सुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू उद्योग, मध्यस्थांशिवाय निर्यात 

निर्यातीने वाढविला कोकणचा मान परदेशी मानकांनुसार परिपूर्ण आणि दर्जेदार काजू तयार करण्याचे आव्हान परांजपे यांनी यशस्वी करून दाखविले. काजू कीडमुक्त असावा, यासाठी फ्युमिगेशन प्रक्रियाही केली. पॅकबंद केलेला काजूयंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील न्हावाशेवा बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला.
 महिला कामगारवर्ग काजूचे वर्गीकरण करताना.
महिला कामगारवर्ग काजूचे वर्गीकरण करताना.

जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे दांपत्याने मुंबईतील चांगली नोकरी सोडून काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. उद्योगाचा तंत्रशुद्ध अभ्यास व गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला.  वीस कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पातून प्रतिमहिना सुमारे ७५ टन काजू प्रक्रिया क्षमता तयार केली. सुमारे ३२ ग्रेडचा काजू तयार करीत देशाची बाजारपेठ मिळविली. यंदा १७ टनांची अमेरिकेत थेट निर्यात करण्यापर्यंतची भरारी परांजपे दांपत्याने घेतली आहे.  मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आडीवरे येथील हृषीकेश परांजपे यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने हृषीकेश यांचे शिक्षण मुंबई-कल्याण येथे झाले. दहावीत असताना कॅलेंडर विक्रीपासून त्यांनी आपल्यातील मार्केटिंग कौशल्य अजमावले. फ्लॉपी, सीडी विकल्या. महाविद्यालयीन जीवनातही संगणकाची कामे करून दिली. सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीत ‘फायनान्स’ विभागात नोकरीही मिळाली. त्यानिमित्ताने कॅनडात गेले असता काजूचे मार्केट पाहण्यास मिळाले. त्या वेळी काजू उद्योगाचे महत्त्व लक्षात आले. विविध देशांतही काजूला मागणी असल्याचे लक्षात आले. उद्योगाचा सूक्ष्म अभ्यास केला. सन २००९ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन ते आडीवरे या मूळ गावी परतले. इथेच त्यांच्या काजू व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  कंपनीची स्थापना 

  • आडीवरे-कोंडसर येथे हृषीकेश आणि पत्नी सौ. समृध्दी यांनी ‘परांजपे अ‍ॅग्रो प्रोडक्ट’ या कंपनीची स्थापना २०१० मध्ये केली. दिवसाला एक टन क्षमता या फॅक्टरीची होती. त्याद्वारे ६० स्थानिकांना 
  • रोजगार मिळाला. प्रकल्प अत्याधुनिक, तंत्रज्ञानयुक्त करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. 
  • वीजही अनियमित होती. अखेर रत्नागिरी ‘एमआयडीसी’मध्ये स्थलांतर करण्याचे ठरविले. 
  • एका कंपनीची प्रशस्त जागा मिळाली. त्याआधारे उद्योगाचा विस्तार झाला. 
  • परांजपे यांचा उद्योग दृष्टिक्षेपात  क्षमता व मनुष्यबळ 

  • सध्याच्या प्रकल्पाची क्षमता ः दररोज १० टन 
  • सध्याची निर्मिती ः ३ टन 
  • आडीवरेतील कामगारांसह एमआयडीसी परिसरातील कामगारांनाही त्याद्वारे मिळाला रोजगार 
  • गुंतवणूक ः २० कोटी रुपये, त्यातील पाच कोटी स्वतःची, तर १५ कोटी बँक कर्ज 
  • कामगार ः १३० 
  • प्रत्येक वर्षी ५ कोटींची उलाढाल 
  • १० टक्के नफ्याचे प्रमाण 
  • बाजारपेठ 

  • परांजपे यांचा काजू महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात विकला जातो. उदा. ः मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, उत्तर प्रदेश. 
  • वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता 

  • सुमारे १५ प्रकारचे फ्लेवरयुक्त काजू तयार होतात. उदा. ः चीज, सॉल्टेड, पाणीपुरी, बारबेक्यू, सोलक्रीम, चॉकलेट आदी 
  • कोणतेही तेल न वापरता कोलेस्टेरॉल फ्री प्रक्रियायुक्त काजू 
  • आफ्रिका, इंडोनेशिया किंवा जगातील अन्य भागांपेक्षा कोकणातील काजू दर्जेदार आणि प्रथिनयुक्त असल्याचा परांजपे यांचा दावा 
  • काजू प्रक्रियेतील मुख्य टप्पे 

