पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी वनस्पती

जखमजुडी
जखमजुडी

जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान होते. महागडी औषधे, एका औषधीचे दुष्परिणाम रोखण्याकरिता वापरावी लागणारी दुसरी औषधी, यामुळे व्यवसायाचे आर्थिक नियोजन बिघडते. या सर्व बाबींचा विचार करता पशू आजारांमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पतींचा वापर फायद्याचा ठरतो.   जनावरांच्या विविध आजारांवर औषधी वनस्पतींचा वापर करून आजार प्राथमिक स्वरुपात बरे करता येतात. सध्या औषधी वनस्पतींची मुबलकता कमी होत आहे. अशा परिस्थितीत या औषधी वनस्पतींचे संवर्धन होणे आवश्यक आहे. विविध आजारांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या अनेक औषधी वनस्पती या आपल्या परिचयाच्याच असतात. फक्त त्यांची ओळख नसते. अशा वेळी जाणकारांकडून त्यांची ओळख करून घ्यावी व अशा वारंवार लागणाऱ्या वनस्पती आपल्या शेतात, बांधावर लावाव्यात. त्यामुळे आवश्यकतेनुसार त्यांचा उपयोग करता येतो. १) ज्येष्ठमध

  • औषधी उपयोग ः कफ पातळ करणारे, पाचक आणि पुष्ठी वर्धक श्वसनसंस्थेच्या दाहात वापरतात.
  • कोणत्या जनावरांसाठी वापरावी ः मोठी (गाय, बैल, म्हैस) व लहान जनावरे (शेळी आणि मेंढी)
  • कोणत्या प्रकारे वापरावी ः झाडाच्या खोडाची पावडर
  • प्रकार/ पद्धत/ मात्रा : जनावराच्या वयानुसार मोठ्या जनावरांना १०-१२ ग्रॅम या प्रमाणात द्यावी व लहान जनावरांना ८-१० ग्रॅम प्रमाणात द्यावी.
  • २) बडीशेप

  • बडीशेपच्या तेलाचा वापर औषधी म्हणून करतात.
  • औषधी उपयोग ः परोपजिविनाशक, कफनाशक, वमनकारी, वायुसारक म्हणून
  • पक्षामध्ये व कुत्र्यांमध्ये उवा, पिसवा यांचा नाश करण्यासाठी बडीशेपचे तेल वापरले जाते.
  • वायुसारक असल्याने अपचन असेच कफ पातळ करण्यासाठी व चाटण औषधीमध्ये बडीशेपचे तेल वापरतात.
  • कोणत्या प्रकारे वापरावी ः पावडर, तेल आणि द्रावण
  • ३) ओवा

  • औषधी उपयोग ः बारीक गोल दाणे असलेली, करड्या रंगाची तिखट पाचक वायुसारक पोटदुखी व अपचन झाल्यास उपयोगी. कफनाशक
  • कोणत्या प्रकारे वापरावी ः पाण्यामध्ये भिजवून
  • प्रकार/ पद्धत/ मात्रा ः मोठी जनावरे - ८ ते १२ ग्रॅम, लहान जनावरे - १ ते १५ ग्रॅम
  • ४) कात

  • औषधी उपयोग ः काताचा उपयोग रक्तस्रावरोधक, लाळस्तंभक, अन्ननलिकेचा दाह, हिरड्याची सूज कमी करण्यासाठी, अल्सर, अतिसार यामध्ये संरक्षक व शामक म्हणून उपयोगी
  • कोणत्या प्रकारे वापरावी ः पुड, द्रावण आणि खड्याच्या स्वरुपात
  • प्रकार/ पद्धत/ मात्रा ः मोठी जनावरे - २० ते ३० ग्रॅम
  • ५) मोहरी

  • औषधी उपयोग ः सांधे दुखीवर लेप म्हणून उपयोग. श्वसनसंस्थेच्या दाहात पचनसंस्था सुधारणारी, कफ पातळ करण्यास उपयुक्त जठर वर्धक उत्तेजक, वायुसारक आणि प्रती दाहकारी
  • कोणत्या जनावरांसाठी वापरावी ः मोठी जनावरे व लहान जनावरे (शेळी आणि मेंढी)
  • कोणत्या प्रकारे वापरावी ः पावडर स्वरुपात
  • प्रकार/ पद्धत/ मात्रा ः मोठी जनावरे १० ग्रॅम, लहान जनावरे ः ५ ते ८ ग्रॅम
  • ६) हिंग

  • हिंग हा फेरुला फोइटिडा या वनस्पतीच्या मुळाचा रस सुकवून त्यापासून बनविलेला एक पदार्थ आहे.
  • पूड व अर्क या स्वरुपात करतात. याला पिवळसर तपकिरी रंग असून तिव्र वास व चव असते.
  • औषधी उपयोग ः जंतूनाशक आणि दुर्गंधीनाशक म्हणून करतात. तसेच वायुसारक, कृमिनाशक, उत्तेजक, कफ पातळ करणारा, पोटफुगी व अपचन झाल्यास, पोटदुखी व श्वसनसंस्थेच्या दाहामध्ये
  • कोणत्या जनावरांसाठी वापरावी ः मोठी जनावरे (गाय, बैल, म्हैस) व लहान जनावरे (शेळी आणि मेंढी)
  • - कोणत्या प्रकारे वापरावी ः पावडर व द्रावण स्वरुपात
  • प्रकार / पद्धत / मात्रा ः मोठी जनावरे ः १५ ते २० ग्रॅम पावडर , लहान जनावरे ः १० ते १५ ग्रॅम पावडर
  • ७) एकदांडी, कंबरमोडी, जखमजुडी

  • औषधी उपयोग ः मोठ्या जनावरातील किंवा शेळ्या मेंढ्यातील पोटफुगी दूर करण्यासाठी
  • कोणत्या जनावरांसाठी वापरावी ः गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या
  • कोणत्या प्रकारे वापरावी ः पानांचा रस
  • प्रकार / पद्धत / मात्रा ः मोठी जनावरे ः १०० मि. ली.
  • लहान जनावरे ः ३० मि.ली.
  • संपर्क ः प्रणिता सहाणे, ८६००३०१३२९ (कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर, जि. नगर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com