सेंद्रिय शेती, मत्स्यपालनातून मिळवले चांगले उत्पन्न

 हेमा व विजयकुमार या जोडप्याने सेंद्रिय शेती आणि मत्स्यपालनात चांगले यश मिळवले आहे.
हेमा व विजयकुमार या जोडप्याने सेंद्रिय शेती आणि मत्स्यपालनात चांगले यश मिळवले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ‘मेरा गाव, मेरा गौरव’ या प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञ ते शेतकरी आणि प्रयोगशाळा ते शेत यामध्ये माहितीच्या देवाणघेवाणीचा कार्यक्रम राबवला जातो. शेतकऱ्यांच्या स्थानिक पातळीवरील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ज्ञान, सल्ला आणि माहिती पोचवली जाते. आयसीएआरच्या कोची येथील केंद्रीय सागरी मत्स्यसंशोधन संस्थेतील (CMFRI) संशोधकांचा गट केरळ येथील पाझहूर (पिरावोम) येथील श्रीमती हेमा विजयकुमार आणि विजयकुमार या जोडप्याच्या संपर्कात आला. त्यातून फुलली पर्वतीय प्रदेशात सेंद्रिय शेती आणि मत्स्यपालन यांची एकत्रित यशकथा.

एकात्मिक शेतीविषयी सातत्याने बोलले जाते. मात्र, शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीकडे वळवणे अवघड असते. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून एकाच वेळी भाजीपाला, शोभेच्या वनस्पती, झाडे, औषधी वनस्पती, नगदी पिके, अशी जैवविविधता जपणारी शेती आणि त्याला जोड म्हणून पोल्ट्री, पशुपालन, मत्स्यपालन असे पूरक उद्योग विजयकुमार यांनी घेतले आहेत. त्यांच्याकडे २३४७.२६ वर्गमीटर क्षेत्र असून, पर्वतीय प्रदेशातील काही शेतीसह उर्वरित उपजाऊ लॅटराईड माती आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये रबर झाडांची लागवड प्रामुख्याने केली जाते. अशा मातीमध्ये फळबाग किंवा भाज्यांची शेती अवघड ठरते. अशा शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याचा निर्धार विजयकुमार कुटुंबीयांनी केला. त्याला साथ मिळाली ती CMFRI च्या शास्त्रज्ञांची. त्यांनी मत्स्यपालनासोबत, भाज्या, फळबाग यांच्या लागवडीची फेरबदलासह माहिती दिली. मत्स्यपालनामध्ये जनुकीयदृष्ट्या सुधारित शेतीयोग्य तिलापीया (गिफ्ट) संगोपनासाठी मार्गदर्शन केले. मत्स्यपालनाचे काटेकोर नियोजन ः त्यांनी लाल दगडांचा तळ असणारे नैसर्गिक शेततळे केले. त्यात हेमा आणि विजयकुमार यांनी एपीडाकडून गिफ्ट तिलापीया माशांची २५७० बीज सोडून नर्सरी केली. पाच महिन्यांसाठी खालीलप्रमाणे खाद्य व्यवस्थापन केले. पहिला महिना, ०.६ मि.मी. प्रतिदिन ३ वेळा दुसरा महिना, ०.८ मि.मी. प्रतिदिन ३ वेळा तिसरा महिना, १.२ मि.मी. प्रतिदिन २ वेळा चौथा महिना, २.५ मि.मी. प्रतिदिन २ वेळा पाचवा महिना, ४.० मि.मी. प्रतिदिन २ वेळा पुढे काढणीपर्यंत...

  • पाण्याचा दर्जा, पीएच व अन्य गुणधर्म योग्य प्रकारे सांभाळले. आत येणारे पाणी आणि बाहेर जाणारे पाणी यांचेही स्वयंचलित टायमर कंट्रोल प्रणालीद्वारे नियंत्रण केले. माशांची वाढ वेगाने झाली. नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत तीन पटीने वाढ झाली. पाच महिन्यांमध्ये मासे ५०० ग्रॅम पर्यंत वाढले.
  • पाण्यामध्ये अमोनियाचे प्रमाण वाढल्यामुळे काही माशांची मरही झाली. त्यावर संशोधकांनी सुचवलेल्या सूचना आणि पाणी बदलते ठेवले.
  • त्याचप्रमाणे पाण्यात अझोला वनस्पती सोडणे, कॅल्शिअम कार्बोनेटचा वापर, वाळवलेल्या शेणखतांचा सावकाश वापर यातून प्लवंगाची वाढ वेगाने होऊ लागली.
  • तळ्यातील पाण्याचा पीएच स्थिर ठेवण्यासाठी ६ किलो मीठ आणि केळीचे दोन खुंटाचे तुकडे करून पाण्यात टाकण्यात आले. सरासरी ७.५ पीएच स्थिर ठेवण्यात आला. परिणामी, माशांमध्ये रोग झाले नाहीत.
  • सुपिकता टिकवली... जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी वेंचूर जातीच्या गायींचे पालन केले. सोबत परसबागेत स्थानिक जातीच्या कोंबड्याची पोल्ट्री केली असून, त्यातून प्रतिदिन ७ ते १० अंडी मिळतात. या दोन्हीतून उपलब्ध होणारी सेंद्रिय खते व गोमूत्राचा वापर जमिनीमध्ये नियमितपणे केला. भाजीपाला व पिकांचे अवशेष आणि शेणखतापासून गांडूळखताची निर्मिती केली. भाजीपाल्याचे टाकाऊ भागांमध्ये जैविक खतांचा वापर केल्याने उत्तम दर्जाचे खत मिळू लागले. फायदा ः उत्पादनाच्या विक्रीमध्ये काही अडचणी आल्या, तरी त्यांचे प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळाले.

  • मत्स्यशेतीतून सहा महिन्यांच्या अंतराने दोन वेळा काढणी झाली. याप्रमाणे एकूण सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले. गिफ्ट तिलापीया माशांचा प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये दर मिळाला.
  • भाजीपाला, फळे आणि नगदी पिकांतून प्रति वर्ष सुमारे ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
  • हेमा विजयकुमार आणि विजयकुमार यांनी भाजीपाला व फळांची सेंद्रिय शेती आणि मत्स्यपालन यशस्वी केले.
  • स्थानिक नगरपालिकेने या शेतकरी जोडप्याचा सत्कार केला असून, अन्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची निवड केली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com