Agriculture story in marathi, Methane gas emission in livestock | Agrowon

मिथेन उत्सर्जन कमी करून दुग्धोत्पादनात वाढ शक्य...

योगेश पाटील
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन वायुचे उत्सर्जन जनावरांतील आंतरिक किण्वनातून होते. मिथेन वायू पर्यावरणासाठी हानिकारक असून, त्यामुळे जनावरांमधील ४ ते १२ टक्के ऊर्जा कमी होते. संतुलित आहाराचा पुरवठा करून जनावरातील मिथेन वायुचे उत्सर्जन कमी करता येते.

भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन वायुचे उत्सर्जन जनावरांतील आंतरिक किण्वनातून होते. मिथेन वायू पर्यावरणासाठी हानिकारक असून, त्यामुळे जनावरांमधील ४ ते १२ टक्के ऊर्जा कमी होते. संतुलित आहाराचा पुरवठा करून जनावरातील मिथेन वायुचे उत्सर्जन कमी करता येते.

कार्बन डायऑक्‍साईड, नायट्रस ऑक्‍साइड आणि मिथेन हे वायू हरितगृह वायू म्हणून ओळखले जातात. वातावरणातील हरितगृह वायूंची (जीएचजी) घनता वाढल्यामुळे, जागतिक हवामानातील बदल हा चिंतेचा विषय बनला आहे. या बदलाचा जनावरांच्या उत्पादनावर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो. दुधाळ जनावरांच्या मलमूत्रातून मिथेन हा वायू उत्सर्जित होतो. जनावरांच्या पोटामध्ये (रुमेन) होणाऱ्या आंबवण्याच्या प्रक्रियेतून मिथेन वायूचे उत्सर्जन होते. भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन वायुचे उत्सर्जन जनावरांतील आंतरिक किण्वनातून होते. मिथेन वायू पर्यावरणासाठी हानिकारक असून, त्यामुळे जनावरांमधील ४ ते १२ टक्के ऊर्जा कमी होते.

जनावरांमध्ये उत्पादित होणारे मिथेन वायू ः
जनावरांमध्ये एक विशिष्ट पाचक प्रणाली असते. जनावरांमध्ये रुमेन, रेटिकुलम, ओमासम आणि अबोसम असे पोटाचे चार प्रकार असतात. पोटातील ८० टक्के भाग हा रुमेनने व्यापलेला असतो. यामध्ये जिवाणू, प्रोटोझोआ आणि बुरशीसारखे सूक्ष्मजंतू अस्थिर फॅटिऍसिड्स (व्हीएफए), मायक्रोबियल प्रथिने, कार्बनडाय ऑक्साईड आणि उत्पादनामधील खाद्यपदार्थ तयार करतात. मिथेन व्हीएफएमध्ये एसीटेट आणि बुटायरेट हे मिथनोजेनिक तयार होताना, अतिरिक्त हायड्रोजन तयार होतो. मिथेन उत्पादनासाठी रुमेन मध्ये हवाबंद परिस्थितीत, हायड्रोजन आणि कार्बनडाय ऑक्साईडचा उपयोग मिथेनोजेनिक बॅक्टेरिया आंतरिक मिथेन तयार करण्यासाठी करतात. हे गॅस मुख्यतः जनावरांनी दिलेल्या ढेकरामार्फत बाहेर पडतात.

मिथेन मापनासाठी एसएफ ६ ट्रेसर तंत्रज्ञान

 • या तंत्राच्या मदतीने रवंथ करणाऱ्या जनावरांतील मिथेन उत्सर्जनाचे मोजमाप करता येते.
 • यांमध्ये एसएफ ६ असलेली एक छोटी निर्जंतूक नळी जनावराच्या रुमेनमध्ये ठेवली जाते.
 • जनावरांच्या श्वासोच्छ्वासाचे नमुने सलग चार दिवस कॅनिस्टर या उपकरणामध्ये गोळा केले जातात आणि ते मिथेन आणि एसएफ ६ विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात.
 • गॅसक्रोमॅटोग्राफी या उपकरणाद्वारे मिथेन आणि एसएफ ६ ची तिव्रता तपासली जाते.
 • श्वासोच्छ्वासाच्या नळीतील उत्सर्जनदर आणि सी एच ४ ते एस एफ ६ हे तिव्रतेचे गुणोत्तर म्हणजेच मिथेन वायुचा उत्सर्जनदर होय.

जनावरातील मिथेन वायुचे उत्सर्जन कमी करण्यासाठी संतुलित आहार

 • कमी ॲसिटेट, ब्यूटरायट आणि उच्च प्रोपीओनेट उत्पादनासाठी रवंथ करणारी जनावरे किण्वन पद्धतीस बदलतात. यामुळे उच्च मायक्रोबियल प्रथिने आणि मिथेनचे उत्पादन कमी होते.
 • स्तनपान करणाऱ्या जनावरांमध्ये उच्च प्रोपीनेट आणि मायक्रोबियल प्रोटीन संश्लेषण हे दूध उत्पादनासाठी ऊर्जा आणि प्रथिने प्रदान करते.
 • राष्ट्रिय दुग्ध विकास प्रकल्प (एन.डी.डी.बी.) ने घेतलेल्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, संतुलित आहारामध्ये दुधाचे उत्पादन वाढविणे, कार्यक्षमता सुधारणे, सूक्ष्मजीव प्रथिने संश्लेषण आणि प्रति किलो दुधाचे उत्पादन मिथेन उत्सर्जन कमी करण्याची क्षमता आहे.

संतुलित आहाराद्वारे मिथेन वायुचे उत्सर्जन कमी करण्याचे फायदे

 • खाद्यामध्ये उपलब्ध स्थानिक खाद्य स्रोतांचा अधिक चांगला उपयोग.
 • आहारातील ऊर्जा आणि प्रथिनांचा कार्यक्षम वापर.
 • मायक्रोबियल प्रथिने संश्लेषणाची सुधारित कार्यक्षमता.
 • एकूण ऊर्जासेवन कमी होणे.
 • दुधाळ जनावरांच्या उत्पादन क्षमतेत वाढ.
 • दुधाळ जनावरांकडून हरितगृह वायू उत्सर्जन कमी होते.

संपर्क ः योगेश पाटील, ७५८८७६१४४८
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)

 


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...