agriculture story in marathi, Mrathwada Agriculture University has done the extension of improved Technique of Soybean Farming. | Page 2 ||| Agrowon

सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

माणिक रासवे
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे सुधारित वाण, त्या अनुषंगाने बीबीएफ तंत्रज्ञान व लागवड पद्धती यांचा प्रसार अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत केला आहे. प्रात्यक्षिके व प्रशिक्षणातून शेतकरी या तंत्राचा चांगला उपयोग करीत असून त्याचे फायदेही त्यांना मिळत आहेत.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे सुधारित वाण, त्या अनुषंगाने बीबीएफ तंत्रज्ञान व लागवड पद्धती यांचा प्रसार अधिकाधिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत केला आहे. प्रात्यक्षिके व प्रशिक्षणातून शेतकरी या तंत्राचा चांगला उपयोग करीत असून त्याचे फायदेही त्यांना मिळत आहेत.
 
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आपले तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवले आहे. येथील सोयाबीन संशोधन केंद्राने ४७ वर्षांच्या कालावधीत सोयाबीनचे ११ वाण राज्यासह देशाच्या विविध भागांसाठी प्रसारित केले. त्यात एमएयुएस ७१, एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२ हे वाण बियाणे साखळीत (सीड चेन) आहेत. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातर्फे प्रक्षेत्रावर २०१४-१५ ते २०१६ -१७ या कालावधीत रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) पेरणी प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यातून एकरी उत्पादकता वाढतेच. शिवाय मूलस्थानी जलसंधारण होत असल्याने कोरडवाहू क्षेत्रासाठी या तंत्राचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली. सोबतच केंद्रातर्फे मराठवाडा विभागातील ट्रॅक्टर मालक चालकांसाठी बीबीएफ यंत्र जोडणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास मदत झाली.

अशी घडली प्रात्यक्षिके
विद्यापीठातील कृषी यंत्रशक्ती विभाग आणि हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र यांनी संयुक्तरित्या पाच फणी बहुउद्देशीय रुंद वरंबा सरी यंत्र विकसित केले आहे. याव्दारे पेरणी, रासणी, फवारणी तसेच कोळपणी करता येते. कृषी विभागाच्या सहकार्याने गेल्यावर्षी (२०२० )आणि यंदा (२०२१) परभणी तालुक्यातील ४० ते ४५ गावांत सुमारे १५० एकरांवर याव्दारे शेतकऱ्यांना पेरणी करून देण्यात आली. त्याबाबतचे शेतकऱ्यांचे अनुभव सकारात्मक आहेत. यंत्राच्या व्यावसायिक निर्मितीसाठी एका खासगी कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यात आला. यंदा परभणी तालुक्यात सुमारे ३०० एकरांवर या यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी झाली. काही निवडक गावातील शेतकऱ्यांना फवारणीचेही प्रात्यक्षिक दिल्याचे संशोधक अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी सांगितले.

शेतकरी अनुभव
गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामात सोयाबीनच्या एमएयुएस ६१२ वाणाची बैलचलित पेरणी यंत्राव्दारे दोन ओळीमध्ये १४ इंच अंतर ठेवून पेरणी करतो. एकरी १४ ते १५ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत आहे. तीन वर्षांपासून याच वाणाचे उन्हाळी हंगामात एकरी ७ ते ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
-गणेशराव ढगे, परभणी
९६७३१११०४८

 
गेल्यावर्षी पासून रुंद वरंबा सरी पद्धतीने एक एकरावर सोयाबीन पेरणी करीत आहे. एकरी १६ ते १७ किलो बियाणे लागते. एकरी १२ ते १३ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. गेल्या महिन्यात आमच्या मंडळात अतिवृष्टी झाली. मात्र तंत्राचा वापर केल्याने सऱ्यांमधून अतिरिक्त पाणी वाहून गेले. जमीन लवकर वाफशावर आली. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले नाही.
-जनार्दन आवरगंड
माखणी,ता..पूर्णा, जि..परभणी
९६५७२४०२६३

 
आम्ही शेतकरी संघामार्फत उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे दोन हजार एकरांवर बीजोत्पादन घेत असतो. त्यात परभणी विद्यापीठाच्या एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२या वाणांचे क्षेत्र सुमारे अडीचशे एकरांपर्यंत असते. एमएयुएस ६१२ हा वाण अधिक उत्पादन देणारा आहे. परतीच्या पावसात भिजल्यानंतर बुरशीस प्रतिकारक्षम तसेच शेंगांमध्ये कमी उगवणशक्ती असलेले वाण विकसित
करण्याच्या संशोधनावर भर द्यावा.बीबीएफ तंत्रज्ञानही अनेक बाबतीत फायदेशीर ठरले आहे.
-ॲड. अमोल रणदिवे,
उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट सीड फेडरेशन, सारोळा बुद्रूक,
जि..उस्मानाबाद
९८८१३०३१२८

