विक्री व्यवस्थेत बदल करून शेतकऱ्यांनीच शोधले नवे मार्ग

अलीकडील वर्षांत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन विक्री व्यवस्थेत बदल केले आहेत. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेला पुढाकार फायद्याचा ठरला आहे.
निवासी सोसायट्यांना शेतमाल विक्री करताना नगर जिल्ह्यातील शेतकरी
निवासी सोसायट्यांना शेतमाल विक्री करताना नगर जिल्ह्यातील शेतकरी

अलीकडील वर्षांत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन विक्री व्यवस्थेत बदल केले आहेत. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेला पुढाकार फायद्याचा ठरला आहे. नगर जिल्ह्यात २००६ मध्ये कृषी विभागाच्या पुढाकाराने कृषी महोत्सव सुरू झाला. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विकता यावा आणि पारंपरिक विक्री व्यवस्थेत बदल व्हावा हा त्यामागील हेतू होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून ही संकल्पना महाराष्ट्रात राबवली जाऊ लागली. ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतकरी एकत्र आणण्याचा प्रयोग यशस्वी झाला. नगर जिल्ह्याचा विचार करता १५० शेतकरी गटाच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री करीत आहेत. कोरोना संकटात शेतमाल, फळे, भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र शेतकऱ्यांनी बदलत्या विक्री व्यवस्थेचा फायदा घेत थेट विक्री केली. मोहरीचे गवीनाथ नरोटे सांगतात की या काळात बारा टन कांद्याची मी थेट ग्राहकांना विक्री केली. पिकविण्यातही बदल खर्डा (ता. जामखेड) येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर इंगोले म्हणाले, की पाच वर्षांपूर्वी स्थानिक बाजारपेठेशिवाय विक्री करण्याला फारशी संधी नव्हती. आता आमच्या भागात शेवगा, टोमॅटो, दर्जेदार ज्वारीचे उत्पादन मिळते. तालुक्यातून शेकडो वाहने माल घेऊन शहरात जातात. विक्री करताना मागणी वाढल्याने पीक पद्धतीतही बदल महत्त्वाचा ठरला आहे. प्रक्रियायुक्त मालालाही उठाव आला आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर भागातील शेतकरी टोमॅटोसह अन्य भाजीपाला, फळांचे उत्पादन घेऊन शहरात विक्री करतात. श्रीगोंदा, कर्जतमध्ये द्राक्ष, लिंबू, राहत्यात पेरु, पाथर्डी, शेवगावात शेवगा व अन्य भाजीपाला उत्पादन घेतात. थेट विक्रीच्या सुविधा मिळाल्या तालुका कृषी अधिकार प्रवीण गोसावी म्हणाले, की आमच्या भागात टोमॅटोची विक्री करताना व्यापारी दर पाडून घ्यायचे. आता वाहने उपलब्ध झाली आहेत. अनेक शेतकरी एकत्र आल्याने दररोज वाहन नेणे परवडते. दरही चांगला मिळतो. कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील फार्मिंग फास्ट शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांसाठी मुंबईत शेतकरी बाजार उपलब्ध झाला आहे. गुंडेगाव (ता. नगर) येथील ज्योती भापकर, संतोष भापकर पाच वर्षांपासून घरपोच तसेच मॉलमध्ये सेंद्रिय भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे परिसरातील दहा गावातील शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे. दरही स्थानिक बाजारापेक्षा अधिक मिळतो. वाघोली (ता. शेवगाव) येथील शेतकरी गट तसेच भोयरे पठार येथील तरुणांनी एकत्र येऊन उभारलेली कोरडवाहू सन फार्मर प्रोड्युसर कंपनी अशी काही उदाहरणे सांगता येतील. ऑनलाइन नोंदणी संगणकीय युगात शेतकरी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून विक्री करत आहेत. गुंडेगाव (ता. नगर) येथील संपूर्ण शेतकरी गट अशा प्रकारे दोन वर्षांपासून विक्री करीत असून त्यासाठी त्यांनी ॲप विकसित केले आहे. प्रतिक्रिया पाच-सात वर्षांपूर्वी विक्रीसाठी बाजार समिती, आठवडी बाजार हेच पर्याय होते. आता शेतकरी थेट ग्राहकांना विक्री करतात. मोठ्या शहरांतील बाजार उपक्रम, ऑनलाइन नोंदणी असे पर्याय मिळाले आहेत. -ज्योती संतोष भापकर अध्यक्ष, संपूर्ण शेतकरी गट, जि. नगर संपर्क- ९४२३००४०३९   नगर हा दुष्काळी तालुका आहे. येथील शेतकरी पूर्वी भुसार पिके घेत. आम्ही शेतकरी कंपनी स्थापन केली. पुणे, मुंबईसह अन्य शहरांत विक्रीची सोय उभारली. सागर उरमडे, सारोळा कासार, जि. नगर संपर्क- ९८३४२१७२३१   अर्थकारणात झाले बदल

  • गुंडेगावच्या शेतकरी उत्पादक कंपनीने थेट भाजीपाला विक्रीतून महिन्याला दोन लाखांहून अधिक रकमेची उलाढाल सुरू केली. ही रक्कम शेतकऱ्यांनाच मिळू लागली.
  • खर्डा येथील शेवगा उत्पादक ज्ञानेश्वर इंगोले यांनी बदलत्या विक्री व्यवस्थेचा फायदा घेत अर्थकारण सुधारले. लॉकडाउनच्या काळात पाच आकडी उत्पन्न कमावले.
  • बदलत्या अर्थकारणामुळे घरात पैसे येऊ लागला. अनेक शेतकऱ्यांनी घरे बांधली, शेती खरेदी केली. मुलांना उच्च शिक्षण मिळू लागले.
  • प्रत्येक शेतकरी साधारण एक ते दोन लाख रुपये किमतीचा शेतमाल विकतो आहे.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com