पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बार

प्रथिनयुक्त बार
प्रथिनयुक्त बार

बाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर उपलब्ध आहेत, परंतु त्यामध्ये विविध प्रकारची परिरक्षके वापरल्यामुळे या पावडरचा जास्त वापर शरीरासाठी हानीकारक असतो. शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बार अतिशय उपयुक्त आहे. 

शरीरातील सर्व अवयवांचे कार्य योग्य रितीने चालण्यासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनांचा समावेश आवश्यक आहे. मानवाच्या शरीरामधील जवळपास अर्धे प्रथिने हे स्नायुंच्या रुपात आहेत, तर राहिलेले प्रथिने हे हाडे, कार्टीलेज आणि त्वचेमध्ये असतात. प्रति १ ग्रॅम प्रथिनांपासून ४ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिने प्रामुख्याने मटण, अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ व सर्व प्रकारच्या डाळीपासून मिळतात. सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या आहारात वजनाच्या ०.८ - १ टक्क्यापर्यंत प्रथिनांचा समावेश आवश्यक आहे. वाढत्या वयातील मुले व गर्भवती स्त्रीयांना प्रथिनांची जास्त आवश्यकता असते.   प्रथिनयुक्त बार बनवण्यासाठी प्रामुख्याने रोल्ड ओट वापरतात. ओट हे ग्लुटेनरहित आहेत, तसेच त्यामध्ये योग्य प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे, अँटीआॅक्सिडंट आहेत. तसेच शेंगदाणे, काजु, बदाम, तीळ यांपासूनदेखील प्रथिनयुक्त बार बनवता येतो. प्रथिनयुक्त बार हा जंकफुडला पर्याय म्हणून वापरण्यात येऊ शकतो. बार हा तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

शेंगदाणाबटर प्रथिनयुक्त बार  याप्रकारचा बार हा सर्व वयोगटांतील व्यक्तींना आवडतो. बनवण्याची पद्धत : दूध गरम करून त्यामध्ये शेंगदाणा बटर, मध व चॉकलेट पावडर मिसळावी व ढवळत राहावे.  मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये रोल्ड ओट टाकावे व मिश्रण एकजीव करून घ्यावे, तयार मिश्रण हे बटर लावलेल्या भांड्यामध्ये एकसमान पसरून घ्यावे व पूर्णपणे थंड झाल्यावर तयार बार चौकोनी कापून घ्यावा. हा बार हवाबंद डब्यामध्ये साठवल्यास एक आठवडा खाण्यायोग्य स्थितीमध्ये राहतो. उपयोग 

  • मध्यान्ह जेवणामध्ये प्रथिनयुक्त बारचा समावेश केल्यास कुपोषणाच्या समस्येवर मात करता येते.
  • वजनाने हलके व आकाराने लहान पोषणमूल्ययुक्त बार चाकरमाने व विद्यार्थ्यामध्ये विशेष प्रिय आहेत.
  • खेळाडूसाठी ‘इंस्टंट एनर्जी’ स्त्रोत म्हणून प्रथिनयुक्त बार उपयोगात येऊ शकतात.                                             
  •  मयूरी तिपाले, ९९६०९३१९६८ (लेखक सॅम हिग्गीनबॉटम युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस, प्रयागराज येथे रिसर्च स्कॉलर आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com