agriculture story in marathi, Nanded Research Center is dedicated to work on technologies for cotton crop. | Agrowon

नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू कपाशीला वरदान

कृष्णा जोमेगावकर
मंगळवार, 13 जुलै 2021

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी, सरळ व संकरित अशा विविध वाणांवर संशोधन झाले आहे. एनएच ४४ हा केंद्रातर्फे प्रसारित वाण देशात लोकप्रिय ठरला. 

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी, सरळ व संकरित अशा विविध वाणांवर संशोधन झाले आहे. एनएच ४४ हा केंद्रातर्फे प्रसारित वाण देशात लोकप्रिय ठरला. कोडवाहू भागाला केंद्रस्थानी ठेवून लागवड पद्धती, पीक संरक्षण, मूलस्थानी जलसंधारणाच्या अनुषंगानेही विविध प्रयोग व शिफारशी देण्यात आल्या आहेत. त्यातून पीक उत्पादन व गुणवत्तावाढ साधण्यात येत आहे.

राज्यात कापसाखालील प्रमुख क्षेत्र मराठवाडा व विदर्भात आहे. दोन्ही विभागांतील परिस्थिती प्रामुख्याने कोरडवाहू आहे. राज्यात कापूस पिकाच्या संशोधनासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राची स्थापना सन १९४१ मध्ये हैदराबाद संस्थानाचे तत्कालीन निझाम यांनी नांदेड येथे केली. अखिल भारतीय कापूस सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार राज्यासाठीचे कापूस संशोधनाचे ते प्रमुख केंद्र झाले. आधुनिक यंत्रमागाच्या गरजेनुसार अमेरिकन कापूस वाणाच्या लागवडीसाठी ब्रिटिश काळापासून चालना देण्यात आली. त्यादृष्टीने नवे वाण विकसित करण्यावर भर देण्यात आला.

संशोधन केंद्रातील कार्ये
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आज नांदेड कापूस संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे. विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात केंद्र ८० वर्षे पूर्ण करीत आहे. कोरडवाहू वा जिरायती भाग केंद्रस्थानी ठेवून अधिक उत्पादकता, धाग्याचे सरस गुणधर्म, कीड-रोगांना सहनशील असे नामवंत वाण येथून विकसित झाले. केंद्रप्रमुख म्हणून डॉ. खिजर बेग (कापूस विशेषज्ञ) तर ‘ॲग्रॉनॉमीस्ट’ अरविंद पांडागळे येथे कार्यरत आहेत.

२२ वाण विकसित
केंद्राद्वारे आजपर्यंत कपाशीचे सरळ व संकरित मिळून २२ वाण प्रसारित झाले आहेत. त्यातील प्रमुख- एनएचएच १ (गोदावरी), एनए ४८, एनएचएच ४४, एनएचएच १२, एनएच २३९ (पूर्णिमा), एनएचएच ३०२, एनएच ४५२ (रेणुका), एनएच ५४५, एनएच ६१५ (अनुसया), एनएचएच २०६, एनएच ६३५, एनएचएच २५० व एनएचएच ७१५.

एनएचएच ४४
अमेरिकन कपाशीचा एनएच ४४ हा वाण सर्वत्र लोकप्रिय झाला. सन १९९५ ते २००० या काळात देशात सर्वाधिक क्षेत्रावर लागवड झालेला हा ऐतिहासिक वाण म्हणता येईल. तो रसशोषक किडींना सहनशील असून, धाग्याची लांबी मध्यम आहे. पुनर्बहरक्षमता या गुणधर्मामुळे तो कोरडवाहू तसेच बागायती शेतकऱ्यांच्याही पसंतीस उतरला.

एनएच ६१५
६१५ (अनुसया) हा अमेरिकन कपाशीचा सरळ वाण रस शोषक किडींना सहनशील व तसेच सेंद्रिय शेती व सघन लागवडीसाठी उपयुक्त ठरत आहे. त्याची हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादकता आहे. सघनसाठी ६० बाय १० सेंमी. अशी शिफारस असून एकरी एक लाख ६६ हजार झाडे बसतात.

एनएचएच ४४ बीटी
मागील दशकांपासून बीटी कापूस वाणांचा वापर वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर एनएचएच ४४ या संकरित वाणात बीजी टू तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्राद्वारे विकसीत करण्यात आलेला एनएचएच ४४ बीटी हा राज्यातील पहिलाच बीटी वाण ठरला. एनएचएच २५० व एनएचएच ७१५ या नॉनबीटी संकरित वाणांची कोरडवाहू स्थितीत हेक्टरी १४ ते १८ क्विंटल उत्पादकता आहे. बीटी वाणांसाठी १२० बाय ४५ सेंमी तर नॉनबीटी वाणांसाठी ९० बाय ६० सेंमी. असे लागवडीचे अंतर शिफारशीत करण्यात आले आहे.

अन्य तंत्रज्ञान
वाणांच्या संशोधनाव्यतिरिक्त केंद्रामध्ये लागवड पद्धतीच्या अनुषंगाने विविध प्रयोग सुरू
आहेत. यात लागवडीचे अंतर, आंतरपीक वा साखळी पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, तणनियंत्रण, मूलस्थानी जलसंवर्धन, सघन लागवड आदींचा समावेश आहे. बीटी कपाशीची लागवड राज्यात सुरू झाल्यानंतर लागवड तंत्रज्ञानाबाबत शिफारशी देण्यामध्ये हे केंद्र आघाडीवर होते.

बोंड अळीचे नियंत्रण
बीटी कापूस पूर्व काळात बोंड अळ्यांचा एकात्मिक कीड नियंत्रणाचे कमी खर्चातील परिणामकारक आष्टा मॉडेल याच संशोधन केंद्राद्वारे राबविण्यात आले. भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत त्याचा देशात प्रसार झाला. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याबाबतचे संकेतही २०१६ मध्ये केंद्राद्वारे देण्यात येऊन उपायही सुचविण्यात आले.

चालू संशोधन
बीटी कापसाच्या बियाण्यावरील खर्च कमी करण्यासाठी सरळ वाण विकसित करण्याचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. एनएचएच ४४ बीटी वाणानंतर नूतन प्रसारित एनएचएच २५० व एनएचएच ७१५ या संकरित वाणांमध्ये बीजी टू तंत्रज्ञान वापरण्याचे संशोधन सुरू आहे. लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे कंपनीमार्फत हे वाण उपलब्ध केले जाईल.

कपाशीची वाढ सीमित ठेवून झाडांची संख्या वाढविल्यास उत्पादकतेत वृद्धी करणे (सघन लागवड), रुंद वरंबा-सरी पद्धतीने लागवड, सेंद्रिय व्यवस्थापन पद्धती, संप्रेरकांचा वापर आदींच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यांत्रिक पद्धतीने लागवड करून उत्पादन खर्च कमी करण्याचे प्रयोग सुरू आहेत.

विस्तार कार्य
पीक संरक्षण, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे, प्रशिक्षण- विस्तार यातही केंद्राद्वारे काम सुरू आहे. सोशल मीडिया, दूरध्वनी संदेश, मोबाईल कॉल आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात येतात. केंद्राच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांना ५ ते २५ टक्के उत्पादन वाढ मिळाली आहे. बदलत्या हवामानानुसार गरजेनुरूप होणाऱ्या संशोधनातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.
 
संपर्क- डॉ. खिजर बेग (कापूस विशेषज्ञ) - ७३०४१२७८१०
अरविंद पांडागळे - ७५८८८१७१३


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...