agriculture story in marathi, Patil brothers of Dapori, Dist. Jalgaon has set an ideal example of multicropping & intergared farming with hard work & immence efforts.. | Agrowon

अतीव संघर्षातून एकात्मिक बहुविध शेतीत उमटवला ठसा
चंद्रकांत जाधव 
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

ज्ञान ठरले विकासाचे कारण 
मोतीलाल व पवन हे काका-पुतणे नेहमी तज्ज्ञांच्या संपर्कात असतात. केळीचे नवे वाण, रोपे, तंत्रज्ञान, बाजारपेठा यासंबंधी गुजरात, रावेर (जि. जळगाव) या भागातील अनेक संस्था, शेतकऱ्यांकडे भेट देऊन त्यांनी केळीतील ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील बंधूंपैकी पुंडलिक यांचा ‘आत्मा’तर्फे पुरस्काराने गौरव झाला आहे. सन २०१४ मध्ये त्यांना कृषी विभागातर्फे नेदरलॅंड, जर्मनी, स्वित्झर्लंड आदी देशांमध्ये फूल, फळांची शेती, दुग्ध व्यवसाय यांचा अभ्यास करण्यासाठी दौरा करण्याची संधी मिळाली

दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या खोदणे, पशुधन चारणे आदी कामांमधून संघर्षाचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. पण शेती व त्यातील व्यवस्थापन हाच पर्याय त्यांचे आयुष्य पालटवण्यासाठी कारणीभूत ठरला. कष्टी, जिद्दी, मनमिळाऊ व प्रयोगशील वृत्तीतून त्यांनी १५ एकर शेती ९० एकरांवर नेली. केळी, कापूस, दुग्ध व्यवसाय अशा एकात्मिक शेतीतून कुटुंबाने साधलेली प्रगती प्रशंसनीय आहे. 

जळगाव जिल्ह्यात दापोरी हे एरंडोल तालुक्‍यातील शेवटचे गाव. या गावात जायला व्यवस्थित रस्ते नाहीत. जळगावकडून बांभोरी (ता. धरणगाव) मार्गे जाताना रवंजा व खेडी खुर्द दरम्यानचा कच्चा, खडीचा रस्ता पार करून जावे लागते. अनेक ग्रामस्थ गिरणा नदी ओलांडून दापोरा (ता. जळगाव) येथे जातात. तेथून जळगावला येतात. रस्ते वाहतूक व्यवस्था तसेच इंटरनेटची सुविधादेखील गावात व्यवस्थित नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत गावातील पाच पाटील बंधूंनी आपली एकात्मिक व बहुविध पिकांची शेती फुलविली आहे. 

पाटील बंधूंचे खडतर प्रयत्न 
गिरणाकाठामुळे जलसाठे मुबलक आहेत. जमीन काळी कसदार, मध्यम आहे. पाटील बंधूंची पूर्वी १५ एकर शेती होती. वडील माधव कोरडवाहू शेती कसायचे. सर्व बंधू शेतीत वडिलांना मदत करायचे. जनावरांचे संगोपन करायचे. पावसाळ्यात दोन बंधू पशुधन चराईला जायचे. अन्य बंधू मजुरीदेखील करायचे. सर्वच अल्पशिक्षित. थोरले पुंडलिक यांनी छोटा व्यवसाय करण्याची धडपड केली. गावापासून गिरणा नदी पलीकडील शिरलोली गावात आठ वर्षे ‘टेलरिंग’ व्यवसाय केला. पाटचाऱ्या खोदल्या. गावातच जमेल ते काबाड कष्ट केले. 

शेतीतून प्रगती 
अशातच १९७२ मध्ये शेतीसाठी विजेची व्यवस्था झाली. पाटील बंधूंनी आपल्याकडील रक्कम, काही मदत यातून विहीर खोदली. सगळे आणखी उमेदीने, हिंमतीने राबू लागले. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची संधी त्यांना भाडेतत्त्वावरील शेतीतून मिळाली. त्यातून भाजीपाला, रब्बी पिकांचे भरघोस उत्पादन व उत्पन्न साध्य करू लागले. कष्ट व चिकाटीतून वर्षागणिक प्रगती होत गेली. त्यातून आजघडीला ९० एकर शेतीचे मालक होण्यापर्यंत पाटील यांनी प्रगती साधली आहे. 

दुग्ध व्यवसाय 
पाचही बंधू आज एकत्र राहतात. दहा वर्षांपूर्वी त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. आधुनिक गोठा उभारला असून सुमारे ७५ म्हशी व २५ गायींचे संगोपन होते. दूध, दही, श्रीखंड यांची पद्मालय ब्रॅण्डने विक्री होते. गायीच्या दुधाला लिटरला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये दर मिळतो. दररोज दोन्ही वेळच्या सुमारे ३०० लिटर पिशवीबंद दुधाची विक्री जळगाव शहरात घरोघरी होते. मिल्किंग मशिन, पाश्‍चराईजिंग, पॅकिंग अशा यंत्रणा आहेत. गोमूत्र एका हौदात संकलित करून केळीला ड्रीपमधून दिले जाते. शेणाचा वापर खत म्हणून होतो. जळगावात दूध वितरणासाठी दोन मजूर आहेत. त्यांच्यासाठी दोन दुचाकी आहेत. 

केळीची शेती 

 • श्रीमंती, वसई आदी वाणांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन अनेक वर्षे घेतले. अलीकडील वर्षांपासून ऊतीसंवर्धित रोपांची लागवड होते. 
 • दरवर्षी ५० हजार रोपे लागवडीखाली. 
 • बागेचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी बांधावर वारारोधक संकरीत गवताची लागवड तर लहान झाडांभोवती धैंचा. 
 • कमी वेळेत पुरेसे व व्यवस्थित सिंचन व्हावे यासाठी एका ओळीत ठिबकच्या दोन लॅटरल्सचा वापर. 
 • पाच बाय पाच फूट अंतरात गादीवाफ्यावरील केळीला वाफसा स्थिती कायम ठेवणे सोपे जाते. 
 • विद्राव्य खते व पाणी यासाठी स्वतंत्र वेळापत्रक. 
 • केळीतील कंदांना परिसरातून किंवा विविध भागातून मागणी असते. अनेक शेतकरी कंद खरेदी करून घेऊन जातात. 
 • प्रति २२ किलोची रास मिळवितात. खर्च कमी करण्यासाठी पिलबागही घेतात. 
 • साधारण १९ महिन्यांत एका शेतात दोन हंगाम साध्य करतात. 

पिकांची बहुविधता 

 • दरवर्षी २५ एकरांत ठिबकवर कापसाची लागवड. एकरी १२ क्विंटल उत्पादन. 
 • रब्बीत मका, गहू, हरभरा आदी पिके. 
 • बांधावर बांबू लावले आहेत. दरवर्षी दोन ते अडीच हजार बांबूंची विक्री. केळीच्या झाडांना आधार देण्यासाठीही बांबूंचा उपयोग. 
 • सहा सालगडी 
 • चार कूपनलिका, दोन विहिरी, तीन ट्रॅक्‍टर (पैकी एक मिनी), घोडा. 

संपर्क- पवन पाटील- ८३२९४८६३९८ 
पुंडलिक पाटील- ९८२३६३५०५० 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...