agriculture story in marathi, Nagar Veer Brrothers from Sal vadgaon, Dist. Nagar are doing organic farming of vegetables round the year. They have got direct market of costumers. | Agrowon

वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार पद्धतीने शेती, मिळवली थेट ग्राहक बाजारपेठ

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 9 जुलै 2020

अवर्षणग्रस्त सालवडगाव (जि. नगर) येथील संतोष व काकासाहेब या वीर बंधूंनी दहाहून अधिक विविध भाजीपाला सेंद्रिय पध्दतीने घेण्याचा पॅटर्न राबवला आहे. दर्जेदार, ताज्या मालाला खात्रीशीर थेट ग्राहक बाजारपेठ विकसित केली आहे.

अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि. नगर) येथील संतोष व काकासाहेब या वीर बंधूंनी दीड एकरांत वर्षभरात दहाहून अधिक विविध भाजीपाला उत्पादन सेंद्रिय पध्दतीने घेण्याचा पॅटर्न राबवला आहे. नजिकच शेवगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. साहजिकच आपल्या दर्जेदार, ताज्या शेतमालाला हमीची व खात्रीशीर थेट ग्राहक बाजारपेठ वीर बंधूंनी विकसित केली आहे.
 
नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. सालवडगाव परिसरही त्यास अपवाद नाही. येथील संतोष आणि काकासाहेब या वीर बंधूंची सहा एकर शेती आहे. दोघेही भाऊ शेतीतच राबतात. खरीप, रब्बी हंगामी पिकांबरोबरच दोन वर्षांपासून दीड एकरांत सेंद्रिय पध्दतीने त्यांनी भाजीपाला शेती सुरू केली आहे.

दीड एकरांत बारमाही भाजीपाला
पाण्याचे प्रमाण या भागात अल्प असल्याने भाजीपाला क्षेत्र वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही दीड एकर जागेचा पुरेपूर विनियोग करून दहापेक्षा अधिक भाज्यांची शेती वर्षभरात केली जाते. यात वांगी, दोडका, मिरची, भेंडी, कारली, दुधीभोपळा कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, कारली, घोसाळे तर पालेभाज्यांत शेपू, अंबाडी, कोथिंबीर, पालक, मेथी, काकडी, मुळा अशी विविधता दिसून येते.
दीड एकरांत एवढ्या प्रकारच्या भाजीपाल्यांचे उत्पादन घेणारे वीर हे या भागातील एकमेव शेतकरी असावेत.

शेतीची वैशिष्ट्य़े

 • चक्राकार पद्धतीने लागवड- कमी खर्चाची शेती करण्याबरोबर ग्राहकांची मागणी ओळखून चक्राकार पद्धतीने वा टप्प्याटप्प्याने लागवड. वेलवर्गीय भाजीपाला शेताच्या कडेला तर अन्य भाजीपाला गादीवाफ्यावर घेण्यात येतो.
 • गहू, बाजरीचा भुस्सा वा पालापाचोळ्याचे आच्छादन केले जाते. त्यामुळे पाणी कमी लागत असल्याचा अनुभव आहे.
 • गेल्या दोन वर्षांपासून रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्णपणे बंद
 • दरवर्षी एकरी १५ ते २० बैलगाड्या शेणखताचा वापर. घरच्या पाच देशी गायी. गरजेनुसार बाहेरुनही शेणखताची खरेदी
 • दर पंधरा दिवसांनी साधारण तीनशे लीटर दशपर्णी अर्क ठिबकसिंचनाद्वारे. दर दहा दिवसांनी जीवामृताची फवारणी करतात.

ग्राहक आणि दरही निश्चित

 • दर महिन्याला एकूण मिळून सुमारे १०० किलो उत्पादन
 • शेवगाव हे तालुक्याचे ठिकाण वीर बंधूंच्या शेतापासून काही किलोमीटरवरच आहे.
 • त्यामुळे ते उत्पादित करीत असलेला शेतमाल सेंद्रिय असल्याची खात्री इथल्या ग्राहकांना झाली आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहक निश्चित आहेत. त्यांची संख्या सुमारे ५० ते ६०.
 • अनेक ग्राहक थेट शेतातून खरेदी करतात.
 • मोबाईलवरून मागणी नोंदवल्यास घरपोच भाजीपाला दिला जातो.
 • वर्षाला निश्‍चित केलेले दर- (त्यात फारसा फरक होत नाही.)
 • फळभाज्या- प्रति किलो ६० रुपये.
 • पालेभाज्या- प्रति जुडी- १० ते १५ रुपये
 • वर्षभरात उत्पादन खर्च जाऊन विक्रीच्या सुमारे पंचवीस टक्के नफा
 • त्यातून आर्थिक प्रगतीला साह्य झाले आहे.

कुटुंबाच्या मदतीने मजूरटंचाईवर मात
इतरांप्रमाणे वीर यांनाही अलीकडील काळात सातत्याने मजूरटंचाई जाणवते. मात्र दोघे बंधू, आई साखरबाई व वडील पंढरीनाथ असे सर्वजण मिळून शेतीत काम करतात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी केले आहे. दोन कायमस्वरूपी मजूरही आहेत. येत्या काळात तीन एकरांवर आंबा, सीताफळ, मोसंबी, शेवगा व पपई आदींचीही लागवड करण्याचे नियोजन आहे.

लॉकडाऊनमध्ये नुकसान टळले
कोरोना संकटाच्या काळात शेतमाल विक्रीचा मोठा प्रश्न तयार झाला. अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. वीर बंधूंनी मात्र आपले ग्राहक तयार केलेले असल्याने या काळात आपले नुकसान टाळणे त्यांना शक्य झाले. दरांमध्येही त्यांनी फरक केला नाही.

दुष्काळात शेततळ्याने तारले
दोन वर्षांपूर्वी तीन लाख रुपये खर्च करून २५ गुंठे क्षेत्रात शेततळे उभारले आहे. त्यासाठी कृषी विभागाची मदत झाली. या भागात सिंचनाचा अभाव असल्याने सातत्याने पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागते. भाजीपाला लागवड सुरू केली त्यावर्षी पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र शेततळ्यातील पाण्यामुळे ही शेती वाचवता आली. विहिरीतून पाण्याची काही प्रमाणात उपलब्धता होते.
 
प्रतिक्रिया

सेंद्रिय किंवा नैसर्गिक भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. अशा प्रकारचे उत्पादन शेतकऱ्यांना तारू शकते. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. शेतीत परवडत नाही असे म्हणणाऱ्या तरुणांनी भाजीपाला उत्पादनासोबत विक्रीचेही व्यवस्थापन केल्यास नक्कीच यशस्वी होता येते.
संपर्क- संतोष वीर- ९८२२६६९७६२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...
प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवननव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची...
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...