Agriculture story in marathi, nutritious value of Amaranth for health | Agrowon

राजगिरा ः मुबलक पोषकद्रव्यांचा स्रोत

डॉ. अमोल खापरे, एकनाथ शिंदे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विविध प्रकारचे अन्नपदार्थं तयार केले जातात व ग्राहकांकडूनसुद्धा त्या पदार्थांना भरपूर मागणी असते. पदार्थनिर्मिती करीत असताना त्यातील पोषकमूल्यांकडे दुर्लक्ष केले जाते. बेकरी पदार्थ, नुडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करण्यासाठी गहू किंवा तांदूळ पिठाचा वापर केला जातो. पोषणमूल्याचा विचार करता गहू व तांदूळ या धान्यामध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण अतिशय कमी असून त्यांपासून तयार केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थंसुद्धा नेहमीच्या सेवनासाठी पोषक नाहीत.

अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विविध प्रकारचे अन्नपदार्थं तयार केले जातात व ग्राहकांकडूनसुद्धा त्या पदार्थांना भरपूर मागणी असते. पदार्थनिर्मिती करीत असताना त्यातील पोषकमूल्यांकडे दुर्लक्ष केले जाते. बेकरी पदार्थ, नुडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करण्यासाठी गहू किंवा तांदूळ पिठाचा वापर केला जातो. पोषणमूल्याचा विचार करता गहू व तांदूळ या धान्यामध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण अतिशय कमी असून त्यांपासून तयार केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थंसुद्धा नेहमीच्या सेवनासाठी पोषक नाहीत.
“प्स्युडो कडधान्ये” हा एक धान्यपिकांमधील दुर्लक्षित परंतु अतिशय पोषक प्रकार आहे. प्स्युडो कडधान्य संवर्गामध्ये प्रामुख्याने राजगिरा, किनवा, बकव्हीट/कुट्टू आणि चिया इ. धान्यांचा समावेश होतो. प्स्युडो कडधान्यांमधील प्रथिने, तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे व खनिजे इ. चे प्रमाण नेहमीच्या वापरातील गहू किंवा तांदूळ धान्यांपेक्षा भरपूर प्रमाणात आहे. गव्हामधील ‘ग्लुटेन’ या प्रथिनामुळे काही लोकांना ‘सिलीयाक’ हा आजार होतो. प्स्युडो कडधान्यांमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे ही धान्ये सिलीयाक रुग्णांसाठी सुरक्षित आहेत.

राजगिरा
राजगिरा धान्याची लागवड प्रामुख्याने भारत, चीन, अमेरिका इ. देशांमध्ये केली जाते. राजगिरा किंवा अॅमरंथ धान्य हे कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजे राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. जीवनसत्त्वे ‘ब-६’ आणि ‘ई’ सुद्धा राजगिऱ्यात आहेत. पचनास हलका असल्याने केवळ उपवासालाच नव्हे तर सर्वांनी विशेषत: वयस्कर लोकांनी राजगिरा रोजच्या आहारात आवश्य घ्यावा. राजगिऱ्यापासून लाह्या, लाडू, डोसे, उपमा इ. घरगुती पदार्थ तयार केले जातात. बाजारातील अन्नपदार्थ जसे की, बेकरी, नुडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करताना त्यातील प्रमुख धान्यपिठात (गहू किंवा तांदूळ पीठ) १०-२० टक्के राजगिरा पीठ मिसळून पदार्थांचे पोषनमूल्य वाढविता येते.

राजगिऱ्यामधील प्रमुख अन्नद्रव्यांचे सरासरी प्रमाण

 • प्रथिने (ग्रॅम) ः १३.५
 • तंतुमय पदार्थ (ग्रॅम) ः १२.२
 • कॅल्शिअम (मिलिग्रॅम) ः १८०.१
 • मॅग्नेशिअम (मिलिग्रॅम) ः २७९.२
 • झिंक (मिलिग्रॅम) ः २.६
 • लोह (मिलिग्रॅम) ः ९.२
 • फॉस्फरस (मिलिग्रॅम) ः ५५७.२
 • पोटॅशियम (मिलिग्रॅम) ः ५०८
 • जीवनसत्त्व-ब१ (मिलिग्रॅम) ः ०.१
 • जीवनसत्त्व-ब२ (मिलीग्रॅम) ः ०.२
 • जीवनसत्त्व-ब३ (मिलिग्रॅम) ः ०.९
 • जीवनसत्त्व-ब५ (मिलिग्रॅम) ः १.५
 • जीवनसत्त्व-ब६ (मिलिग्रॅम) ः ०.६
 • जीवनसत्त्व-ब९ (मायक्रोग्रॅम) ः ८२
 • जीवनसत्त्व-इ (मायक्रोग्रॅम) ः १.५

राजगिराचे आरोग्यविषयक फायदे

 • कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडे मजबूत राहतात.
 • जीवनसत्व 'क' भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस आणि हिरड्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरते.
 • राजगिऱ्यातील प्रथिनांमध्ये मध्ये इन्सुलिनवर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये उपयुक्त ठरते.
 • राजगिऱ्यातील तंतुमय पदार्थामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
 • मॅग्नेशिअम अधिक असल्याने डोकेदुखीमध्ये उपयुक्त ठरते.
 • तंतुमय पदार्थ व असंतृप्त स्निग्ध आम्ले असल्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

संपर्क ः डॉ. अमोल खापरे, ८०५५२२६४६४
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...