agriculture story in marathi, Narvad village of Sangli Dist. is famous for betel leaf farming. | Agrowon

नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरा

अभिजित डाके
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

सांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी म्हणजेच पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या ग्रामस्थांनी पिढीजात लागवडीची परंपरा अनेक आव्हानांचा सामना करून आजही जपली आहे.
 

सांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी म्हणजेच पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या ग्रामस्थांनी पिढीजात लागवडीची परंपरा अनेक आव्हानांचा सामना करून आजही जपली आहे. खाऊच्या पानांना वर्षभर मागणी असून इथल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणात या पिकाने महत्त्वाचे योगदान दिले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर सांगली जिल्ह्यातील सुमारे सात हजार लोकसंख्या असलेले नरवाड गाव (ता. मिरज) आहे. पूर्वी त्याची दुष्काळी गाव म्हणून ओळख होती. सन १९७२ च्या दुष्काळात अनेक संकटांशी सामना करावा लागला. त्या वेळी गावाला धडक योजनेचे पाणी मिळायचे. त्यामुळे थोडी फार शेती बागायती होती. त्यावर ऊस, पानमळे फुलायचे. पण पाण्याचे दुर्भिक्ष आणि पाण्यासाठी भ्रमंती ठरलेलीच होती.

पानमळ्याचा वारसा
नरवाडचे बहुतांशी अर्थकारण पानमळ्यावरच चालते. आरग आणि बेडग गावातही हे मळे दिसतात. सन २००० मध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाली. त्याचा लाभ नरवाड गावाला होऊन शेती सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत झाली. दहा- पंधरा वर्षा्त ग्रामस्थांचा द्राक्षशेतीकडे कल वाढला. पूर्वी एका पानमळ्यातून सात ते आठ वर्षांपर्यंत उत्पादन घेतले जायचे. आता दोन ते चार वर्षांत पानवेली काढून टाकाव्या लागत आहेत. तरीही शेतकऱ्यांनी हे पीक घेणे थांबविलेले नाही.

शेतकऱ्यांचे अनुभव
गावातील भाऊसो नागरगोजे सांगतात, की १९९७ पूर्वी परिसरातील गावातील पानांची विक्री मुंबई येथील सौद्यात व्हायची. दोन हजारांहून अधिक डाग मिरजेहून रेल्वेने मुंबईला जायचे. परिसरात बाजार वाढले. तिथेच सौदे होऊ लागले. आज बाजारात पानांची मागणी, सौद्यात होणारी आवक होते त्यावर दर, अर्थकारण अवलंबून असते. सन २०१८ मध्ये आठवड्याला चांगली कमाई व्हायची. पण गेल्या दोन वर्षांत पानमळा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना खिशातील पैसे गुंतवावे लागत आहेत. आठ ते नऊ महिन्यांपासून नरवाड येथेही पानांचा सौदा सुरू झाला आहे.

बेडगला खुले सौदे
खाऊचे पान हा नाशीवंत माल असल्याने बाजारपेठेत वेळेत पोहोचविण्यासाठी काळजी घ्यावी लागते. अन्यथा मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी बेडग गावातील काहींनी पुढाकार घेत १९९७ मध्ये गावातच पानांचे खुले सौदे सुरु केले. साहजिकच आरग, नरवाड गावातील शेतकऱ्यांनाही जवळची, हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. खुले सौदे असल्याने दरांची त्वरित माहिती मिळू लागली. पैसेही लवकर हाती येऊ लागले.

बाजारपेठ
गेल्या सहा- सात महिन्यांपर्यंत कोरोना संकटामुळे बाजारपेठा बंद होत्या. आता खुल्या झाल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या प्रति डागास सरासरी १२०० ते १३०० रुपये दर मिळतो आहे. दोन वर्षांत तो ५०० ते ८०० रुपयांपर्यंत मिळाला. बाजारातील मागणीनुसार पानांची सातत्याने काढणी सुरू असते. व्यापारी व शेतकरीही एकमेकांच्या संपर्कात असल्याने कोणत्या सणाला किती मागणी व दर राहील याचा अंदाज येतो. शेतकरी त्या पद्धतीने नियोजन करतात.

