Agriculture story in marathi, medicinal use of black paper and cardamom | Page 2 ||| Agrowon

अाैषधी म्हणूनही उपयुक्त मिरे, वेलची

कीर्ती देशमुख
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

स्वयंपाकात गरम मसाल्याचा वापर होत असतो. फक्त स्वयंपाकाला चव, वास येण्यासाठीच मसाले उपयुक्त नसतात, तर मसाले औषधीही असतात. काळी मिरी अाणि वेलचीचेही असेच औषधी उपयोग आहेत.

1. मिरे
काळ्या मिरीतील पिपरीन नावाच्या घटकामुळे मिरची चव वेगळीच लागते. लाल मिरचीच्या तुलनेत काळी मिरी कमी दाहक आणि अधिक गुणकारी आहे. म्हणूनच मसाल्यामध्ये लाल मिरचीऐवजी काळ्या मिरीचा उपयोग केला जातो.

स्वयंपाकात गरम मसाल्याचा वापर होत असतो. फक्त स्वयंपाकाला चव, वास येण्यासाठीच मसाले उपयुक्त नसतात, तर मसाले औषधीही असतात. काळी मिरी अाणि वेलचीचेही असेच औषधी उपयोग आहेत.

1. मिरे
काळ्या मिरीतील पिपरीन नावाच्या घटकामुळे मिरची चव वेगळीच लागते. लाल मिरचीच्या तुलनेत काळी मिरी कमी दाहक आणि अधिक गुणकारी आहे. म्हणूनच मसाल्यामध्ये लाल मिरचीऐवजी काळ्या मिरीचा उपयोग केला जातो.

मिरीमुळे जेवणाचा स्वाद वाढतो. काळ्या मिरीत लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मँगनीज, झिंक, क्रोमियम, ‘ए’ जीवनसत्त्व आणि ‘सी’ जीवनसत्त्व याबरोबरच इतरही अनेक पोषक द्रव्ये असतात. कर्करोग, सर्दी-खोकला या अजारांमध्ये अाणि वजन घटविण्यासाठी काळी मिरी उपयुक्त अाहे.

अपचन आणि जुलाब

अपचन, जुलाब, तसेच बद्धकोष्ठता यावरचा उपाय म्हणूनही काळ्या मिरीचे सेवन करता येते. त्यामुळे पचनशक्ती वाढते. काळ्या मिरीमुळे तोंडाला चव येते आणि पोटाला भुकेविषयीचा संकेत मिळून हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडची निर्मिती होते.

पोटात तयार होणाऱ्या या अ‍ॅसिडमुळे पचनक्रिया योग्य राहते. तसेच जेवण पचवण्यासाठीसुद्धा हे अ‍ॅसिड मदत करते. काळ्या मिरीच्या सेवनाने पोट फुगणे, अपचन, जुलाब, बद्धकोष्ठता आणि पित्तप्रकोप हेदेखील सहजपणे दूर होते.

वजन घटवणे 

काळी मिरी नियमितपणे सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येते. त्यातील फायटोन्यूट्रियंट्समुळे चरबीचा बाह्य थर मोडण्यास मदत होते, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. या प्रक्रियेत शरीराला अधिक घाम येतो, तसेच मूत्रप्रवृत्ती अधिक होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाऊन वजन कमी होते.

पोटातील वायू

काळ्या मिरीत वातहर गुण असतात, त्यामुळे काळ्या मिरीचे सेवन केल्याने पोटात वायू साठून राहू शकत नाही, तो सहजपणे सुटा होतो. पोटात वायू होण्याची समस्या प्रभावीपणे दूर होते. त्याशिवाय पोट फुगले असल्यास किंवा पोट दुखत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम मिळतो.

सर्दी आणि खोकला

सर्दी, कफ आणि नाक चोंदणे या त्रासात काळ्या मिरीने आराम मिळतो. खोकला कमी होण्यास मदत होते. सर्दीमुळे नाक वाहत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम पडतो. कफ, छातीतील कफ यावरही मिरीचा फायदा होतो.  

भूक वाढवते

काळी मिरी पचन सुलभ करते. भूक लागत नसल्याची तक्रार असेल, तर मिरीचा वापर करावा त्यामुळे शरीर चांगले राहते. जेवणाचे गुणधर्मही वाढतात.  

2. वेलची

  •  वेलचीचे मोठी विलायची आणि छोटी विलायची असे दोन प्रकार आहेत. यापैकी मोठी विलायची मसाल्याच्या पदार्थात वापरली जाते, तर छोटी विलायची औषधात वापरली जाते. वेलचीच्या स्वादाने स्फूर्ती येते.
  •  वेलचीचा उपयोग गोड पदार्थांची चव वाढविण्यासाठी अाणि माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्त्व ब गटातील एक महत्त्वाचा घटक आहे.
  •  लाल रक्तपेशी निर्मितीत वेलची महत्त्वाची भूमिका बजावते. वेलचीला वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात.
  •  जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. तोंडाच्या दुर्गंधीवर वेलची उपयुक्त अाहे. वेलची चावून खाल्ल्यामुळे अॅसिडीटीमुळे होणारी जळजळ थांबते.

संपर्क  ः  कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३
(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान)कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

टॅग्स

इतर औषधी वनस्पती
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...
जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्तटेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर...
अशक्तपणा, त्वचा रोगावर उंबर उपयुक्त स्थानिक नाव    : उंबर, औदुंबर...
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजीशास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum...
कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
तंत्र शिंगाडा उत्पादनाचे...शिंगाडा हे उपवासाच्या काळात विशेष मागणी असलेले...
निवडुंगाच्या फळांना वाढती मागणीआत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित...
पित्तशामक कोकमकोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय...
अडुळसा लागवड कशी करावी?अडुळसा लागवड  अडुळसा हे सदैव हिरवेगार...
अाैषधी म्हणूनही उपयुक्त मिरे, वेलचीस्वयंपाकात गरम मसाल्याचा वापर होत असतो. फक्त...
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...
सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी,...त्वचाविकार अाणि केसांच्या अारोग्यासाठी ब्राह्मी...