agriculture story in marathi, Mirzapur village in Parbhani Dist. has became self sufficient through farm pond constructions & water management. | Agrowon

शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले पाणीदार

माणिक रासवे
शुक्रवार, 7 मे 2021

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि. परभणी) गावाचे शिवार पाणीदार झाले आहे.
शेततळ्यांचे गाव म्हणून नवी ओळख मिळाली आहे. शेतकऱ्यांनी पीकपध्दतीत बदल केला आहे.
गावाच्या अर्थकारणाला बळकटी आली आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि. परभणी) गावाचे शिवार पाणीदार झाले आहे. शेततळ्यांचे गाव म्हणून नवी ओळख मिळाली आहे. शेतकऱ्यांनी पीकपध्दतीत बदल केला आहे. गावाच्या अर्थकारणाला बळकटी आली आहे.
 
परभणी- जिंतूर राज्य मार्गावरील झरी या बाजारपेठेच्या गावापासून पाच किलोमीटरवर मिर्झापूर हे सुमारे साडेअकराशे लोकवस्तीचे गाव आहे. शिवारात सुमारे ८०१ हेक्टर जमीन आहे. पैकी ७७७ हेक्टर वहितीखाली आहे. सिंचन स्त्रोतांअभावी चार वर्षांपूर्वी कोरडवाहू बहुल क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांची सारी भिस्त खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद तर रब्बीत ज्वारी, हरभरा, करडई या पिकांवर असे. शासकीय योजनांची फारशी अंमलबजावणीही झाली नव्हती. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी पी.बी. बनसावडे, तत्कालीन कृषी अधिकारी एम.बी. बनकर, के.एम.जाधव, कृषी सहाय्यक बी.एस. शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्याअंतर्गत मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जागृती करण्यात आली. एकत्रित कुटुंबातील जमीन नावावर असलेले बहुतांश सदस्य योजनेत सहभागी झाले.

सिंचन व्यवस्था बळकट
गावातील नाल्याचे पात्र अस्तित्वात राहिले नव्हते. त्यामुळे पावसाचे पाणी साचून शेकडो एकर क्षेत्र चिबड, पडीक झाले होते. या जमिनींवर शेततळी खोदण्याचे नियोजन झाले. योजनेंतर्गंत २०१७-१८ व १९ या काळात ग्रामस्थांनी एकूण ४२ शेततळी खोदली. त्यापुढील वर्षांत १९ शेततळ्यांची भर पडून संख्या ६१ झाली.

साखळी पध्दतीचा वापर
जमिनीच्या उतारानुसार वरच्या भागातील शेततळ्याचे आऊटलेट खालील बाजूच्या शेततळ्यामध्ये सोडण्यात आले. त्यामुळे साखळी पद्धतीने एका पाठोपाठ एक शेततळी भरतात. सर्व शेततळी भरल्यानंतर आऊटलेटद्वारे नाल्यात पाणी जाते. पावसाचे वाहून जाणारे पाणीही शेततळ्यात साठते.

वर्षात एका शेततळ्याव्दारे सरासरी एक टीसीएम पाणी जमिनीत मुरते. निम्न दुधना प्रकल्पाच्या वितरण प्रणालीव्दारे नाल्याला वाहून जाणारे पाणी शेततळ्यात घेतले जाते. त्यामुळे शिवारातील विहीरी, बोअरच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

कामांची फलश्रुती

 • अनेक वर्षे कोरड्या पडलेल्या बोअरवेल्सना पाणी उपलब्ध
 • सन २०१७ व २०१८ या वर्षी पावसाच्या खंड काळात (ड्रायस्पेल)
 • सोयाबीन व अन्य खरीप पिकांसाठी संरक्षित सिंचन झाले. परिणामी चांगले उत्पादन मिळाले.
 • शेततळ्यांमुळे १५० ते २०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले.
 • पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असल्याने सुमारे ५० हेक्टर पडीक जमीन वहितीखाली आली. -
 • राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत एक कोटी लिटर क्षमतेचे सामुहिक शेततळेही घेण्यात आले.
 • येत्या काळात प्रति कुटुंब शेततळे संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न
 • जलाशयामुळे भागात पक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळले. गेल्यावर्षी हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नैसर्गिक नियंत्रणासाठी त्यांची मदत झाल्याचा शेतकऱ्यांना अनुभव.