विद्यापीठाने प्रसारित केलेल्या सोयाबीनच्या विविध वाणांचे बिजोत्पादन १० ते १२ एकरांवर घेतो. सन २०१४ पासून बीबीएफ तंत्राचा अंगीकार केला आहे. त्यामुळे दर एकरी बियाणे कमी लागते. उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमएयुएस ६१२ वाणाचे चांगले उत्पादन मिळत आहे.
-मंगेश देशमुख,
पेडगाव, जि..परभणी.
९९६०३१०३५८

 
५० एकरांपैकी ३० एकरांवर सोयाबीन घेतो. दहा वर्षापासून विद्यापीठाच्या विविध वाणांचे
उत्पादन घेतो. एमएयुएस ६१२ हा वाण किडी- रोगांना प्रतिकारक्षम व उत्पादनाच्या बाबतीत चांगला आढळला आहे.
-अनंतराव गायकवाड,
शेतकरी, हलगरा,ता..निलंगा, जि..लातूर.

 
यंदा ७० एकरांवर सोयाबीन पेरणी केली आहे. विद्यापीठाच्या संशोधन केंद्राने केलेल्या
शिफारसींनुसार पीक व्यवस्थापन करतो.
-मोनिका शर्मा,
खडेपुरी, जि..जालना

 
माझी ३८ एकर शेती आहे. गेल्यावर्षी तीन एकरांवर विद्यापीठाच्या सुधारित यंत्राव्दारे पेरणी केली. चांगले उत्पादन मिळाले. यंदा २८ एकरांवर सोयाबीनची बीबीएफ तंत्राद्वारे पेरणी केली. त्यात एमएयुएस ६१२ वाणाचे क्षेत्र सहा एकर आहे.
-महेश शेळके,९८९०६९१२१९
हस्नापूर, जि..परभणी.

विद्यापीठाचे वाण व यंत्र याव्दारे सोयाबीन उत्पादनात आर्थिक क्रांती होण्यास मदत झाली.
-डॉ. अशोक ढवण,
कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी.

 
राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर लोकप्रिय ठरलेल्या सोयाबीन वाणांच्या पैदासकार बियाण्याचा पुरवठा बियाणे महामंडळ तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना केला जातो.
येत्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन विषयावर कार्यशाळा घेणार आहोत.
-डॉ.दत्तप्रसाद वासकर,
संशोधन संचालक,

 
सोयाबीनचे वाण विकसित करणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हवामान बदलानुसार अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. यंदा शेंगा खाण्यायोग्य म्हणजे ‘व्हेजिटेबल सोयाबीन’ वाणाच्या चाचण्या घेत आहोत.
-डॉ. एस..पी..म्हेत्रे, प्रभारी अधिकारी
सोयाबीन पैदासकार (विद्यापीठ)
७५८८१५६२१०, ९४२१४६२२८२

संपर्क- डॉ.स्मिता सोलंकी- ८००७७५२५२६
(कृषी यंत्रशक्ती विभाग)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक...ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते, अशा आशयाची म्हण...
घरगुती उत्पादनासाठी ‘स्मार्ट इनडोअर...हरितगृहाची उभारणी ही आधुनिक शेतीकडे नेणारे पाऊल...
अन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : ...गेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या...
हरियाना येथील कृषी विद्यापीठात...हिस्सार (हरियाना) येथील चौधरी चरणसिंग हरियाना...
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या...वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला...
मळणी यंत्र वापरताना घ्यावयाची खबरदारीखरिपातील बहुतांश पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
आवळा प्रक्रियेसाठी उपयुक्त उपकरणेआवळा फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असून...
बियांच्या अंकुरणासोबत वाढीसाठी उपयुक्त...ज्या बिया दीर्घकाल सुप्तावस्थेत राहतात, त्यांच्या...
पाण्यातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण...ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्श...
कृषी उत्पादनावरील वातावरण बदलांचे...गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलांची मोठी...
नारळाच्या एकाच गर्भापासून अनेक फुटवे (...नारळाचे झाड हे सावकाश वाढणारे असून, त्याची पैदास...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
सोयाबीन काढणी, मळणी, साठवण तंत्रसोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण वेळेवर...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
पंजाबातील बद्दुवाल गावाने रचला...भारतातील भात आणि गहू यांचे कोठार म्हणून ओळखल्या...
संपूर्ण कुजलेल्या कंपोस्ट खतांचाच वापर...अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉइज विद्यापीठातील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
चीज उद्योगातील निवळीपासून मिळवता येतील...चीजनिर्मिती व्यवसायामध्ये मिळणाऱ्या निवळीसारख्या...