agriculture story in marathi, Peanuts that do more with less water  | Agrowon

दुष्काळस्थितीत अधिक उत्पादनक्षम भुईमूग जातींचा अमेरिकेत शोध

वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील संशोधक थॉमस सिंक्लेअर आणि सहकाऱ्यांनी भुईमुगातील पाण्याचा नेमकेपणाने वापर करणाऱ्या जातींचा शोध घेतला आहे. या जाती दुष्काळाच्या स्थितीमध्येही चांगले उत्पादन देण्यामध्ये सक्षम आहेत.

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील संशोधक थॉमस सिंक्लेअर आणि सहकाऱ्यांनी भुईमुगातील पाण्याचा नेमकेपणाने वापर करणाऱ्या जातींचा शोध घेतला आहे. या जाती दुष्काळाच्या स्थितीमध्येही चांगले उत्पादन देण्यामध्ये सक्षम आहेत.

भुईमूग पीक हे वालुकामय जमिनीत, अधिक ओलावा नसतानाही चांगले वाढते. मात्र, काही जाती दुष्काळाच्या स्थितीमध्येही चांगल्या प्रकारे वाढतात. मुळाच्या अवतीभवती पाण्याची कमतरता असताना या जाती पाणी कमी वापरतात. या सर्व बाबींचा उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठामध्ये बारकाईने अभ्यास करण्यात येत असून, दुष्काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात येत आहेत. याविषयी माहिती देताना थॉमस सिंक्लेअर यांनी सांगितले, की कमी पाण्यातही अधिक उत्पादन देणाऱ्या जाती भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या राहणार आहेत. वातावरणातील बदलामुळे पाऊस अनियमित होत असून, त्याचा फटका विविध पिकांना बसत आहे. ज्यावेळी जमीन कोरडी होत जाते, त्या वेळी भुईमूग वनस्पती आपले बाष्पोत्सर्जन कमी करते. त्यातून ती कमी पाण्याच्या स्थितीमध्येही चांगल्या प्रकारे तग धरू शकते. पिकाच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये जमिनीतील आर्द्रता कमी असल्याची स्थिती झाल्यास पुढे येणाऱ्या दुष्काळासाठी वनस्पती पाणी साठवून ठेवण्यास सुरवात करत असल्याचे दिसून आले आहे.
 
संशोधकांनी भुईमुगाच्या जलसंवर्धन तंत्राच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी तीन प्रयोग केले.

  • पाण्याचा कार्यक्षम वापर ः हरितगृहामध्ये जल संवर्धनाचे गुणधर्म असलेल्या जातींची लागवड केली. हे गुणधर्म प्रत्यक्ष शेतामध्ये कशा प्रकारे काम करतात, याचा आढावा घेतला. दुष्काळाच्या स्थितीमध्ये पाने खराब होण्याची प्रक्रिया उशिरा होत असल्याचे दिसून आले. थोडक्यात, वनस्पतीमध्ये तेवढा अधिक पाण्याचा साठा केलेला असतो.
  • अधिक उत्पादनक्षमता ः ही रोप वाढू दिल्यानंतर त्यातून भुईमुगाचे उत्पादन घेतले. हे गुणधर्म असलेल्या जातींचे उत्पादन सामान्य जातींच्या तुलनेमध्ये अधिक असल्याचे दिसून आले. त्याविषयी माहिती देताना सिंक्लेअर म्हणाले, की दुष्काळाच्या स्थितीमध्ये अधिक उत्पादन देण्याची क्षमता असल्याचे भुईमूग जाती ओळखणे यातून शक्य झाले. उलट पाण्याचे संवर्धन करून उत्पादनाच्या वाढीसाठी वापरणारी एक भुईमुगाचा गट यातून पुढे आला आहे. या गटातील जाती सध्याच्या व्यावसायिक भुईमूग जातींच्या तुलनेमध्ये पाण्याच्या कमतरता असलेल्या स्थितीमध्ये अधिक उपयुक्त ठरतील.
  • नत्राचे स्थिरीकरण ः पुढील टप्प्यामध्ये भुईमुगातील नत्राच्या स्थिरीकरणाच्या गुणधर्मावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सूक्ष्मजीवांच्या सहकार्याने वातावरणातील नायट्रोजन मिळवण्याची प्रक्रिया ही जमिनीतील आर्द्रतेसाठी संवेदनशील असते. यापूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये अमेरिकन भुईमूग जातींमध्ये दुष्काळाच्या स्थितीमध्ये हा गुणधर्म कमी होत असल्याचे आढळले होते. त्यामुळे पाण्याच्या कार्यक्षम वापरासोबतच नत्राच्या स्थिरीकरणाचे गुणधर्म असलेल्या जातींचाही शोध घेण्यात येत असल्याचे सिंक्लेअर यांनी सांगितले.
  • सिंक्लेअर हे स्वतः पीक शरीरशास्त्रज्ञ असून, पीक नेमके पाण्याचा वापर कशा प्रकारे करते यावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. पाण्याचा कार्यक्षम वापर हा भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, अशाच जाती शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर राहणार आहेत. त्यांच्या या अभ्यासाचे निष्कर्ष क्रॉप सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...