agriculture story in marathi, Nilkamal Za has succeed in button mashraoom hi tech production. | Page 2 ||| Agrowon

बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँड

मुकूंद पिंगळे
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

मूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी मोठ्या संघर्षातून अळिंबी (मशरूम) उद्योगात वडाळीभोई (ता. चांदवड) येथे आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे ‘कॅम्बीअम’ नावाने मशरूम उत्पादन प्रकल्प उभारला आहे. देशभर व परदेशात त्यांनी ‘कॅम्बीअम गोल्ड’ या ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठ मिळविली आहे.

मूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी मोठ्या संघर्षातून अळिंबी (मशरूम) उद्योगात वडाळीभोई (ता. चांदवड) येथे आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे ‘कॅम्बीअम’ नावाने मशरूम उत्पादन प्रकल्प उभारला आहे. गुणवत्ता, ब्रँडिंग व मार्केटिंगच्या आधारे देशभर व परदेशात त्यांनी ‘कॅम्बीअम गोल्ड’ या ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठ मिळविली आहे.

नाशिक जिल्ह्यात वडाळीभोई (ता. चांदवड) येथे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त बटण मशरूम (अळिंबी) उत्पादनाचा प्रकल्प पाहण्यास मिळतो. मूळ जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा व्यवसाय व करिअरनिमित्त नाशिक जिल्ह्यात स्थिरस्थावर झाले आहेत. सन १९८७ मध्ये त्यांनी वनस्पतिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. प्रशासकीय सेवेच्या स्पर्धेत पुढील दोन- तीन वर्षे प्रयत्न केला. पण त्यात मनासारखे यश मिळाले नाही. दरम्यान, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात मशरूम व्यवसाय व उद्योजकांना अर्थसाह्य याबाबत माहिती मिळाली. बँकेत जाऊन चौकशी केली.

अभ्यास करून त्यात उतरायचे निश्‍चित केले. ‘इंटरनॅशनल मशरूम स्कूल’ नेदरलॅंड येथे १९९४-९५ मध्ये ‘बटण मशरूम’ उत्पादनाचे शास्त्रीय प्रशिक्षण पूर्ण केले. प्रयत्नांती एका बहुराष्ट्रीय कंपनीला मशरूम तयार करून देण्यासंबंधी संधी मिळाली. सन २००७ पर्यंत कामांचा अनुभव गाठीशी आला. अन्य व्यावसायिकांसोबत काम करताना फसवणुकीचा अनुभवही आला. अखेर स्वतःचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचा संकल्प जिद्द व चिकाटीतून सिद्धीस नेला.

कष्टातून उमटल्या यशाच्या उमटल्या पाऊलखुणा...
सन २००७ नंतरही तीन वर्षे मोठा संघर्ष वाट्याला आला. वडाळीभोई (ता. चांदवड) येथे २०१० मध्ये १५ एकर कोरडवाहू क्षेत्र घेतले. येथे मशरूम उत्पादन प्रकल्प उभारणी करायची होती. पण भांडवलाची अडचण पाठ सोडायला तयार नव्हती. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करताना अखेर राष्ट्रीयीकृत बँकेने अर्थसाह्य दिले. त्यातून आधुनिक पद्धतीने मशरूम उत्पादन प्रकल्प उभारणी केली. व्यावसायिक धोरण आखल्याने ‘रोजगाराची संधी शोधणारा’ ते आज अनेकांना रोजगार देणारा म्हणून नीलकमल ओळखले जात आहेत.

दर्जेदार बियाणे
आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे बटण मशरूम उत्पादन घेणे हा ध्यास होता. त्यानुसार परदेशातून मातृबीज (मदर कल्चर) आयात केले. वाढ व गुणन होण्यासाठी रोहतक (हरियाना) येथील कृषी विद्यापीठाला उपलब्ध केले. स्वप्रकल्पातही गुणन केले जाते. गरजेनुसार महिन्याला परदेशातून स्पॉन (बियाणे) मागविण्यात येते. अधिक पोषण मूल्य व दर्जा या निकषांवर भर असतो.

उत्पादन क्षमतेत वाढ
२०१४ मध्ये उत्पादन सुरू झाले तेव्हा ८ उत्पादन कक्ष (ग्रोईगं रूम) कार्यान्वित होते. त्या वेळी प्रति दिन २.५ टन उत्पादन क्षमता होती. आज १६ कक्ष असून, प्रति कक्ष दोन्ही बाजूंनी ७ स्तरांचे असे एकूण १४ बेड आहेत. प्रत्येकी तीन टन तयार कंपोस्ट क्षमतेचे बेड आहेत. प्रति बेडच्या एकूण क्षमतेच्या १ टक्का म्हणजे ३० किलो स्पॉन (बीज) वापरले जाते. प्रति बेडमधून ८०० किलो असे प्रति कक्षात प्रति बॅच १२ टन उत्पादन मिळते. प्रति बॅच सुमारे ६० दिवसांची असते.

