअरवेल्स घेतल्या. भागात खारपाण पट्ट्याचे क्षेत्र अधिक आहे. साहजिकच पूर्णा नदीच्या खोऱ्यात पसरलेला हा पट्टा असला सिंचनासाठी पोषक समजला जात नाही. गोड पाण्याचे स्रोत नसले तरीही येथील शेतकरी जिद्दीने विविध प्रयोग करीत असतात. गावातील मनोहर डाहाके त्यापैकीच एक आहेत. त्यांनीही बोअरवेल, नदीच्या पाण्याची मदत घेतली.

बहुविध पिकांची शेती
डाहाके यांची २३ एकर शेती आहे. मक्त्यानेही ते शेती घेतात. त्यांचे सरासरी पीकक्षेत्र व
उत्पादन असे.

पीक        क्षेत्र (एकर)      उत्पादन ( क्विंटल प्रति एकर)

सोयाबीन    १२                  ८ ते १२

कपाशी    ८                  १२ ते १५, काही वेळेस २० क्विं.

हळद     १                       १५० ते १८० (ओली)

गहू        १०                     १५ ते २२

हरभरा    १५                  १० ते १२

पूरक व्यवसाय

शेततळ्यात मत्स्यपालन
नदीवरून सुमारे ८०० मिटर पाइपलाइन करून पाणी आणले आहे. शाश्‍वत सिंचनासाठी २००५ मध्ये १०० बाय १०० फूट आकाराचे शेततळेही खोदले आहे. त्यावर हळद, कांदा बीजोत्पादन व अन्य पिके घेतली जाते. अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणून रोहू, कटला, मृगल आदी माशांचे उत्पादन त्यात घेण्यात येते. तीन वर्षांत त्यातील उत्पन्न सातत्याने वाढत चालले आहे. माशांची दरांवर विक्री न करता एखादी बाग व्यापाऱ्यांना द्यावी तसे संपूर्ण उत्पादन ठरावीक किमतीला दिले जाते. सन २०१८ मध्ये ६० ते ७० हजार, २०१९ मध्ये ७० ते ८० हजार रुपये मिळाले. कोरोना संकटात माशांना मागणी वाढली. त्या काळात तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाल्याचे डाहाके सांगतात. व्यापाऱ्याने दरवर्षीच्या तुलनेत तिप्पट पैसे मोजून भाव केला.

शेळीपालन
केवळ पिकांवर अवलंबून न राहाता शेतीतील नफा वाढवण्यासाठी विविध पूरक व्यवसाय सुरू केले आहेत. त्यात मागील वर्षापासून शेळीपालन सुरु केले. उस्मानाबादी, बेरारी जातींचे संगोपन केले जाते. सद्यस्थितीत दीडशे शेळ्या आहेत. १०० बाय ३० फूट आकाराचे शेड आहे. त्यात गव्हाण, बसण्याची व्यवस्था केली आहे. वजनाप्रमाणे विक्री होते. व्यापारी थेट शेतातून खरेदी करतात. स्थानिक असलेल्या बेरारी जातीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत शेळीपालकांची संघटना तयार केल्याचे डाहाके म्हणाले. बंदीस्त शेळी पालन करताना संकरित नेपिअर, लसूण घास आदी चारापिकांची लागवड केली आहे. त्यातून खाद्यावरील खर्च कमी केला आहे.

गावरान कोंबडी फायद्याची
शेळीपालनाला परसातील कुकुटपालनाची जोड दिली आहे. गावरान,गिनीफाउल, असील जातीच्या कोंबड्यांचे पालन होते. सध्या एकूण ३०० कोंबड्या आहेत. अंडी व पिल्ले या कोंबड्यांच्या अंड्यांना सातत्याने मागणी राहते. शिवाय व्यापारी, ग्राहकांना कोंबड्याही विकतात. यातून नियमितपणे पैसा मिळतो. प्रति १५ रुपये नग दराने अंड्यांची विक्री जागेवरून होते. दररोज १०० अंडी मिळतात. एकदिवसीय पिल्लांची विक्री ३० ते ४५ रुपये प्रति पक्षी दराने होते.

जमीन सुपीकतेसाठी प्रयत्न
आज प्रत्येक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. अशा स्थितीत डाहाके यांनी जमीन सुपीकतेला प्राधान्य दिले. जमीन क्षारपड असल्याने लवकर कडक बनते. यासाठी वर्षाआड एकरी २ बॅग्ज जिप्सम व शेणखताचा वापर होतो घरचे लेंडीखत, कोंबड्यांची विष्ठा, विविध पिकांचे अवशेष यापासून दर दोन महिन्याला प्रति बेड १०० किलो गांडूळ खत निर्मिती होते. यातून रासायनिक खतांचा वापर अत्यंत कमी केला आहे. सात- आठ वर्षांपासून सेलम जातीच्या हळद पिकात सातत्य ठेवले आहे. क्षारपड जमिनीतही हळदीचे पीक त्यांनी चांगले यशस्वी केले आहे.

प्रयोगशीलता जपली
क्षारपड जमिनीत बैलजोडीचा वापर करणे कठीण जात असल्याने पर्याय म्हणून शेतीतील कामे यांत्रिक पद्धतीने कली जातात. त्यादृष्टीने ट्रॅक्टर मळणीयंत्र, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर घेतला आहे. सातत्याने माती परिक्षण करण्यावरही भर दिला जातो. हंगामी सिंचनातून उत्पादकता वाढीचे लक्ष ठेवण्यात येते. डाहाके यांच्या पुढाकारातून ‘नवोदय’ या ग्रामीण विकास संस्थेची स्थापना झाली आहे. त्यातून मत्स्यपालन व शेळीपालन प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. डाहाके यांचा मुलगा मनोहर निखिल एमटेक एमबीए झाला असून पुणे येथील कंपनीत उच्च पदावर नोकरी करतो. मुलगा अभय अभियंता आहे. त्याने काही दिवस नोकरी केली. मात्र आता तो पूर्णवेळ शेतीत मदत करू लागला आहे.

संपर्क- मनोहर डाहाके- ९०४९७३३०७९


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
थंडीत वाढ शक्यमहाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १०१२...
मसाला उद्योगासोबत सेंद्रिय शेतीकडे...लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय...
‘रिलायन्स’ पीकविमा भरपाई देण्यास तयारपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी दहा...
नाशिकमध्ये भरला साहित्यप्रेमींचा मेळा नाशिक : येथील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४व्या...
देशात ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादनकोल्हापूर : देशातील साखर हंगाम वेगाने सुरू झाला...
बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची...
कृषी शिक्षणाचा टक्का घसरलापुणे ः राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाचा गाडा...
राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची...पुणे : राज्यात बुधवारपासून (ता. १) पावसाने हजेरी...
राज्यातील द्राक्ष बागांना १० हजार...सांगली ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व...
पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाला...पुणे ः पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि...