गोल्डन भात मुखात कधी पडणार?

अ जीवनसत्त्वाने भरपूर असलेला गोल्डन भाताचा विकास होऊनही अन्य कारणांमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकला नाही.
अ जीवनसत्त्वाने भरपूर असलेला गोल्डन भाताचा विकास होऊनही अन्य कारणांमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकला नाही.

एखादे तंत्रज्ञान विकसित होणे आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर होणे, यातील अंतर कमी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत ग्लेन डेव्हिस स्टोन व सहकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाने भरपूर असलेल्या जीएम भात जातीचा (गोल्डन राईस) विकास आणि लागवड होऊन गरीब व अ जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या मुलांचे मुख यातील अंतर प्रदीर्घ (सुमारे ३० वर्षे) असल्याचे आपल्या सर्वेक्षण अभ्यासातून पुढे आणले आहे.   जनुकीय सुधारीत पिकांमुळे केवळ उत्पादनातील वाढच नव्हे, तर त्याची गुणवत्ताही वाढवणे शक्य आहे. जीवनसत्त्व ‘अ’ चे प्रमाण अधिक असलेला जनुकीय सुधारीत गोल्डन भात हा माणूस आणि प्राण्यांच्या आहारासाठी सुरक्षित असून, तसा परवाना फिलिपिन्स येथील नियंत्रकांनी नुकताच दिला. ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या गरिबीच्या विळख्यातील भागांमध्ये या बीटा कॅरेटिनयुक्त भाताचा खूप उपयोग होऊ शकतो. मात्र, लागवडीतील अन्य अडचणींच्या झालेल्या एका अभ्यासामध्ये अ जीवनसत्त्वाच्या कमतरता असलेल्या कुटुंबांना गोल्डन भाताची लागवड करणे शक्य नाही आणि व्यावसायिक भात शेती करणारे शेतकरी त्याची लागवड करू इच्छित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या या संशोधनाविषयी माहिती देताना सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र आणि पर्यावण शास्त्राचे प्रोफेसर ग्लेन डेव्हिस स्टोन यांनी सांगितले, की अनेक कुटूंबातील मुलांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते. मात्र अडचणीचा मुद्दा असा आहे, की त्यातील अनेकांकडे भात लागवडीसाठी अजिबात शेती नाही. पर्वतीय प्रदेशातील अनेक कुटूंबेही त्याची लागवड करत नाहीत, कारण ही जात सखल भागातील आयआर-६४ आणि आरएससी-८२ या जातीच्या संकरातून तयार करण्यात आली आहे. पोषकतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या गोल्डन भात जातींच्या विकासामध्ये कार्यरत संशोधकांच्या दृष्टीने त्याला परवाना मिळणे ही बाब मैलाचा दगड ठरली आहे. विकसनशील देशांमधील अशा प्रकारची ही पहिली मान्यता आहे. हा भात विकसित होऊनही तीन दशके होत आली आहेत. मात्र, विविध अडचणींमुळे प्रत्यक्ष लाभार्थी ठरणाऱ्या गरीब कुटुंबांपर्यंत तो पोचू शकला नसल्याचे स्टोन यांनी सांगितले.

  • व्यावसायिक पद्धतीने विक्री करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र, त्याच्या लागवडीसाठी योग्य तितक्या प्रमाणात बियाणांचे उत्पादन करावे लागेल. त्यानंतरही सामान्य किंवा ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या बालकांच्या मुखामध्ये हा भात पोचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागतील, असा दावा स्टोन करतात.
  • स्टोन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त तज्ज्ञ असून, त्यांचा कृषी क्षेत्रातील जागतिक कल आणि त्यातील मानवी बाजू यांचा अभ्यास आहे. जीएम किंवा जनुकीय सुधारीत पिकांबाबत मानवतेच्या दृष्टिकोनांतून मुक्तपणे पाहण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. २०१३ पासून ते फिलिपिन्समध्ये टेंपल्टन फौंडेशन मार्फत भातावरील संशोधन प्रकल्प राबवत आहेत.
  • स्टोन आणि त्यांचे सहकारी डॉमिनिक ग्लोव्हर (भात शास्त्रज्ञ, ससेक्स विद्यापीठ) यांनी त्यांनी नुकत्याच पूर्ण केलेल्या या अभ्यासामध्ये त्यांनी फिलिपिन्स येथील भाताचे कोठार मानल्या जाणाऱ्या न्युईवा इसिजा भागामध्ये सर्वेक्षणासोबत ११५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. अभ्यासाचे हे निष्कर्ष ‘टेक्नॉलॉजी इन सोसायटी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • ग्लोव्हर यांनी सांगितले, की गोल्डन भाताच्या पाठिराख्यांमध्ये काही अर्थशास्त्रज्ञही आहे. त्यांनी या भाताच्या आरोग्यावरील परिणामांचा अभ्यास केला आहे. या पिकांच्या लागवडीसंदर्भातील शेतकऱ्यांच्या समज आणि इच्छा यांचाही विचार करावा लागणार आहे.
  • फिलिपिन्स अन्य पारंपरिक पोषकता कार्यक्रमाद्वारे लहान मुलांतील अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण अर्ध्यापर्यंत आणण्यात यशस्वी झाला आहे. जर सन २०२२ पर्यंत फिलिपिन्स बाजारपेठेत गोल्डन भात आला तर या भाताच्या विकासानंतर सुमारे ३० वर्षाने तो उपलब्ध होईल. ज्या लक्ष्य असलेल्या लोकांपर्यंत तो पोचला पाहिजे, ती बाब आणखी दूर असेल.
  • आपण सामान्यतः २००२ मध्ये गोल्डन भात खाण्यासाठी तयार झाल्याचे म्हणतो, ते मूर्खपणाचे आहे. अगदी २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेच्या (IRRI) अहवालानुसार, आशियासाठी योग्य ठरतील अशा भातजातींमध्ये त्याचे यशस्वी रूपांतरण व्हायचे असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीय नियामकांकडून परवानगी मिळणे आणि प्रत्यक्षामध्ये त्याची लागवड होऊन ज्यांच्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे, अशा समुदायांमध्ये त्याचा वापर होऊन सुधारणा होणे, ही किती दूरची गोष्ट आहे. - स्टोन आणि ग्लोव्हर. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com