agriculture story in marathi, Nagar District farmer has done farm mechanisation & saved labour, money & time. | Agrowon

यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ, रोजगारही मिळवला

सूर्यकांत नेटके
बुधवार, 22 जानेवारी 2020

नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव राशीनकर या तरुण शेतकऱ्याने मजूरटंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिक शेतीवर भर दिला आहे. कांदा पेरणी, गादीवाफा तयार करणे, पॉली मल्चिंग पेपर अंथरणे, कापसाच्या पर्हाट्यांचा भुगा करून शेतात पसरवणे आदी कामे यंत्राद्वारे सुलभ व कमी वेळेत करणे शक्य झाले आहे. इतरांना देखील ही सेवा देताना उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे.

नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव राशीनकर या तरुण शेतकऱ्याने मजूरटंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिक शेतीवर भर दिला आहे. कांदा पेरणी, गादीवाफा तयार करणे, पॉली मल्चिंग पेपर अंथरणे, कापसाच्या पर्हाट्यांचा भुगा करून शेतात पसरवणे आदी कामे यंत्राद्वारे सुलभ व कमी वेळेत करणे शक्य झाले आहे. इतरांना देखील ही सेवा देताना उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे.

नगर जिल्ह्यात बेलापर (ता. श्रीरामपूर) व चांदेगाव (ता. राहुरी) हा परिसर तसा शेतीत पुढारलेला. प्रवरा नदीच्या पट्ट्यांतील शेती त्यामुळेच सधन, बागायती झाली आहे. या भागातील बहुतांश शेतकरी उसाचे पीक घेत. अलकडील काळात मात्र अन्य पिकांचेही क्षेत्र वाढत आहे. बेलापूर येथील मारुतराव राशीनकर यांची दोन्ही ठिकाणी मिळून एकरा एकर शेती आहे. त्यांचा मुलगा बाळासाहेब हे पूर्णवेळ शेती करतात. राशीनकर कुटुंबाने पूर्वीपासूनच यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. तीस वर्षांपूर्वीच त्यांनी टॅक्टर खरेदी केला होता. ठिबक सिंचनाचाही बारा वर्षांपूर्वी वापर सुरू केला. काळानुसार ते अवजारांचा वापर वाढवत गेल. सुमारे तीन वर्षांपूर्वी राशीनकर यांनी चाळीस हजार रुपयांना ट्रॅक्टरचलित कांदा पेरणी यंत्र खरेदी केले. आज स्वतःच्या शेतीत वापर करण्याबरोबर ते भाडेतत्त्वावरही हे यंत्र शेतकऱ्यांना देतात. या यंत्राच्या वापरामुळे उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचे ते सांगतात.

पॉली मल्चिंग पेपर अंथरणे यंत्राचा वापर
पपई व कांदा ही राशीनकर यांची सध्याची मुख्य पिके आहेत. ऊसही आहे. त्याचबरोबर हंगामी म्हणून कलिंगड व खरबूज देखील ते घेतात. या हंगामी पिकांत गादीवाफे (बेड) तयार करण्यापासून खत घालणे, मल्चिंग पेपर अंथरणे, ठिबक अंथरणे असा एकरी किमान सहा हजार रुपये खर्च यायचा. अशावेळी खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने एक लाख रुपये खर्च करून त्यांनी बहुविध कामे करणारे यंत्र खरेदी केले. आताही ही सर्व कामे करण्यासाठी एकरी साडेतीनहजार रुपये केवळ खर्च येतो असे राशीनकर सांगतात. आपल्यासोबत एका शेतकऱ्यासाठी २० एकरांवर देखील हे काम करून दिल्याचे ते सांगतात.

कापसाच्या काड्यांची कुट्टी
कपाशी पिकाचाही राशीनकर यांना अनुभव आहे. त्याच दृष्टीने कापसाच्या पऱ्हाट्यांची कुट्टी करणारे
यंत्र त्यांनी एक लाख चाळीस हजार रुपयांना आणले आहे. ही कुट्टी शेतात जागेवरच पसरवली जाते.
एक एकर क्षेत्र कव्हर करण्यासाठी या यंत्राला सुमारे दोन तासांचा अवधी पुरतो. ४० ते ४५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला हे यंत्र जोडता येते.

यांत्रिकरणाने दिला रोजगार
राशीनकर यांनी स्वतःची शेती यांत्रिकरणाच्या साहाय्याने सोपी केलीच पण अन्य शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ही सेवा देताना उत्पन्नाचा स्रोतही तयार केला आहे. कांदा पेरणी यंत्र एकरी अडीचहजार रुपये दराने,
कापसाची कुट्टी एकरी दोन हजार रुपये तर बेडनिर्मिती, मल्चिंग पेपर अंथरणे आदी कामे ते
चार हजार रुपये प्रतिएकर या दराने करतात.

मका लागवड तंत्रात बदल
लागवड तंत्रात बदल ही राशीनकर यांच्या शेतीची खासीयत आहे. कापसाची पाच बाय एक फूट अंतरावर त्यांनी लागवड केली आहे. कांदा पेरणी यंत्राचा वापर व एकूण व्यवस्थापन यातून एकरी २३ टनांपर्यंत उत्पादनापर्यंत पोचल्याचे ते सांगतात. अलिकडील वर्षांत स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकात राज्यात सर्वत्र झाला. हे पीक मोठे किंवा उंच झाल्यास त्यात फवारणी करणे शक्य होत नाही. अशावेळी राशीनकर यांनी दोन ओळीत साडेचार फूट व दोन बियांत आठ इंच असे अंतर ठेऊन मक्याचे पीक घेतले. ठिबकच्या दोन्ही बाजूंस मका लावला.
या तंत्रामुळे पिकाच्या मधून फवारणी करणे सोपे झाले आहे. शिवाय हवादेखील खेळती राहिली
आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव या तंत्राने रोखता येईल असा विश्वास त्यांना आहे. खोडवा उसाचे पीकदेखील ते अनेक वर्षांपासून विनामशागत तंत्राने घेतात. उसाचा पाला न जाळता तो कुट्टी करून सरीतच गाडण्यात येतो.

संपर्क- बाळासाहेब राशीनकर-७९७२६८७१८१
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...
व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना...वासाळी (ता. जि. नाशिक) येथील संजीव गजानन रासने...
व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब उत्पादक झाले...तोंडावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या...
दर पडले? चिंता नको इंगळे घेऊन आले...शेतकऱ्यांच्या मालाला अनेक वेळा समाधानकारक दर मिळत...