agriculture story in marathi, Padul family from Aurangabad Dist. has achieved success in progressive horticulture farming. | Agrowon

प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ कुटुंबाचा आदर्श

संतोष मुंढे
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी, सातत्याने प्रयत्नशील व प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढणारे कुटुंब म्हणून पडूळ यांची ओळख आहे. मोसंबी, डाळिंबाच्या सातत्यपूर्ण व सुनियोजित व्यवस्थापनातून, तंत्रज्ञान, सिंचन व उत्पादनातून त्यांनी आर्थिक सक्षमता मिळवली आहे. त्यातून पूरक व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे मार्गही प्रशस्त केले.

लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी, सातत्याने प्रयत्नशील व प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढणारे कुटुंब म्हणून पडूळ यांची ओळख आहे. मोसंबी, डाळिंबाच्या सातत्यपूर्ण व सुनियोजित व्यवस्थापनातून, तंत्रज्ञान, सिंचन व उत्पादनातून त्यांनी आर्थिक सक्षमता मिळवली आहे. त्यातून पूरक व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे मार्गही प्रशस्त केले.

औरंगाबाद जिल्ह्यात जालना जिल्ह्याच्या सीमेवर लाडसावंगी गाव आहे. प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करून शेतीत प्रयोगशील म्हणून गावातील पडूळ कुटुंब परिचित आहे.कुटुंबातील नारायणराव यांना गणेश व बाबासाहेब अशी दोन मुले आहेत. कुटुंबात सुमारे दहा सदस्य आहेत. पैठण-भोकरदन महामार्गालगत सुपीक व मध्यम स्वरूपाची सुमारे २० एकर शेती आहे. सन
२००७ पर्यंत कोरडवाहू असलेल्या शेतीत कपाशी, बाजरी, मका आदी पिकं घेतली जायची. त्यामुळे कर्ज उचल व उत्पादन हाती आलं की सव्याज परतफेड करणे हे ठरलेलं असायचं. या विवंचनेतून सावरण्यासाठीच पडूळ कुटुंब फळशेतीकडे वळले. सन २००७ मध्ये शिवारातील बाबवाडी धरणामुळं मग फळशेतीची घडी बसण्यास मदत झाली.

मोसंबी, डाळिंबाची जोपासना
बाबासाहेब व गणेश या दोन्ही भावंडांनी २००७ मध्ये १६ बाय १६ फूट अंतरावर न्युसेलर मोसंबीची चार एकरांवर तर २०१४-१५ मध्ये काटोल गोल्ड या वाणाची सहा एकरांत लागवड केली. सन २०११ मध्ये भगवा डाळिंबाची एक एकरांत लागवड केली. अलीकडील वर्षांत पुन्हा दीड एकर व त्यानंतर २०१८-१९ मध्ये दोन एकरांत पुन्हा डाळिंब लावले आहे. दोन्ही फळपिकांसाठी साधारण १५ एकर क्षेत्र दिलं आहे. उर्वरित पाच एकरांत कपाशीसह अन्य खरीप व रब्बी पिके होतात. सुरवातीला माती परीक्षण करून अन्नद्रव्यांची कमतरता जाणून घेत तज्ज्ञांकडून सल्ला घेतला. त्यादृष्टीने पूर्तता करणं सुरू केलं. सेंद्रिय खत अधिकाधिक उपलब्ध व्हावं यासाठी शेण व गोमुत्रासाठी जवळपास सात ते आठ गायींचे पालन होते.

व्यवस्थापनातील बाबी

  • मोसंबीमध्ये दोन वेळा बोर्डोपेस्ट लावण्यात येते. प्रति झाड ४० किलो शेणखत दिले जाते. रिंगण करून देतात बेसल डोस दिला जातो. -डाळिंबाला झाडाच्या बुंध्यापासून एक ते दीड फूट अंतरावर चारी करून बेसल डोस व शेणखत प्रति झाड २० किलो दिले जाते.
  • कुटुंबातील सर्व सदस्य शेतात राबत असल्याने श्रमांची योग्य विभागणी होते. मजुरांवरील अवलंबित्व कमी होते.
  • चुनखड जमीन असलेल्या जमिनीवर मोसंबी बाग उभी आहे. सन २०१२ मध्ये या बागेवर दुष्काळाचं संकट आलं. परंतु पंचक्रोशीतून मिळेल तिथून पाणी विकत आणून बाग वाचविली.
  • दरवर्षी आंबिया बहराच्या फळांची काढणी केली की आंतरमशागत करतेवेळी प्रत्येक झाडाला किमान अर्धा किलो शेंगदाणा पेंड देण्यात येते. पूर्वी वडील व घरची जाणती मंडळी हाच प्रयोग करायचे. तोच पुढील पिढीने सुरू ठेवला आहे.
     