शास्त्रीय पद्धतीने उत्पादन:
उत्पादनात निर्जंतुक कंपोस्ट हा महत्त्वाचा घटक असतो. ते तयार करताना गहू भुसा वापरला जातो. पहिल्या टप्प्यात तो ओला करून (प्री-वेटिंग प्रोसेस) करून पाण्याने भिजवला जातो. त्यात पोल्ट्री खत, डी ऑइल केक, सामू संतुलित करणारे घटक व ‘रिच मिक्सर’ मिसळले जातो. यंत्राच्या साह्याने एकजिनसी करून बंकरमध्ये साठवले जातो. मिश्रणास गरम हवा देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पुढील यांत्रिक व शास्त्रीय प्रक्रियेनंतर तयार कंपोष्ट निर्जंतुकीकरण कक्षात नेऊन जिवाणूविरहित केले जाते.

मशरूम व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • प्रति कक्ष आकार ६५ बाय २० फूट, उंची २२ फूट.
  • प्रतिदिन उत्पादन क्षमता- ५ टन
  • उपलब्ध मनुष्यबळ- ६५
  • वार्षिक उत्पादन १८०० टन.
  • तापमान नियंत्रणासाठी ‘एअर हॅंडलिंग’ यंत्रणा, १५० अश्‍वशक्तीचे काँप्रेसर
  • काढणीपश्‍चात मशरूम संकलित करण्यासाठी स्वतंत्र शीतगृह
  • हाताळणी, प्रतवारी व पॅकेजिंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा व कक्ष
  • आपत्कालीन जनरेटर संच
  • मशरूम बाजारात पोहोचविण्यासाठी वातानुकूलित वाहन

विक्री व्यवस्था
बाजारपेठेत मशरूमची मागणी अभ्यासून गुणवत्ता जपली आहे. काढणीपश्‍चात हाताळणी, प्रतवारी व ‘ब्रॅंडिंग’ याकडे मुख्य दिले जाते. त्यामुळेच नाशिक, इंदोर, भोपाळ, कल्याण, डोंबिवली, मुंबई, बंगळूर या शहरांत बाजारपेठ मिळवली आहे. शिवाय सिंगापूर, मलेशियामध्ये वितरक जोडून वितरण साखळी उभी केली आहे. बिगबास्केट, नेचरबास्केट, ॲमेझॉन याद्वारेही विक्री व्यवस्था जोडली आहे. प्रति किलोस १३० ते १३५ रुपये अशी मशरूमची किंमत आहे.

‘कॅम्बिअम गोल्ड’ ब्रॅण्ड
‘कॅम्बीअम गोल्ड’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. सर्व प्रक्रिया यांत्रिकीकरणाद्वारे स्वयंचलित होत असल्याने काम सुलभ केले आहे. पर्यावरणपूरक बाबींचा विचार करून ५३ मायक्रॉनच्या प्लॅस्टिक बॉक्समध्ये २०० ग्रॅम वजनात पॅकिंग होते. प्रक्रियेतून उपपदार्थ म्हणून चार हजार टन मशरूम खत मिळते. दोन रुपये प्रति किलो दराप्रमाणे विक्री होते. नाशिक भागातील शेतकऱ्यांकडून त्यास मोठी मागणी असते.

प्रशिक्षण व जागृती
नीलकमल सांगतात, की आमच्या गुणवत्तापूर्ण मशरूमला सर्वत्र मागणी वाढती आहे.
प्रक्रियेत नव्या संधीही आहेत. त्या दृष्टीने शेतकरी व तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र व मशरूमचा आहारात वापर वाढण्यासाठी जागृती करणार आहे.

संपर्क- नीलकमल झा, ८१०८३२१११७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...
शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोडपुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या...
सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन्...पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा...
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा...कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप...
नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरासांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी...
एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी...नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात...
मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची...उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
वडजीत फुलतात वर्षभर गुलाबाचे मळेसोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी...
रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभारगळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक...
`चॉकी सेंटर’ सुरू करून गुणवत्तापूर्ण...परिसरातील रेशीम शेतकऱ्यांची गरज ओळखून वाकी...
संघर्षमय आयुष्यात मोगऱ्याच्या सुगंधाचा...नाशिक जिल्ह्यात पेठ या आदिवासी तालुक्यातील आड...
संघर्षमय वाटचालीतून शेतीत उभारले वैभवपरभणी जिल्ह्यातील मरसुळ येथील देवराव शिंदे यांनी...
वाशीमच्या शेतकऱ्यांनी उभारली बांधावरची...वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील जयकिसान शेतकरी...
पर्यावरणपूरक तंत्रे देणारे वर्ध्याचे...दत्तपूर (वर्धा) येथे ग्रामोपयोगी विज्ञान...
कापडणीसांचे एक्स्पोर्ट क्वालिटी’चे भारी...नाशिक जिल्ह्यातील आसखेडा येथील अमृत कापडणीस यांनी...
बायोगॅसपासून वीज अन्‌ प्रॉम खतनिर्मितीबारामती येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स, डेअरी‘मध्ये...
बचत गटाने उभारली भाजीपाला रोपवाटिकाशिक्रापूर-राऊतवाडी (ता. शिरूर,जि.पुणे) येथील...