Agriculture story in marathi nutrient management in onion crop | Agrowon

उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन

डॉ. पी. ए. साबळे, सुषमा सोनपुरे
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यांत दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.
 
कांदा पिकाचे खरीप, रांगडा तसेच रब्बी (उन्हाळी) असे प्रकार आहेत. रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली जाते. एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः ८-१० किलो बियांची रोपवाटिका पुरेशी होते. रोपे ८-९ आठवड्यांची झाल्यानंतर त्यांची १५x१० सेंमी अंतरावर पुनर्लागवड करतात.

कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यांत दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.
 
कांदा पिकाचे खरीप, रांगडा तसेच रब्बी (उन्हाळी) असे प्रकार आहेत. रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली जाते. एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः ८-१० किलो बियांची रोपवाटिका पुरेशी होते. रोपे ८-९ आठवड्यांची झाल्यानंतर त्यांची १५x१० सेंमी अंतरावर पुनर्लागवड करतात.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे कांद्याची साठवण क्षमता वाढते.
  • रब्बी कांद्यासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रतिहेक्टर द्यावे. अर्धे नत्र (५० किलो - युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावा. उर्वरित (नत्र ५० किलो - युरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि दीड महिन्याने समान हप्त्याने द्यावा.
  • नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यांत दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पूर्ण पोसल्यानंतर मात्र नत्राची आवश्यकता नसते. अशा वेळी नत्र दिल्यास डेंगळे येणे, जोड कांदे येणे, कांदा साठवणुकीत सडणे हे प्रकार होतात.
  • पिकांच्या मुळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते.
  • जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर असले, तरी पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी आहे. पालाश कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी आवश्यक असतो.
  • याव्यतिरिक्त रब्बी हंगाम कांदा पुनर्लागवडीपूर्वी १५ दिवस आधी गंधक हेक्टरी ४५ किलो या प्रमाणात द्यावे.
  • खते देण्यापूर्वी माती परीक्षण करून, त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या साह्याने खताची मात्रा ठरवावी. कांदा पिकास शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या ६० दिवसांनंतर नत्र दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते, मान जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते. साठवणक्षमता कमी होते.

सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज

  • कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा, निळसर पडतो.
  • जस्ताची उणीव भासल्यास पाने जाड होऊन खालच्या अंगाने वाकतात. अशी लक्षणे दिसताच शिफारशीत खताच्या मात्रेबरोबर झिंक सल्फेट १ ग्रॅम, मॅंगनीज सल्फेट १ ग्रॅम, फेरस सल्फेट २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • कांदा पुनर्लागवडीपासून १५, ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य मिश्रखताची ५ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पुनर्लागवडीपासून ६०, ७५ आणि ९० दिवसांनी १३:००:४५ (पोटॅशिअम नायट्रेट) ५ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होते व जादा उत्पादन मिळते.

तण व्यवस्थापन
कांदा पिकाची घनता तीव्र असते. तसेच, पिकाची मूळ उथळ असतात. त्यामुळे पीक-तण स्पर्धा कालावधी लागवडीपासून ४५ दिवसांपर्यंत अधिक असतो. या कालावधीमध्ये तणांचे नियंत्रण काळजीपूर्वक करावे. खुरपणीसाठी मजुराची उपलब्ध नसल्यास कांद्यामध्ये ४५-६० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटू शकते. या काळामध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन करावे.

डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२
(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के. व्ही. के., सरदारकृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, खेडब्राह्मा, गुजरात.) 


इतर फळभाज्या
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी...शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असून, शेवगा...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे विविध किडींचा...
बटाटा साठवणुकीच्या पद्धतीबटाटा पिकाची अयोग्य काढणी आणि साठवणुकीत योग्य...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात...
भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि...
खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण खरीप हंगामात कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
कोबीवरील मावा, चौकोनी ठिपक्याचा पतंगाचे...कोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून,...
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...
सुधारित तंत्राने करा बटाटा लागवडबटाटा पीक यशस्वी होण्यामध्ये जमिनीच्या...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
भाजीपाला रोपवाटिका तयार करताना...रोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...
कोरडवाहूसाठी शेवगा लागवड फायदेशीरपावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू...
भाजीपाला सल्ला वेलवर्गीय भाजीपाला : काकडी, कारली फळमाशी :...
खरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील...भाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या...
मिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेखसुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य,...