  • उत्पादन व विक्री

मोसंबीचे एकूण उत्पादनक्षम झाडांतून व क्षेत्रातून ३५ ते ५० टनांपर्यंत तर डाळिंबाचे १२ ते २२ टनांपर्यंत उत्पादन घेतात. मागील तीन वर्षात मोसंबीला किलोला २२ ते ३५ रुपये. तर डाळिंबाला ४० ते कमाल ८० रुपयांपर्यंत दर मिळाला. लॉकडाउनच्या काळात दोन वेळा औरंगाबाद शहरात मोसंबीच्या थेट विक्रीचा प्रयत्न केला. परंतु फार काळ तो सुरू ठेवला नाही. त्याऐवजी बाग थेट बागवानाला देण्याचं तंत्र अवलंबतात. डाळिंबाची विक्री सुरवातीच्या काळात नाशिक, सोलापूर, राहता, वाशी आदी मार्केटमध्ये केली. अलीकडील तीन वर्षांत डाळिंब जागेवरच व्यापाऱ्यांना देण्यात येत आहे.

सिंचन व तंत्रज्ञान
सिंचनासाठी तीन विहिरी, दोन शेततळे, सौर पंप दोन विहिरींवर बसविले आहेत. संपूर्ण क्षेत्र ठिबकवर आणले. तिन्ही विहिरींचे पाणी पाइप लाईनद्वारे जोडले. शेतालगत वाहणाऱ्या ओढ्यावर शासकीय योजनेतून बांधलेला सिमेंट बंधारा फळबागांसाठी आधारवड ठरला आहे. संपूर्ण शेती तांत्रिक पद्धतीने व कमी मजूरबळाच्या साहाय्याने करण्याचे नियोजन असते. नामांकित कंपनीचा ठिबक संच, सॅण्ड फिल्टर, ट्रॅक्‍टर ब्लोअर, ट्रॅक्‍टरचलीत सर्व यंत्रे, कांदा चाळ, स्लरी आदी सुविधा आहे.

फळबागांनी केले सक्षम
शेतीला जोड म्हणून ‘समर्थ अर्थमुव्हर्स’ हा बाबासाहेब यांनी व्यवसाय सुरू केला. परंतु तो सुरू करण्याची क्षमताच मुळात फळपिकांमुळे आल्याचे ते सांगतात. सन २०१४ मध्ये मोसंबीतून मिळालेल्या उत्पन्नातूनच ‘जेसीबी यंत्र’ खरेदी केले. ट्रॅक्‍टर व्यवसायही केवळ फळपिकांमुळे उभा करू शकल्याचे बाबासाहेब सांगतात. गावात तीन मजली व्यावसायिक इमारत उभी राहते आहे ती देखील फळपिकांनी दिलेल्या साथीमुळेच. गाव ‘पोकरा’ योजनेत समाविष्ट असल्याने अलीकडे शेडनेटचे ‘फाउंडेशन’ही उभारून ठेवले आहे. त्यामध्ये ढोबळी मिरची व काकडी पिकांचे नियोजन आहे. याशिवाय कृषी गोल्ड ॲग्रोटेक प्रोड्यूसर कंपनी तसेच समर्थ शेतकरी गट उभा करण्यात बाबासाहेबांची महत्त्वाची भूमिका आहे. अलीकडेच गटांतर्गत अवजार बॅंकेसाठी अर्ज केला आहे. कंपनी अंतर्गत गहू प्रक्रियेत उतरण्याचा मानस आहे.

संपर्क- बाबासाहेब पडूळ- ९९७५२१६९९९


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...