नरवाड भागातील पानमळा शेती (ठळक बाबी)

 • पानमळा क्षेत्र- सरासरी १२५ एकर
 • नवी लागवड एक ते २५ जूनपर्यंत. लागवड १० गुंठ्यांपासून ते दोन एकरांपर्यंत.
 • जानेवारीच्या दरम्यान वेलींची उतरण.
 • मार्चपासून उतरण केलेल्या वेलींच्या पानांचा खुडा सुरू. तो वर्षभर चालतो.
 • रासायनिक खतांचा वापर कमी. त्याऐवजी वर्षातून दोन वेळा शेणखत किंवा लेंडी खत, निंबोळी पेंड यांचा वापर.

 गुणवत्ता व विक्री व्यवस्था

 • पानांना वर्षभर मागणी. बेंदूर, नागपंचमी, गणपती, दसरा, दिवाळी आणि लग्न समारंभ या काळात ती अधिक.
 • एका डप्पात तीन हजार पाने तर एका डागात १२ हजार पाने.
 • महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटकात एसटी, रेल्वे, खासगी ट्रॅव्हल्सने पाने पाठवली जातात.
 • कळी आणि फाफडा असे पानांचे दोन प्रकार.
 • दर- प्रति डाग- कळी- १२०० रुपये, फाफडा- दोन हजार रु.
 • प्रति दिन सरासरी १५०० डप्पा विक्री.
 • बेडग आणि नरवाड गावांत होतात सौदे

प्रतिक्रिया
नागवेली आमची आईच आहे. तिची आमच्यावर नेहमी कृपादृष्टी असते.
मी रोपांचीही विक्री करतो.

-हरी नागरगोजे, ८८३००५५३४२
 
अलीकडील वर्षांत मूळकुजव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यातूनही पानमळ्याची जोपासना केली आहे. वर्षातून दोन ते तीन बाजार चांगले मिळतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून समाधानी आहे.
-भीम नागरगोजे, ८३२९३०१६३९
 
रोगांच्या प्रादुर्भावासाठी तज्ज्ञांचे सल्ले वेळेवर मिळणे अपेक्षित आहे. पूर्वी कसबे डिग्रज येथे पानमळा संशोधन केंद्र होते. आता केंद्र राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे स्थलांतरित झाले आहे. ते पुन्हा इथे आल्यास फायदा होईल.
-महेश कांबळे, ९८९०९१९२५०
 
 पाने खुडण्याची एक कला आहे. मी लहानपणीच त्यात पारंगत झालो. ही कला नव्या पिढीला देण्याची माझी धडपड आहे. तीन हजार पाने तोडल्यानंतर १०० रुपये मिळतात. दिवसभरात १२ हजार पाने खुडतो.
-तानाजी जमादार, कुशल मजूर

सन १९९७ पासून पानांचा व्यापारी आहे. पूर्वीच्या तुलनेत पानांची मागणी कमी झाली आहे. परिणामी पानमळ्यांची संख्याही घटली आहे. त्यातूनही पानमळा जिवंत ठेवण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न आहेत.
शरद पवार, स्थानिक व्यापारी


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शास्त्रीय पशुपालनातून मिळवले आर्थिक...कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले)...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...
सीताफळाने दिला शेतकऱ्यांना आधारऑगस्ट ते डिसेंबर कालावधीपर्यंत सातत्याने मागणी...
फळबागांसाठी पॅकहाउस ठरले फायदेशीरआळंदी म्हातोबा येथील प्रकाश जवळकर यांनी फळबाग...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
दर्जेदार, शास्त्रीय पद्धतीने गांडूळ...माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी...
राइसमिल’द्वारे शोधला स्वयंरोजगार,...सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील...
एकट्याने नव्हे, इतरांना घेऊन पुढे जाऊ;...एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे...
आंब्यासाठी उभारले स्वतःचे रायपनिंग चेंबररत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा...
घोळवा परिसर झाला कांद्याचे ‘क्लस्टर’हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...