Agriculture story in marathi nutrishious Protein bar | Agrowon

पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बार

मयूरी तिपाले, डॉ. आर.एन. शुक्ला
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

बाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर उपलब्ध आहेत, परंतु त्यामध्ये विविध प्रकारची परिरक्षके वापरल्यामुळे या पावडरचा जास्त वापर शरीरासाठी हानीकारक असतो. शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बार अतिशय उपयुक्त आहे. 

बाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर उपलब्ध आहेत, परंतु त्यामध्ये विविध प्रकारची परिरक्षके वापरल्यामुळे या पावडरचा जास्त वापर शरीरासाठी हानीकारक असतो. शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बार अतिशय उपयुक्त आहे. 

शरीरातील सर्व अवयवांचे कार्य योग्य रितीने चालण्यासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनांचा समावेश आवश्यक आहे. मानवाच्या शरीरामधील जवळपास अर्धे प्रथिने हे स्नायुंच्या रुपात आहेत, तर राहिलेले प्रथिने हे हाडे, कार्टीलेज आणि त्वचेमध्ये असतात. प्रति १ ग्रॅम प्रथिनांपासून ४ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिने प्रामुख्याने मटण, अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ व सर्व प्रकारच्या डाळीपासून मिळतात. सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या आहारात वजनाच्या ०.८ - १ टक्क्यापर्यंत प्रथिनांचा समावेश आवश्यक आहे. वाढत्या वयातील मुले व गर्भवती स्त्रीयांना प्रथिनांची जास्त आवश्यकता असते.  
प्रथिनयुक्त बार बनवण्यासाठी प्रामुख्याने रोल्ड ओट वापरतात. ओट हे ग्लुटेनरहित आहेत, तसेच त्यामध्ये योग्य प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे, अँटीआॅक्सिडंट आहेत. तसेच शेंगदाणे, काजु, बदाम, तीळ यांपासूनदेखील प्रथिनयुक्त बार बनवता येतो. प्रथिनयुक्त बार हा जंकफुडला पर्याय म्हणून वापरण्यात येऊ शकतो. बार हा तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

शेंगदाणाबटर प्रथिनयुक्त बार 
याप्रकारचा बार हा सर्व वयोगटांतील व्यक्तींना आवडतो.
बनवण्याची पद्धत : दूध गरम करून त्यामध्ये शेंगदाणा बटर, मध व चॉकलेट पावडर मिसळावी व ढवळत राहावे. 
मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये रोल्ड ओट टाकावे व मिश्रण एकजीव करून घ्यावे, तयार मिश्रण हे बटर लावलेल्या भांड्यामध्ये एकसमान पसरून घ्यावे व पूर्णपणे थंड झाल्यावर तयार बार चौकोनी कापून घ्यावा. हा बार हवाबंद डब्यामध्ये साठवल्यास एक आठवडा खाण्यायोग्य स्थितीमध्ये राहतो.

उपयोग 

  • मध्यान्ह जेवणामध्ये प्रथिनयुक्त बारचा समावेश केल्यास कुपोषणाच्या समस्येवर मात करता येते.
  • वजनाने हलके व आकाराने लहान पोषणमूल्ययुक्त बार चाकरमाने व विद्यार्थ्यामध्ये विशेष प्रिय आहेत.
  • खेळाडूसाठी ‘इंस्टंट एनर्जी’ स्त्रोत म्हणून प्रथिनयुक्त बार उपयोगात येऊ शकतात.                                             

 मयूरी तिपाले, ९९६०९३१९६८ (लेखक सॅम हिग्गीनबॉटम युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस, प्रयागराज येथे रिसर्च स्कॉलर आहेत.)


इतर कृषी प्रक्रिया
ड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया,...
कवठाची जॅम, जेलीकवठाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन फळापासून विविध...
पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बारबाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर...
फळे,भाजीपाला साठवणीसाठी उच्च तापमानाचा...फळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
फळांची जेली करताना...चमकदार, पारदर्शक, मऊ आणि उत्कृष्ट जेली...
आवळ्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती आपणा सर्वांना आहारात आणि आयुर्वेदात आवळ्याचे...
फळे,भाजीपाला प्रक्रियेची तत्त्वेफळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
चिकूपासून टॉफी, जॅमनिर्मितीचिकू फळापासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प),...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
डाळनिर्मितीला भारतात मोठी संधीभारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत...
काथ्या उद्योगासाठी अनुदान आणि वितरणकाथ्या उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत....
अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधीशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे...
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थकिवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व...
दुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय...खरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध...