Agriculture story in marathi, The Most Incredible And Simple Invention That Will Change Our Future | Agrowon

शेवाळापासून पर्यावरणपूरक दिवे...

वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

फ्रेंच जैव रसायनतज्ज्ञ पियरे कॅल्लेजा यांनी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण करणारे व त्यापासून चालणारे दिवे विकसित केले आहेत. या दिव्यांसाठी विजेची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेक दिवा झाडाच्या २०० पट (सुमारे एक टन प्रति वर्ष) कर्बवायू शोषतो. ही किमया आहे ती छोट्या शेवाळाची.

फ्रेंच जैव रसायनतज्ज्ञ पियरे कॅल्लेजा यांनी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण करणारे व त्यापासून चालणारे दिवे विकसित केले आहेत. या दिव्यांसाठी विजेची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेक दिवा झाडाच्या २०० पट (सुमारे एक टन प्रति वर्ष) कर्बवायू शोषतो. ही किमया आहे ती छोट्या शेवाळाची.

काचेच्या पात्रांमध्ये ठेवलेले एकपेशीय शेवाळ सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया सुरू करते. त्यासाठी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषते. ऑक्सिजन वातारणामध्ये सोडते. या प्रक्रियेतून तयार झालेली ऊर्जा जोडलेल्या बॅटरीमध्ये साठवली जाते. रात्रीच्या वेळी या ऊर्जेद्वारे दिवे चालतात. ही सामान्य प्रक्रिया असली तरी या विशिष्ट शेवाळासाठी सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता नसल्याचे व ते केवळ कार्बनडाय ऑक्साईडवर चालत असल्याचा दावा पिएरे करतात. त्यांच्या मते, ज्या ठिकाणी अजिबात प्रकाश नाही, अशा ठिकाणीही या दिव्यांचा वापर करणे शक्य आहे. जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कर्बवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. हे दिवे कर्बशोषणामध्ये एकेका झाडाचे काम करणार आहेत. सध्या वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेमध्येही बचत होणार आहे.

शेवाळाचे दिवे या कल्पनेवर पिएरे कॅल्लेजा यांच्यासोबत त्यांचा फर्मेंटअलग या कंपनीतील संशोधकांचा गट २००९ पासून या तंत्रावर काम करत आहे. त्यांनी दिव्यांचे अनेक प्रारुप तयार केले आहेत. हे शेवाळ सामान्यतः पाण्यामध्ये वाढते. त्यामुळे त्यासाठी पाणी असलेले कक्ष, त्यांच्या वाढीसाठी आवश्यक कर्बवायू आत येण्याची व्यवस्था आणि प्रक्रियेतून निघालेला ऑक्सिजन बाहेर सोडण्याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. मात्र, प्रकाश संश्लेषणापासून विद्युत ऊर्जेची निर्मिती कशा प्रकारे होते, याबाबतचे तांत्रिक माहिती कंपनीने जाहिर केलेली नाही. कंपनीच्या बोर्डेक्स (फ्रान्स) येथील मुख्यालयामध्ये पार्किंग क्षेत्रांमध्ये एक प्रारुप उभे केले आहे.

पर्यावरणासाठी फायदे

  • कार्बन प्रदूषणाच्या समस्येवर उत्तर मिळू शकते. शेवाळाचा एक दिव एका झाडाच्या तुलनेमध्ये २०० पट अधिक कार्बनडाय ऑक्साईड शोषतो. एक ॲशट्री प्रति वर्ष सुमारे ०.१० टन कर्बवायू शोषते, तर हा दिवा १ टनापर्यंत कर्बवायू शोषतो.
  • सागर, तलाव, नद्या यांच्या पाण्यातून शेवाळाची गर्दी कमी होईल. त्याचा फायदा मासे व अन्य जलचरांना होऊ शकतो.
  • दिव्यातील शेवाळ मृत झाल्यानंतर त्याच्या बायोमासचा वापर अन्य कामांसाठी करता येईल.

मर्यादा

  • काचेच्या पात्रांमध्ये शेवाळाची वाढ केली जाते. दर काही काळानंतर या काचेच्या पात्रांची स्वच्छता करणे आवश्यक ठरते.
  • नैसर्गिक पर्यावरणामध्ये वाढणाऱ्या शेवाळाच्या तुलनेमध्ये कृत्रिम वातावरणामध्ये वाढवलेल्या शेवाळांचा कार्यकाल कमी राहू शकतो. कारण या शेवाळांनी तयार केलेल्या ऊर्जेचा वापर दिव्यांसाठी केला जाणार आहे. परिणामी दर काही काळानंतर शेवाळ बदलण्याची आवश्यकता राहणार आहे.
  • या शेवाळाची विविध पर्यावरणीय घटकांच्या विविध तीव्रतेसाठी संवेदनशीलता तपासणे आवश्यक आहे.

 


इतर टेक्नोवन
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक...
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रेग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय...
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेतीबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
धान्य साठवणीसाठी जीआयसी सायलो अधिक...काढणीपश्चात अन्नधान्यांच्या साठवणीमध्ये अधिक...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...