  • आफ्रिकेतील काही देशांमधून काजू आयात केला जातो 
  • तीन-चार दिवस उन्हात वाळविला जातो 
  • बॉयलरमध्ये स्टीम रोस्टिंग करून पुन्हा १२ तास वाळविण्यात येतो 
  •  पुढे कटिंगसाठी आणला जातो 
  • यंत्राच्या साह्याने ‘डिशेलिंग’ होते. काजूगर ड्रायरला येतो. तासाला शंभर किलो साले काढण्याची त्याची क्षमता 
  • काजूगराची साल काढल्यानंतर ३२ प्रकारांत त्याचे ‘ग्रेडेशन’ 
  • यात अखंड १६, पाकळी ४, तुकडा १२ आदी प्रकारांचा समावेश 
  • थेट अमेरिका निर्यातीचे स्वप्न प्रत्यक्षात  देशभरातील मार्केट मिळविल्यानंतर परदेशी निर्यातीकडे परांजपे यांनी पावले उचलली. स्वतःच्या उद्योगाची वेबसाइट तयार केली. त्यातून अमेरिकेतील एका कंपनीकडून काजूची मागणी आली. त्यांनी नमुन्यादाखल काजू पाठविण्यास सांगितला. मग पुढील प्रयत्न सुरू केले. केरळ येथील कार्यालयाशी संपर्क साधला. दर्जा, काजू कीडमुक्त करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात बराचसा कालावधी गेला. अखेर पहिल्या टप्प्यात १४ टन, तर दुसऱ्या टप्प्यात ५ टन असा १९ टन काजू अमेरिकेत कोणत्यही मध्यस्थाशिवाय थेट कंपनीला पाठविण्यात परांजपे दांपत्य यशस्वी झाले.  निर्यातीने वाढविला कोकणचा मान  परदेशी मानकांनुसार परिपूर्ण आणि दर्जेदार काजू तयार करण्याचे आव्हान परांजपे यांनी यशस्वी करून दाखविले. काजू कीडमुक्त असावा, यासाठी फ्युमिगेशन प्रक्रियाही केली. पॅकबंद केलेला काजू यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील न्हावाशेवा बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाला. ‘कन्साइनमेंट’ पोचण्यासाठी सुमारे २४ ते ३० दिवस लागतात. कंटेनरच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस प्रणालीसह इलेक्ट्रॉनिक्स लॉक सिस्टम वापरण्यात येते. निर्यातीचा हा मान मिळालेल्या परांजपे यांनी आपला आनंद जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला. कोकणातील काजू थेट अमेरिकेला आतापर्यंत निर्यात झालेला नसावा. बहुतांश काजू व्यापारी वा निर्यातदारांमार्फतच परदेशात जातो.  काजू प्रक्रिया उद्योगातील समस्या 

  • बँकेकडून कर्ज मिळताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते 
  • कर्जावरील व्याज अधिक 
  • पाच वर्षांचा परतावा कालावधी अपुरा, तो दहा वर्षे पाहिजे 
  • खेळत्या भांडवलाची मुदत संपली की ते टर्मिनेट करण्याची परवानगी 
  • कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी मालमत्ता सील करू नये 
  • सरकारचे पाठबळ हवे  परांजपे सांगतात की, बारमाही उत्पादन सुरू असेल तर परदेशात निर्यात करणे शक्य होते. व्हिएतनाम आघाडीचा काजू उत्पादक देश आहे. तिथे व्यावसायिकांना सरकारचे पाठबळ मिळते. याउलट भारतामध्ये काजूकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे हा उद्योग छोट्या प्रक्रियेपुरताच मर्यादित राहिला आहे.  पुरस्कार - ‘सह्याद्री’ वाहिनीकडून ‘ग्रामीण प्रक्रिया उद्योजक’ पुरस्कार परांजपे दांपत्याला नुकताच प्रदान करण्यात आला.  काजू टरफलापासून ऑइलनिर्मिती  केवळ काजू प्रक्रियेवर न थांबता परांजपे यांनी काजू बीच्या वाया जाणाऱ्या सालींपासून  ऑइलनिर्मिती उद्योगही सुरू केला आहे. त्याला बाजारपेठही मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.  संपर्क- हृषीकेश परांजपे - ९८३३६४१६६०  समृद्धी परांजपे - ९८१९९५३३७३ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com