आरोग्यदायी कडधान्य चिप्स

आरोग्यदायी कडधान्य चिप्स
आरोग्यदायी कडधान्य चिप्स

तेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने वाढले आहे. त्याला पर्याय म्हणून खाद्यप्रक्रिया उद्योगामध्ये कमी तेलातील, प्रथिन व फायबरयुक्त कडधान्य चिप्स महत्त्वाचे ठरणार आहे. ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊ भारतीयांमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण मोठे आहे. त्याचप्रमाणे भारतीय मांसाहारी लोकांच्या रोजच्या आहारामध्ये मांसाचे सेवन असतेच असे नाही. त्यामुळे त्यांच्या प्रथिनांचा मुख्य स्रोत हा कडधान्ये हाच आहे. प्रथिने ही शरीराची गरज असून, स्नायूंच्या वृद्धी व ताकदीसाठी ते उपयुक्त ठरतात. शरीराच्या प्रतिकिलो वजनामागे आपल्याला १ ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. पूर्वी कडधान्यांचे पापड, डाळ, बाडी, चकली, शेव यांचा आहारात वापर असे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये भाज्यांचे पर्याय अत्यल्प असल्याने कडधान्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य हे शहरी लोकांच्या तुलनेमध्ये दरडोई उत्पन्न कमी असूनही चांगले असे. मात्र, अलीकडे जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे आहारातील कडधान्यांचे प्रमाण कमी झाले आहे. बटाटा आणि केळीचे वेफर्स आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तळलेल्या वेफर्समध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आरोग्यासाठी जागरुक लोकांकडून त्यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांसाठी कडधान्यांचे वेफर्स उपयुक्त ठरू शकतात.

कडधान्यांचे (तूर) चिप्स ः पूर्वी पोटभरीचे खाद्य म्हणून फुटाणे आणि गूळ खाल्ले जाई. त्याचप्रमाणे कडधान्याच्या चिप्समध्ये असलेल्या तंतूमय पदार्थामुळे पोटभरीचे खाद्य म्हणून उपयोगी ठरते. त्यात अनेक चवींचे मिश्रण करणे शक्य असल्याने विविधताही भरपूर मिळते. हे चिप्स ओव्हनमध्ये कमी तेलामध्ये तयार करता येतात. प्रथिनांचे व तंतूमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असल्याने आरोग्यदायी ठरतात. कडधान्यांचे पिठामध्ये मसाल्यांचे पदार्थ उदा. काळी मिरी, अजवाईन मिसळून कणीक मळून घ्यावी. लाटून त्याचे योग्य आकार कापून घ्यावेत. यासाठी विविध क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार आकार दिल्यानंतर त्यांना वक्रताही देता येते. त्यानंतर कमी तेलामध्ये तळून किंवा बेक करून घ्यावेत. ते पापडाप्रमाणे भरून येतात. त्यावर भुकटीस्वरूपातील स्वाद टाकावेत.

मसूर क्रिस्प ः पाऊण कप मसूर पीठ, पाऊण कप मैदा, पाऊण कप रवा, एक चमचा कडीपत्ता भुकटी, एक चमचा मीठ, एक चमचा बारीक केलेली मिरी, एक कप गरम पाणी, तेल (ब्रशिंगसाठी)

पद्धत -

  • २०० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ओव्हन प्रीहिट करून घ्यावा. मसूर पीठ, मैदा व रवा एका वाटीमध्ये घेऊन, त्यात कढीपत्ता भुकटी, मीठ, काळी मिरी भुकटी मिसळून घ्यावी. त्यात पाणी मिसळून चांगली कणीस मळून घ्यावी.
  • पीठ भुरभुरलेले पृष्ठभागावर हा गोळा २ मिनिटांसाठी मुरू द्यावा. त्याचे सम आकारात गोळे करून घ्यावेत.
  • गोळ्यावर तेलाचा ब्रश फिरवून घ्यावा. पीठ भुरभुरलेल्या पृष्ठभागावर गोळा घेऊन, त्याचे लाटून १४ बाय ७.५ इंच आकाराच्या कापण्या बनवून घ्याव्यात. पिझ्झा कटर किंवा धारदार चाकूच्या साह्याने १४ इंच लांबीचे पाच भाग बनवावेत. या पट्ट्या बेकिंग शीटवर घेऊन त्यावर हलक्या हाताने तेलाचे ब्रशींग करावे. त्यावर मीठ भुरभुरावे. तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत १० मिनिटांसाठी बेक करून घ्यावेत. त्यानंतर थंड करण्यासाठी रॅकवर ठेवावेत. ही प्रक्रिया अन्य गोळ्यासाठी करावी. हे कुरकुरे रात्रभर हवाबंद कंटेनरमध्ये साठवावते. त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हनमध्ये २०० अंश सेल्सिअस तापमानावर कुरकुरीत करून घ्यावेत.
  • अमेरिकेतही कडधान्य चिप्स अमेरिकेमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा कुरकुरीत जंक फूडचे सेवन व्यसनाप्रमाणे केले जाते. त्याला पर्याय म्हणून ही प्रथिनयुक्त चिप्स पुढे येत आहेत. कडधान्यांना त्यांची विशिष्ट अशी चव असून, त्यापासून विविध पदार्थ तयार करता येतात. प्रथिनांबरोबरच तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे (कडधान्यांच्या प्रकारानुसार, विशेषतः ब जीवनसत्त्व), अॅण्टी ऑक्सिडेण्टस मिळतात. अमेरिकन बाजारपेठेमध्ये उपलब्ध कडधान्य चिप्सचे पॅकेट.

    (लेखक लुधियाना येथील सीफेट संस्थेचे माची संचालक अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com