पीक पद्धतीत बदल
शेतकरी सोयाबीन, कपाशी यांच्यासह हळद, पपई, भाजीपाला आदी पिके घेऊ लागले आहेत. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा यांना मुबलक पाणी मिळत आहे. उन्हाळी हंगामात भुईमूग, कलिंगड, कांदा, दोडके, कारली, कोथिंबीर तर मेमध्ये हळद लागवड करणे शक्य झाले आहे. हळदीच्या क्षेत्रात २५० एकरांपर्यंत वाढ झाली आहे. पेरू, सीताफळ दहा एकरांवर आहे. बारमाही बहुवार्षिक चाराही घेतला जात असल्याने दुग्धोत्पादनास चालना मिळाली आहे. शेतकरी परभणी शहरात दूध विक्रीस नेतात. बारमाही पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. पूरक उत्पन्नासाठी अनेकांनी शेततळ्यांत मत्स्यबीज सोडले आहे. शेतकरी गटांतर्फे गांडूळ खत निर्मिती होत आहे.

शेतकरी गटांचे विविध उपक्रम

 • गावात सुमारे १४ शेतकरी बचत गट कार्यरत
 • त्यांच्याव्दारे सुमारे शंभर एकरांवर सेंद्रिय शेती पध्दतीचा भर
 • श्री. स्वामी समर्थ शेतकरी गटातर्फे सेंद्रिय शेतमालाची थेट विक्री विविध प्रदर्शनातून झाली.
 • अवजार बॅंक स्थापनेची प्रक्रिया सुरु. डाळ मिल सुरु करण्यात येणार.
 • कालभैरव शेतकरी गटातर्फे शेततळ्यांमध्ये मत्सबीज सोडण्यात आले.
 • नार्बाडच्या सहकार्याने गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होणार. त्याद्वारे दुग्ध प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती होणार.
 • अनेक शेतकऱ्यांनी बोअरवेलच्या साह्याने सौर कृषी पंप बसविले आहेत. त्यातून दिवसभर पाणी देणे झाले शक्य.

पोकरा अंतर्गत निवड
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानाकुल कृषी प्रकल्प -पोकरा) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात मिर्झापूरची निवड झाली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या अंतर्गत गेल्यावर्षी सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला. यांत्रिकीकरणांतर्गंत ट्रॅक्टर तसेच विविध अवजारांचा लाभ देण्यात आला.

प्रतिक्रिया
शेततळ्यांमुळे शिवारात पाणी उपलब्ध झाल्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गंत गावातील प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीव्दारे पाणीपुरवठा करण्यात येईल.
-दैवशाला भगवानराव जाधव
सरपंच

आमच्या कुटुंबातील सदस्यांनी पाच शेततळी खोदली. त्याद्वारे हरभऱ्याला पाणी मिळाले. उत्पादनवाढीस हातभार लागला. यंदा हळद लागवड शक्य होणार आहे.
-अच्युतराव चट्टे- ८८५५८९१२१६
उपसरपंच

गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांनी पीकपध्दतीत बदल केला आहे. शेतकरी गटातर्फे अवजार बॅंक
कार्यान्वित होणार आहे.
-पांडुरंग जाधव-७५८८०१८५८२
शेतकरी,

आमच्याकडे पाच शेततळ्यांची सुविधा आहे. दहा वर्षांपासून कोरड्या पडलेल्या बोअरला पाणी आले.
उन्हाळी हंगामात सिंचन करता येत आहे.
-भास्करराव चट्टे- ९८५०५१४२०७
शेतकरी.

मागेल त्याला शेततळे योजनेला शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. बागायती पिके तसेच पूरक व्यवसायाव्दारे गावाचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
बी.एस.शिंदे, कृषी सहाय्यक


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने...
फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेतीभावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई...
सोयाबीनमध्ये तूर शाश्‍वत पद्धतीचा प्रयोग‘कॉटन सिटी’ अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
एसआरटी’ तंत्रामुळे भाताची एकरी पाच...पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक...
भातशेतीत राज्यात टिकवला क्रमांकसुधारित, संकरित वाणांचा वापर, सुयोग्य...
अल्पभूधारकाला आधार रेशीम शेतीचाअल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम शेतीसारखे पूरक...
महिलांना आत्मनिर्भर करणारे समृद्धी कृषी...टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) येथील वनिता साहेबराव...
शहर, गाव शिवारांमध्ये ‘निसर्ग’चा जागरनिसर्ग वाचायला शिकविले तरच नवीन पिढी निसर्ग...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी १८ क्विंटल...उत्कृष्ट व्यवस्थापनातून सोयाबीन बीजोत्पादन शेतीचा...